गुजरातचे मुख्यमंत्री

गुजरातचे मुख्यमंत्री हे भारताच्या गुजरात राज्याचे सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो. १ मे १९६० रोजच्या गुजरात राज्याच्या निर्मितीपासून आजवर १५ नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री
ગુજરાત રાજ્યના મુખ્યમંત્રી
Chief Minister of State of Gujarat
गुजरातची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
भूपेंद्रभाई पटेल
(भारतीय जनता पक्ष)

१३ सप्टेंबर २०२१ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता गुजरात विधानसभा
वरिष्ठ अधिकारी गुजरातचे राज्यपाल
मुख्यालय सचिवालय, गांधीनगर
नियुक्ती कर्ता गुजरातचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक जीवराज मेहता
उपाधिकारी गुजरातचे उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांची यादी

संपादन

सौराष्ट्र

संपादन
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
सौराष्ट्र राज्य (१९५०-१९५६)
(१९५० साली सौराष्ट्र राज्याची विधानसभेसह निर्मिती)
उच्छरणगई नवलशंकर ढेबर
(१९०५-१९७७)
(मतदारसंघ: उपलेटा)
  २६ जानेवारी १९५० १९ डिसेंबर १९५४ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000327.000000३२७ दिवस
—————————
१९५२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रसिकलाल उमेदचंद पारिख
(१९१०-१९८०)
(मतदारसंघ: दसडा)
१९ डिसेंबर १९५४ ३१ ऑक्टोबर १९५६ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000317.000000३१७ दिवस
१९५६ राज्य पुनर्रचना अधिनियमद्वारे सौराष्ट्र राज्य बॉम्बे राज्यामध्ये विलीन करण्यात आले व सौराष्ट्र राज्याची विधानसभा बरखास्त करून तिचे सदस्य उर्वरीत कार्यकाळासाठी बॉम्बे विधानसभेचे सदस्य बनले.)
१ नोव्हेंबर १९५६ — ३० एप्रिल १९६० : बॉम्बे राज्याचा भाग (&0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000181.000000१८१ दिवस)

