भिवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मिरचीच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

  ?भिवापूर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका

भिवापूर  —

२०° ५०′ ०८.१६″ N, ७९° ३०′ ०३.९६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा


• ४७ °C (११७ °F)
• १५ °C (५९ °F)
मोठे शहर नागपूर
जवळचे शहर नागपूर
लोकसंख्या
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
१,००,००० (2011)
७३.१२ %
• ७० %
• ६५ %
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ रामटेक
तहसील भिवापूर भिवापूर
पंचायत समितीभिवापूर भिवापूर
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४४१२०१
• +०७१०६

भिवापूर नाव हे तेथे असलेल्या गव तलावात खोदकाम करतांना कोरीव दगडी बिम(आर्च)सापडले त्यावरून आधी बिमापुर नंतर बिवापुर कालांतराने भिवापुर हे नाव रूढ झाले.गावात भिमादेवी चे मंदीर असल्याने आख्याइकेनुसार भिमापुर नावाचा अपभ्रंश भिवापूर असा झाला असा समज आहे. ह्या मंदिरात असलेल्या मातेची मुर्ती तलाव खोदकामात मीळाल्यामुळे तीची स्दथापना ही सध्या असलेल्या जागेवर स्थापीत करून गावातील भाविकमोठ्या श्रद्धेने पुजा करतात नवरात्रामध्ये ह्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात.

शाळा महाविद्यालयेसंपादन करा

भिवापूरमध्ये चार हायस्कुले व दोन महाविद्यालये आहेत. त्यापैकी भिवापुर एज्युकेशन सोसायटीची शाळा ही सर्वात जुनी शाळा आहे. या गावात एक सरकारी आयटीआय देखील आहे. भिवापूरचे विद्यार्थी जिल्ह्यात सर्वात हुशार समजले जातात. अनेक मोठ्या सरकारी पदावर देशातील विविध भागात या गावातील नागरिक काम करतात. शिक्षक या पदावर काम करणारे नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे हे या गावाचे विशेष होय.

प्रेक्षणीय ठिकाणेसंपादन करा

भिवापूरच्या जवळ रानाळा हे निसर्गरम्य स्थळ आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक येथे जातात. पण सध्या उमरेड करण्डला अभयारण्य झाल्याने येथे लोकांना जाण्यास परवानगी नाकारली जाते पण तेथे एक पौराणिक मंदिर राणीमाता चे असल्याने जंगल विभागाच्या मदतीने जाता येते. शिवाय, उदासीन मठ, बस स्टॅंङ, राधाकृष्ण मंदिर, रामधन चौक, विठ्ठल मंदिर, कुंभारपुरा, श्री गणेश मंदिर भिवापुर गणेश चौक इत्यादी अन्य रमनिय ठिकाणे आहेत. भिमामाता मंदिर हे विशेष जागृत देवस्थान भिवापूर नगरीत आहे.

शेतीची उत्पादनेसंपादन करा

भिवापूरच्या आसपासच्या गावांतही मिरचीचे उत्पादन होते. या क्षेत्रात प्रसिद्ध अशा 'वायगाव' हळदीचे उत्पादन होते. वायगाव हळद तिच्यातील 'क्युरकुमिन' या विशेष घटकामुळे प्रथम क्रमांकावर आहे, असा मुंबई मसाला बोर्डाचा अभिप्राय आहे. मिरचीच्या बाबतीत बालाजी शंकर देवाळकर हे नगरसेवक तसेच बाजार समिती संचालक असूनही एक उत्तम प्रगत शेतकरी आहेत. ते नवनवीन मिरची, धान व कापूस वाणाचे उत्पादन घेण्यासाठी सामान्य शेतकर्यांना मार्गदर्शन करीत असतात. लक्ष्मि कृषी केंद्र भिवापूर हे शेतकर्यांना नवनवीन शेतीप्रगतीच्या योजना देत असतात.

व्यवसायसंपादन करा

भिवापूर या गावी मिरची 'फुलकट' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीची देठे तोडणे. या कामासाठी आंध्र प्रदेश राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. इथले कामगार तिखट मिरची हाताळण्यात वाकबगार आहेत.भिवापूर नगरीत जवळपास १० ते १५ मिरची केंद्रे आहेत.

नगरपंचायतसंपादन करा

भिवापूर शहरात २०१५ या वर्षी प्रथमच नगर पंचायत अस्तित्वात आली एकूण १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायत मध्ये सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान लव परमानंद जनबंधू तसेच उपनगराध्यक्ष म्हणून श्री शंकर राजेराम दडमल यांना मिळाला तसेच बालाजी शंकर देवालकर, वर्षा प्रेम ठाकरे ,मंजुषा नरेश समर्थ ,किरण कवडू नागरिकर, दुधीराम जनबंधू , अर्चना मोतघरे ,संदीप खडसंग ,कैलाश कोम्रेल्लीवर , करीम शेख , नंदू पाचभाई , वंदन जांभूळकर , मीनाक्षी उमरेडकर, सीता खुशाब दुर्गे ,निशा जांभुळे , वैशाली पेंदाम यांना जनतेने निवडून दिले.

मिडियासंपादन करा

भिवापूर नगरीत दैनिक वृत्तपत्र असलेल्या अनेक वृत्तपत्राचे वार्ताहर आपल्या लेखणीने अन्यायाला नेहमीच वाचा फोडताना दिसून येतात त्यात प्रामुख्याने शरद मिरे लोकमत , अमर मोकाशी सकाळ हे सैदैव आपल्या लेखणीतून वृत्तपत्रात समस्या मांडून सोडविण्याचा प्रयत्न करताना सामान्य जनतेस दिसून येतात.

उद्योगसंपादन करा

भिवापूर नगरीत अनेक दशकांपासून डॉ भिवापुरकर यांचे मालकीचा एकमेव असा नोगा जूस कारखाना आहे. नवीन ओद्योगिक परिसरात काही छोटे मोठे उद्योग चालू झाल्याने ओद्योगिक परिसराला महत्त्व आले असले तरी मोठा असा उद्योग भिवापूर नगरीत नसल्याने विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही असे सर्व जाणकारांचे मत आहे.कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नागपूर जिल्ह्यातील तालुके
नागपूर शहर | नागपूर ग्रामीण | सावनेर | कळमेश्वर | नरखेड | काटोल | पारशिवनी | रामटेक | हिंगणा | मौदा | कामठी | उमरेड | भिवापूर | कुही