समसमीक्षा

संपादन

@Pushkar Pande: सर्वप्रथम लेखातील जमेची बाजू; वर्णनात्मकतेचा फापटपसारा नसलेली साधी सोपी माहितीपूर्ण आणि ओघवती लेखन शैली, ज्ञानकोशासाठी अनुकूल वाटते आहे, त्यासाठी अभिनंदन.

१)रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच वसाहती साम्राज्य, जपानी साम्राज्य, जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य इत्यादी सामाराज्य ही जगामधील आघाडीची साम्राज्ये होती. - वाक्य सुधारणेस वाव ?
२) युरोपीय राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम्राज्यावाद लादला. याला आशिया खंडातील साम्राज्यवाद म्हणतात. - यातील दुसऱ्या वाक्याची आवश्यकता अथवा वाक्य रचना तपासून पहावी.
३) प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगीजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांनी प्रयत्‍न केला, त्यामुळे त्यांना भारतात प्रबळ साम्राज्य निर्माण करता आले नाही. त्यांना केवळ गोवा, दमण आणि दीव या प्रदेशावरच समाधान मानावे लागले. - संदर्भांची आवश्यकता आहे. इंग्रजांच्या तुलनेत पोर्तुगीज तसेच इतर युरोपीय देशांच्या विस्तारास पडलेल्या मर्यादांच्या कारणांची अधिक सविस्तर दखल भविष्यात घेता येऊ शकेल असे वाटते.
४) पोर्तुगीजांच्या नंतर डच भारतात व्यापार करण्याकरिता इ.स. १५९५ मध्ये आले. डचांनीसुद्धा भारतात येवून व्यापाराला सुरूवात केली. पण व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी आपले लक्ष आग्नेय आशियातील बेटांवरच केंद्रित केले. - भविष्यात माहितीच्या विस्तारास जरासा वाव असावा असे वाक्यरचनेवरून वाटते.
५) फ्रेंच....' या प्रदेशांवरच समाधान मानावे लागले. ' - शब्द रचना आधीच्या एका परिच्छेदात येऊन जाते, शब्दरचनेची लगेच पुनरुक्ती टाळता आल्यास बरे पडेल.
६) मुघल काळातील इस्ट इंडीया कंपनीचा भारतातील वावर भविष्यात अधिक विस्तार करणे शक्य व्हावे असे वाटते.
७) युरोपीय राष्ट्रांनी या वसाहतींची सर्व दृष्टीने पिळवणूक केली त्यामुळे युरोपातील राष्ट्रे श्रीमंत बनली.- साम्राज्यवादाचे आर्थीक पैलू अधिक सविस्तर मांडण्यास लेखात वाव आहे असे वाटते. खासकरून (साधनसंपत्तीच्या) स्रोतांवर नियंत्रण मिळवण्यातील देशादेशांमधील स्पर्धा नंतर मार्केट मिळवण्यातील स्पर्धा आणि त्यातून उद्भवलेले जागतीक सता आणि प्रभाव संघर्ष असा मोठा पट मांडण्यास वाव असावा असे वाटते.
८) साम्राज्यवादाचे परिणाम - आपल्याला कायदे विषयक कितपत रुची आहे माहिती नाही पण रुची असल्यास 'Legal reception' नावाची एक संकल्पना भविष्यात दखल घेण्याजोगी असावी असे वाटते.


लेखाचे उर्वरीत लेखन चालू आहे आणि आगामी काही काळ त्यात जाईल असे वाटते. लेख पूर्ण होत आला आहे असे वाटल्या नंतरही संदर्भ शोधून जोडल्यास हरकत नाही, संदर्भांची शोधा शोध करताना लेखात जोडण्याजोगी बरीच उपयूक्त माहिती मिळत जाते. काही ठिकाणी वर्ष किंवा दशकांचे उल्लेख टळले आहेत असे वाटते, संदर्भ शोधून जोडण्याच्या स्टेजला तेही करून घेणे सोपे होईल असे वाटते.

