उत्क्रांतिवाद
उत्क्रांतिवाद : सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे. हा सिद्धान्त चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी जुलै १ इ.स १८५८मध्ये मांडला. चार्ल्स डार्विन याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज् बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन् द स्ट्रगल फॉर लाईफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना लेखक शास्त्रज्ञ निरंजन घाटे म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".
term used (often derogatorily) to denote the theory of evolution | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | philosophical school, theory of evolution | ||
---|---|---|---|
पासून वेगळे आहे |
| ||
असे म्हणतात कि यासारखेच आहे | evolutionary theory | ||
| |||
उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक दाखले
संपादनइ.स. १८५८पूर्वी मांडला गेलेला उत्क्रांतिवाद.
- लामार्क
- माल्थस - 'ऑन पॉप्युलेशन' या निबंधाचे लेखन. जगण्यालायक जीव जगतात. जे प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात ते जगतात, जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात असा विचार आल्फ्रेड रसेल वॉलेस यांच्या मनात प्रवृत्त करणारा निबंध.
- थॅलेस - एजियन सागर किनाऱ्याची निरीक्षणे
- ऍरिस्टॉटल - नैसर्गिक प्रक्रियेने आधी वनस्पती, मग प्राणी निर्माण होत होत माणूस तयार झाला, असं लिहून ठेवले.
- इरॅस्मस डार्विन
- पॅट्रिक मॅथ्यू - स्कॉटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि फळशेतीतज्ज्ञ यांनी नैसर्गिक निवडीचे तत्त्व प्रथम मांडले.
- विल्यम चार्ल्स वेल्स - मानवी त्वचेचा रंग व नैसर्गिक निवडींसंबंधी निबंध लेखन व संशोधन.
उत्क्रांतिवादाचे परिणाम
संपादनसमाजशास्त्रीय
संपादन- धार्मिक विचारांचे उच्चाटन
जीवशास्त्रीय
संपादन- विविध जीव व त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास
- पुराजीवशास्त्राला चालना
सूक्ष्मजीवशास्त्र
संपादन- जीन्सचे संशोधन
मानसशास्त्रीय
संपादन- उत्क्रांतिवादी मानसशास्त्र या विद्याशाखेचा उदय अलीकडचा आहे. डेव्हिड बस (१९८१, १९८५, १९९६, २००९) या मानसशास्त्रज्ञाने या क्षेत्रामध्ये मोलाचे काम केले आहे [१]. कॉस्मिड्स आणि टुबी या दोन मानसशास्त्रज्ञांनी व्होसन निवड पद्धती वापरून काम केले.
अनुवंशशास्त्रीय
संपादन- अनुवंश शास्त्राचा विकास
- योहान ग्रेगॉर मेंडेल ह्युगो दि फ्रीस, कार्ल कॉरेन्स आणि एरिख शेरमाख यांनी अनुवंशशास्त्राचे नियम शोधले. त्यांना ठाम परिणाम मिळाले.
- जीन्सवर संशोधनाची सुरुवात
- गुणसूत्रांचा शोध लागला. वॉटसन आणि क्रिक या संशोधकांनी डी.एन.ए.चे कोडे सोडवले.
धार्मिक
संपादनतंत्रज्ञान उत्क्रांति
संपादनवाहने
संपादन- विजेवरील मोटार टोयोटा प्रियस
- इतर मोटार उत्पादकांच्या गाड्या
इंधन उत्क्रांति
संपादनसंगणक उत्क्रांति
संपादनतंत्रज्ञान व चिपसेट्स मधील बदल
संपादनआज्ञावली व प्रणालीची प्रगती
संपादनचार्ल्स डार्विन आणि त्याच्या उत्क्रांतिवादावरील पुस्तके
संपादन- डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य (नंदा खरे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ)
संदर्भ
संपादन- ^ डेव्हिड बस. (२००८). इव्होल्युशनरी सायकॉलॉजी.">
- ^ निरंजन घाटे, अनुभव दिवाळी अंक २००८.