घनश्याम ओझा
घनश्याम छोटेलाल ओझा (२५ ऑक्टोबर १९११ – १२ जुलै २००२) हे मार्च १९७२ ते जुलै १९७३ दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री होते.[१][२][३][४] ते १९४८ ते १९५६ पर्यंत सौराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सदस्य होते. पुढे ते १९५६ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य झाले.
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २५, इ.स. १९११ गुजरात | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै १२, इ.स. २००२ अहमदाबाद | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
१९७८ ते १९८४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. ते १९७२-७४ पर्यंत गुजरात विधानसभेचे सदस्य होते. युनायटेड स्टेट ऑफ काठियावाडची स्थापना झाली तेव्हा ते यू.एन. ढेबर मंत्रालयात मंत्री (१९५२-५६) होते. १९५७ ते १९६७ मध्ये सुरेंद्र नगरमधून लोकसभेची जागा जिंकून ते खासदार झाले. १९७१ मध्ये राजकोट मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीत ओझा यांनी मिनु मसानी यांचा पराभव केला आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले.[५]
ओझा यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला विरोध केला आणि १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन जनता पक्षासाठी काम केले. ते १९७८ ते १९८४ पर्यंत ते गुजरातमधून राज्यसभेवर (जनता पक्ष) निवडून आले.
संदर्भ
संपादन- ^ Nalin Mehta, Mona G. Mehta (2011). Gujarat Beyond Gandhi: Identity, Society and Conflict. Routledge. p. 17. ISBN 9781317988359.
- ^ "Ex CM Ghanshyam Oza passes away". द टाइम्स ऑफ इंडिया. 13 July 2002. 24 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-09-07 रोजी पाहिले.
- ^ "List of Chief Ministers (CM) of Gujarat". Maps of India. 5 September 2021 रोजी पाहिले.
- ^ Tommaso Bobbio (2018). Urbanisation, Citizenship and Conflict in India: Ahmedabad 1900-2000. Royal Asiatic Society Books. p. 99. ISBN 9781317514008.
- ^ Lok Sabha Debates. Lok Sabha Secretariat. 1971. p. 81.