सुहानी भटनागर

हिंदी चित्रपट अभिनेत्री (२००४–२०२४)

सुहानी भटनागर ही हिंदी चित्रपट सृष्टीतील एक बाल कलाकार होती. हिंदी चित्रपट अभिनेते आमिर खान निर्मित चित्रपट दंगल मध्ये ती प्रथम झळकली होती.

सुहानी भटनागर
दंगल चित्रपटात सुहानी भटनागर
जन्म १४ जून २००४ (2004-06-14)
फरीदाबाद, हरियाणा[]
मृत्यू १७ फेब्रुवारी, २०२४ (वय १९)[]
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बाल कलाकार
कारकीर्दीचा काळ २०१६ - २०२४
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट दंगल
वडील पूनित भटनागर
आई पूजा भटनागर

तिने बाल वयातच मॉडेल म्हणून विविध दूरदर्शन जाहिरातींमध्ये तसेच साहित्य विक्रीच्या संचिका आणि चित्रफितींमध्ये काम केले आहे. इ.स. २०१६ मध्ये आलेल्या दंगल या चित्रपटामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. वयाच्या दहाव्या वर्षीच या चित्रपटात तिने आमिर खानची धाकटी मुलगी म्हणून बबिता फोगाट ची भूमिका निभावली होती. तिने आपले प्राथमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, फरिदाबादमध्ये पूर्ण केले होते.[][] त्यानंतर सुहानी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत होती. ती फरिदाबाद येथील मानव रचना शिक्षण संस्थेत द्वितीय वर्षात शिकत होती. शिक्षणानंतर अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याचे तिचे स्वप्न होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही.

आजारपण आणि मृत्यू

संपादन

सुहानी डर्माटो मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त होती. २०२३ च्या अखेरीस सुहनीच्या हातावर लाल डाग पडले होते. ज्यावर तिने फरिदाबादच्या अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, परंतु कोणतेही उपचार लागू पडले नाही. जेव्हा तिची प्रकृती गंभीर झाली तेव्हा तिला दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्या गेले. पण तिथेही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि हळूहळू तिच्या शरीरात पाणी भरू लागले. त्यामुळे तिचे फुफ्फुस खराब झाले आणि शेवटी १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुहानीने या जगाचा निरोप घेतला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "बचपन में ही सुहानी ने शुरू कर दी थी मॉडलिंग, दंगल के लिए 11,000 लड़कियों में से हुआ था चुनाव". amarujala.com. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ Chowdhury, Chitra (2017-01-04). "9 Unknown Facts About Suhani Bhatnagar, Who Plays Young Babita Phogat In 'Dangal'". Postoast. 2017-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Suhani Bhatnagar Height, Weight, Age, Family, Biography & More - StarsUnfolded". starsunfolded.com. 2017-01-09 रोजी पाहिले.
  4. ^ "आमिर खान को नहीं थी बेटी की बीमारी की जानकारी', सुहानी भटनागर की मां ने किया खुलासा". amarujala.com. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.