चेकोस्लोव्हाकिया

(चेकोस्लोव्हाकीया या पानावरून पुनर्निर्देशित)

चेकोस्लोव्हाकिया (47° 44' N to 51° 3' N, 12° 5' E to 22° 34' E) (चेक, स्लोवाकः Československo चेस्कोस्लोवेन्स्को) हा मध्य युरोपातील पूर्वेकडचा एक सार्वभौम देश होता. त्यात बोहेमिया, मोरेवियासायलेशिया आणि स्लोवाकिया यांचा समावेष होता. ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा भाग असलेला हा प्रांत १९१८ मध्ये स्वतंत्र झाला आणि १ जानेवारी १९९३ रोजी या देशाची चेक प्रजासत्ताकस्लोवाकिया ह्या दोन देशांमध्ये फाळणी झाली.

चेकोस्लोव्हाकिया
Československo
Czechoslovakia

१९१८१९९२  
ध्वज
ब्रीदवाक्य: Pravda vítězí (सत्याचा विजय होतो)
राजधानी प्राग
अधिकृत भाषा चेक, स्लोव्हाक
क्षेत्रफळ १,४०,४४६ चौरस किमी
लोकसंख्या १,५६,००,०००
–घनता १२२ प्रती चौरस किमी

चेकोस्लोव्हाकिया देश भूवेष्टित देश होता, याच्या पूर्वेस सोवियेत संघ, उत्तरेस पोलंड, नैऋत, पश्चिम आणि वायव्येस जर्मनी तर दक्षिणेस हंगेरी या देशांच्या सीमा लागून होत्या. जर्मनीमार्गे उत्तर समुद्राला मिळणारी एल्ब नदी बोहेमिया भागात, पोलंडमार्गे बाल्टिक समुद्राला मिळणारी ओडर नदी मोरेवियाच्या उत्तर भागातून वाहणारी तर देशाच्या मध्य भागातून काळ्या समुद्राला मिळणारी डॅन्यूब नदी या चेकोस्लोव्हाकियाच्या प्रमुख नद्या होत्या.

८ व्या शतकात चेकस्लोवाक या स्लाविक समाजाच्या दोन जातींचे प्राबल्य होते. चेक भाषा इंडो-युरोपियन भाषाकुटुंबातील स्लाविक गटाची महत्त्वाची भाषा आहे. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे या भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.

इ.स. १३४७ मध्ये बोहेमियाचा चार्ल्स हाचविन हा चौथा चार्ल्स हे नाव धारण करून राजा झाला. चेक लोक या काळाला सुवर्णकाळ मानतात, त्याचवेळी प्रागला महत्त्व प्राप्त झाले.