मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे असे मानले जाते. याची चव तिखट असते. हे फळ रंगाने बहुदा हिरवे असते. परंतु पिवळ्या व लाल रंगातही येते. याची पाने गुळगुळीत, एकाआड एक अशी येतात. मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे असतात. तसेच यात कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजे असतात. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.

मिरचीचे झाड

लागवडसंपादन करा

द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ईजिप्त, स्पेन, चीन, जपान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशात मिरची लागवड केली जाते. मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात नंदुरबार हे मिरचीच्या बाजारपेठेचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नंदुरबारमध्ये ओली मिरची पथाऱ्या करून वाळवून प्रक्रिया केली जाते. नंदुरबारच्या मिरचीला तिखटपणा, टिकण्याची क्षमता, वैशिष्टय़पूर्ण रंग आणि चव यामुळे परराज्यातून विशेष मागणी असते.<ref>https://www.loksatta.com/maharashtra-news/chilli-cultivation-reduces-in-nandurbar-zws-70-2083637/<ref> ऑक्टोबरपासून सुरू होणारा मिरचीचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असतो.

जातीसंपादन करा

  • अग्निरेखा
  • काश्मिरी
  • ज्वाला
  • पंत सी १
  • फुले ज्योती
  • फुले सई
  • ब्याडगी
  • मुसळेवाडी सिलेक्‍शन
  • लवंगी
  • संकेश्‍वरी
 
मिरचीचे झुडुप

मिरचीचे लाल तिखट बनविण्याची पद्धतसंपादन करा

मिरची पिकल्यावर लाल होते, पण ओलसरच राहते. तिला मग उन्हात नीट वाळवून पूर्णपणे सुकल्यावर कुटून तिचे स्वयंपाकात वापरावयाचे लाल तिखट बनते. शे्तांत लावण्यासाठी सध्या मिरचीची अनेक वाणे उपलब्ध आहेत; अग्निरेखा, नंदिता रोशनी, ज्वाला, जयंती, २७५, ब्लॅक सीड इत्यादी अशी त्यांची नावे आहेत.नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर येथे, कुही तालुक्यात व मांढळ येथे, तर अचलपूरच्या पथरोट या गावीही मिरचीचे उत्पादन घेतले जाते.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

चित्रदालनसंपादन करा

मिरचीच्या पाककृती:

शेंगदाणे कुटातली मिरची:

साहित्य:- १०-१२हिरवी मिरची, लसूण् -७ ते ८ पाकळ्या,भाजलेले शेंगदाणे -१ मोठा बाउल,तेल फोडणीसाठी जरा जास्तच,हळद,जिर,मोहरी,धने जिरे पूड एक चमचा,पाणी - १ ग्लास,मीठ

कृती: प्रथम शेंगदाणे भाजून त्याचा लसूण घालून थोडा जाडसर कूट करून घ्यावा.मिरच्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून जिर,मोहरी,हळद घालून चांगल परतवून घ्यावे आणि कापलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं तेलात मस्त परतवून घ्याव्यात.

आता त्यात गरम पाणी घालून एक उकळी आली की दाण्याचा कूट घालावा. मीठ, कोथिंबीर घालून पाच मिनिटं मिरची शिजू द्यावी. खानदेशात् गोडाचे जेवण असेल गोड न आवडणाऱ्या लोकांसाठी हमखास केली जाते ही मिरची तोंडी लावायला.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.