मराठी विकिपीडियात एका उत्तम ज्ञानकोशीय लेखाची भर पडते आहे असे दिसते, तेव्हा आपल्या उर्वरीत लेखन आणि वाचनासाठी शुभेच्छा.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:२१, ७ जून २०१५ (IST)Reply


वैज्ञानिक शोध

संपादन
 
 

जॅान के पासून राईट बंधूंपर्यंतच्या संशोधकांनी लावलेल्या अद्भूत शोधांमुळे मानवी जीवन गतीमान झाले. बाष्पशक्ती, विद्युतशक्ती, कोळसा, लोखंड यांच्या शोधांमुळे वाहतूक]व दळणवळण क्षेत्रात प्रचंड गतिमानता आली. विज्ञानाने आधुनिक शस्त्रांचीही निर्मिती केली. विज्ञानामुळे मानवातील अति महत्तवाकांक्षा जागी झाली. त्यामुळे अनेक राष्ट्रांमध्ये साम्राज्यवाद वाढीस लागला.

शेजारचित्रे

संपादन

@Pushkar Pande: सध्या हे करता येईल. अजून इतर उपाय बघतो आहे.

अभय नातू (चर्चा) २१:१७, २४ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

.....ठीक आहे.

Pushkar Pande (चर्चा) २१:२४, २४ आॅगस्ट २०१५ (IST)

@Pushkar Pande:  Y केले. -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:४२, २४ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

साम्राज्यवाद (मासिक सदर)

संपादन

पहिले वाक्य : साम्राज्यवाद हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला . ???

हिंदी विकिपीडियावरील पहिले वाक्य : साम्राज्य शब्द दो शब्दों के मेल से बना है| सम (अर्थात एक समान) + राज्य (राजा का क्षेत्र)| इससे पर्याय है उन सभी क्षेत्रों को एक नक़्शे के नीचे लेना जो एक ही प्रशासन के द्वारा संभाले जाते हैं| यह एक व्यंजन संधि का रूप है| (हेही बरोबर नाही)

शब्दकोशातून :

साम्राज्य : Monier William's Sanskrit-English Dictionary, 2 nd Ed. 1899

n.

(fr. सम्-राज्) complete or universal sovereignty, empire, dominion over (gen. loc., or comp.) RV. &c.

mfn.

relating to sovereignty TS.

m.

a universal sovereign RV. viii, 25, 17 (accord. to g. कुर्व्-आदि, ‘the son of a universal sovereign.’)

>> साम्राज्यकृत्, साम्राज्यदीक्षित, साम्राज्यलक्ष्मीपीठिका, साम्राज्यलक्ष्मीपूजा, साम्राज्यसिद्धि, साम्राज्यसिद्धिदा

साम्राज्य : Wilson Sanskrit-English Dictionary (2nd Ed. 1832)

n. (-ज्यं)

Imperial rule, dominion, empire.

m. (-ज्यः)

The descendant of a prince or man of the military tribe.

E. सम्राज् an emperor, ष्यञ् aff. of the abstract, or ण्यpatronymic aff.

साम्राज्य[1] : Cappeller Sanskrit-English Dictionary, 1891

n. universal sovereignty.

साम्राज्य[2] : Cappeller Sanskrit-English Dictionary, 1891

m. universal sovereign.

थोडक्यात काय तर, साम्राज्यवाद हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला नाही.

सम् हा उपसर्ग आहे, रज् किंवा रञ्ज् हा संकृतमधील 4थ्या गणातला उभयपदी धातू, त्यावरून राजन् आणि राट् हे शब्द, त्यांचे समासाकरिताचे रूप राज, सम्+राट् या नामापासून भाववाचक नाम - साम्राज्य. इथे इंपेरियमचा काय संबंध? ... (चर्चा) १२:५५, ५ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply


"साम्राज्यवाद" पानाकडे परत चला.