ढोबळी मिरची (शास्त्रीय नाव:Capsicum annuum) हा मिरचीचा एक प्रकार आहे. यास सिमला मिरची किंवा भोपळी मिरची असेही म्हणतात. ही तिखट नसल्याने हिला काहीजण गोडी मिरचीही म्हणतात. भारतात सहज मिळणारी भोपळी मिरची दाट हिरव्या रंगाची असते. गेल्या काही वर्षात या हिरव्या प्रकाराखेरीज लाल, पिवळी, शेंदरी, जांभळी आणि तपकिरी रंगाची सिमला मिरची बाजारात मिळू लागली आहे. हिरव्या रंगाच्या मिरचीच्या तुलनेत या रंगीत मिरच्या सहसा महाग असल्याने अजूनही त्यांचा वापर सर्वसामान्य भारतीयांत मर्यादित आहे.

लाल,पिवळी व हिरवी ढोबळी मिरची

चित्र दालन

संपादन