यू.एन. ढेबर
उछरंगराय नवलशंकर ढेबर (२१ सप्टेंबर १९०५ - ११ मार्च १९७७) हे एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते होते ज्यांनी १९४८ ते १९५४ पर्यंत सौराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि १९५५ ते १९५९ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले होते.[१]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २१, इ.स. १९०५ जामनगर जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ११, इ.स. १९७७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
पुरस्कार | |||
| |||
१९३८ ते १९४२ दरम्यान, ढेबर यांनी राजकोट सत्याग्रहाचे नेतृत्व केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी, त्यांना ब्रिटिश सरकारने तीनदा तुरुंगात टाकले. १९५९ मध्ये, ढेबर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नियोजन उपसमितीचे प्रमुख होते. १९६० ते १९६१ ते भारत सरकारच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष होते. १९६२ मध्ये ते राजकोटमधून तिसऱ्या लोकसभेवर निवडून गेले.[२] तेव्हा ते भारत सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९७३ मध्ये, त्यांना भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३]
संदर्भ
संपादन- ^ "Second Term For Mr. Dhebar: Congress Presidentship". द टाइम्स ऑफ इंडिया. Dec 18, 1957.
- ^ "Indian National Congress". Indian National Congress. 2020-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-29 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2020-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-29 रोजी पाहिले.