जाफ्राबाद तालुका

(जाफराबाद या पानावरून पुनर्निर्देशित)


जाफ्राबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. जाफ्राबाद तालुक्यात जाफ्राबाद शहरासह १०० गावे आहेत. जाफ्राबाद शहराजवळून धामणापूर्णा या नद्या वाहतात. पूर्णा नदीवर खडकपूर्णा धरण उभारण्यात आले आहे. तालुक्यामध्ये मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे तहसील आणि पंचायत समिती आहे. हे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले एक लहान शहर आहे, येथील निसर्ग व जुन्या काळी जेजुरीदारांच्या निवासस्थानासाठी वापरली जाणारी किल्ला (फोर्ट) प्रसिद्ध आहे. जाफ्राबाद हे ठिकाण केंळणा आणि पूर्णा नदीच्‍या संगमावर वसलेले आहे. पूर्वी या ठिकाणाला मजबुत दगडी भिंतीची तटबंधी हेाती, मात्र काळाच्या ओघात त्‍याची वाताहत झाली आह. तथापि एक लहानशी गढी उत्‍तम स्थितीत आहे. या ठिकाणाचे नाव जाफ्राबादचा संस्‍थापक जाफर खान यांच्या नावावरून पडले आहे. मुघल बादशाह औरंगजेब यांनी इतर ११५ गावांसोबत या ठिकाणाची जहागीरी जाफर खानला सोपवीली हेाती. जाफ्राबादमध्‍ये एकूण सात मशिदी आणि मंदिरे उभारण्‍यात आलेली होती. यातील प्रमुख मशिदीवर बादशाह औरंगजेब यांच्या आदेशाने रिजाजत खान यांनी पर्शियन भाषेत १०७६ हिजरी संवतामध्‍ये (सन १६६४) नोंदी केल्‍या होत्‍या. तटबंदी उभारणीच्या दरम्‍यान एक सुंदर अशी पाण्‍याची टाकी बांधण्‍यात आली होती. त्‍यावरील नोंदीनुसार याचे निर्माण बादशाह शाहजहान| यांच्या आदेश नुसार मुस्‍तफा खान यांनी १०४० [[हिजरी वर्ष|हिजरी संवतमध्ये (सन १६३०) मध्‍ये केल्याचे दिसून येते. (ही माहिती भारताचे राजपत्र, महाराष्‍ट्र राज्‍य, औरंगाबाद जिल्‍हा पृष्‍ठ क्र १०१७, १०१८ येथून घेण्‍यात आली आहे)

  ?जाफ्राबाद

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पूर्णापूर
—  तालुका  —
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
Map

२०° ११′ २४″ N, ७६° ००′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर चिखली, भोकरदन
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा जालना
भाषा मराठी, उर्दू
संसदीय मतदारसंघ जालना
तहसील जाफ्राबाद
पंचायत समिती जाफ्राबाद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१२०६
• +०२४८५
• MH 21
संकेतस्थळ: जाफ्राबाद
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना तालुका | अंबड तालुका | भोकरदन तालुका | बदनापूर तालुका | घनसावंगी तालुका | परतूर तालुका | मंठा तालुका | जाफ्राबाद तालुका

इतिहास

संपादन

सन १८०३मध्ये आसाई येथे मराठे व ब्रिटिश यांमधील लढ्यासाठी जाफ्राबाद प्रसिद्ध आहे. येथे ब्रिटिश कर्नल स्टीव्हन्सनच्या नावाची कोरीव नक्षी असलेले छोटे स्मारक आहे. त्याचा धातू (पंच धरू) म्हणजे स्टोनवर जोडलेला पर्ण नुकताच चोरीला गेला होता. ब्रिटिश पर्यटक दरवर्षी आपल्या पूर्वजांच्या आठवणीप्रीत्यर्थ या स्थानाला भेट देतात.

जाफ्राबाद तालुक्यातील गावे व लोकसंख्या
अ.क्र. गाव लोकसंख्या
आढा १,४९५
अकोला ३,६३३
आळंद ९४३
आंबेवाडी १,५५२
आंधरी १६७
आरतखेडा १,४०८
आसई १,९२७
बेलोरा १,१८७
भरडखेड ८५०
१० भारज बु. ४,८६७
११ भारज खु. १,१९७
१२ भातोडी १,०९३
१३ भोरखेडा ४५७
१४ बोरगाव बु. १,९११
१५ बोरगाव मठ ४००
१६ खासगाव ३५७३
१७ बोरखेडी चिंच ४८१
१८ बोरखेडी गायकी ९१४
१९ ब्रह्मपुरी १२३७
२० बूटखेडा १९७८
२१ चापनेर ८४९
२२ चिंचखेडा २०८७
२३ दहीगाव १०४
२४ डावरगाव १३३२
२५ देळे गव्हाण ३२५६
२६ देऊळगाव उगले १३२९
२८ देउळझरी २०८६
२८ धोंनखेडा ८५२
२९ डोलखेडा बु ७८६
३० डोलखेडा खु ७४४
३१ डोणगाव २७९४
३२ गाडेगव्हाण ७८०
३४ गणेशपूर ८१७
३४ गारखेडा ६१५
३५ घाणखेडा १०४७
३६ गोकुळवाडी ६१७
३७ गोंधळखेडा १०७२
३८ गोपी ७३७
३९ हनुमंत खेडा १३४६
४० हरपाला १५५४
४१ हिवरा कांबळी ११०८
४२ हिवराबली १६४५
४३ जाफ्राबाद १५९१०
४४ जानेफळ २४३८
४५ जवखेडा २६८
४६ कचनेरा ५५१
४७ काळेगाव १७६६
४८ खामखेडा ६९०
४९ खानापूर ८४६
५० खापरखेडा ७१४
५१ बोरी खु ३६३
५२ किन्ही ९२३
५३ कोळेगाव १६५०
५४ कोल्हापूर १३५९
५५ कोनड २१३२
५६ कुंभारी १०७५
५७ कुंभारझरी १८५४
५८ कुसळी ५९३
५९ माहोरा ४४७५
६० मंगरूळ ११२२
६१ मेरखेडा १५०९
६२ म्हसरूळ १६३०
६३ नलविहारा १७२७
६४ नादरखेड १२९८
६५ निमखेडा बु १०७३
६६ निमखेडा खु ५२४
६७ निवडुंगा २१५८
६८ पोपल १२८९
६९ पासोडी १४६१
७० पिंपळखुटा ७६३
७१ पिंपळगाव कड १६०८
७२ पोखरी १७३३
७३ रास्तल ८६२
७४ रेपाळा ६०६
७५ रुपखेडा बु. १११
७६ सांजोळ १०७०
७७ सातेफळ २४४३
७८ सावंगी १३४५
७९ सावरगाव १८७०
८० सावरखेडा ५१६
८१ सावरखेडा गोंधन १०८३
८२ सवासनी ९७७
८३ शिंदी १५८५
८४ सिपोरा २१५४
८५ शिराळा १२३८
८६ सोनगिरी ८४९
८७ सोनखेडा ६३५
८८ टाकळी ८६४
८९ तपोवन गोंधन ११४३
९० टेंभुर्णी ११३७६
९१ टोंडोली ६९५
९२ वरखेडा विरो १२२०
९३ वरुड ख. १३४९
९४ वडाळा १२९४
९५ वाधोना ६६५
९६ वानखेडा ७४६
९७ वरखेडा ४१५
९८ वरुड बीके. ५२१०
९९ वीरखेडा भालकी ६८९
१०० येवता २४२७