गुजरात

संपादन
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
गुजरात राज्य (१९६० पासून)
(१९६० बॉम्बे पुनर्रचना अधिनियमद्वारे बॉम्बे राज्याचे विभाजन करत काही भागासह गुजरात राज्याची स्थापना)
जीवराज नारायण मेहता
(१८८७-१९७८)
(मतदारसंघ: अमरेली)
  १ मे १९६० २५ फेब्रुवारी १९६३ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000300.000000३०० दिवस
(१९५७ बॉम्बे निवडणूक)
—————————
१९६२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बळवंतराय गोपाळजी मेहता
(१८९९-१९६५)
(मतदारसंघ: भावनगर)
  २५ फेब्रुवारी १९६३ १९ सप्टेंबर १९६५ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000206.000000२०६ दिवस
हितेंद्र कन्हैयालाल देसाई
(१९१५-१९९३)
(मतदारसंघ: ओलपाड)
  १९ सप्टेंबर १९६५ १३ मे १९७१ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000236.000000२३६ दिवस
—————————
१९६७
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
  १२ मे १९७१ १७ मार्च १९७२ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000310.000000३१० दिवस
घनश्याम छोटालाल ओझा
(१९११-२००२)
(मतदारसंघ: दहेगाम)
१७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000122.000000१२२ दिवस १९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चिमणभाई पटेल
(१९२९-१९९४)
(मतदारसंघ: संखेडा)
१७ जुलै १९७३ ९ फेब्रुवारी १९७४ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000207.000000२०७ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
  ९ फेब्रुवारी १९७४ १८ जून १९७५ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000129.000000१२९ दिवस
बाबूभाई जशभाई पटेल
(१९११-२००२)
(मतदारसंघ: साबरमती)
१८ जून १९७५ १२ मार्च १९७६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000268.000000२६८ दिवस १९७५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
  १२ मार्च १९७६ २४ डिसेंबर १९७६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000287.000000२८७ दिवस
माधवसिंह सोळंकी
(१९२७-२०२१)
(मतदारसंघ: भादरण)
२४ डिसेंबर १९७६ ११ एप्रिल १९७७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000108.000000१०८ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
(६) बाबूभाई जशभाई पटेल
(दुसरा कार्यकाळ)
(१९११-२००२)
(मतदारसंघ: साबरमती)
११ एप्रिल १९७७ १७ फेब्रुवारी १९८० &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000312.000000३१२ दिवस जनता पक्ष
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
  १७ फेब्रुवारी १९८० ७ जून १९८० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000111.000000१११ दिवस
(७) माधवसिंह सोळंकी
(दुसरा कार्यकाळ)
(१९२७-२०२१)
(मतदारसंघ: भादरण)
७ जून १९८० ६ जुलै १९८५ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000029.000000२९ दिवस १९८०
—————————
१९८५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अमरसिंह भिलाभाई चौधरी
(१९४१-२००४)
(मतदारसंघ: व्यारा)
६ जुलै १९८५ १० डिसेंबर १९८९ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000157.000000१५७ दिवस
(७) माधवसिंह सोळंकी
(तिसरा कार्यकाळ)
(१९२७-२०२१)
(मतदारसंघ: भादरण)
१० डिसेंबर १९८९ ४ मार्च १९९० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000084.000000८४ दिवस
(५) चिमणभाई पटेल
(दुसरा कार्यकाळ)
(१९२९-१९९४)
(मतदारसंघ: उंझा)
४ मार्च १९९० १७ फेब्रुवारी १९९४ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000350.000000३५० दिवस १९९० जनता दल
छबिलदास मेहता
(१९२५-२००८)
(मतदारसंघ: महुवा)
१७ फेब्रुवारी १९९४ १४ मार्च १९९५ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000025.000000२५ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० केशुभाई पटेल
(१९२८-२०२०)
(मतदारसंघ: विसावदर)
  १४ मार्च १९९५ २१ ऑक्टोबर १९९५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000221.000000२२१ दिवस १९९५ भारतीय जनता पक्ष
११ सुरेश मेहता
(जन्म १९३६)
(मतदारसंघ: मांडवी)
२१ ऑक्टोबर १९९५ १९ सप्टेंबर १९९६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000334.000000३३४ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
  १९ सप्टेंबर १९९६ २३ ऑक्टोबर १९९६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000034.000000३४ दिवस
१२ शंकरसिंह लक्ष्मणसिंह वाघेला
(जन्म १९४०)
(मतदारसंघ: राधनपूर)
  २३ ऑक्टोबर १९९६ २८ ऑक्टोबर १९९७ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000005.000000५ दिवस राष्ट्रीय जनता पक्ष
१३ दिलीप रमणभाई पारीख
(१९३७-२०१९)
(मतदारसंघ: धंधुका)
२८ ऑक्टोबर १९९७ ४ मार्च १९९८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000127.000000१२७ दिवस
(१०) केशुभाई पटेल
(दुसरा कार्यकाळ)
(१९२८-२०२०)
(मतदारसंघ: विसावदर)
  ४ मार्च १९९८ ७ ऑक्टोबर २००१ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000217.000000२१७ दिवस १९९८ भारतीय जनता पक्ष
१४ नरेंद्र दामोदरदास मोदी
(जन्म १९५०)
मतदारसंघ:
राजकोट-II (२००१-२००२)
मणीनगर (२००२-२०१४)
  ७ ऑक्टोबर २००१ २२ मे २०१४ &0000000000000012.000000१२ वर्षे, &0000000000000227.000000२२७ दिवस
—————————
२००२
—————————
२००७
—————————
२०१२
१५ आनंदीबेन मफतलाल पटेल
(जन्म १९४१)
(मतदारसंघ: घाटलोडिया)
  २२ मे २०१४ ७ ऑगस्ट २०१६ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000077.000000७७ दिवस
१६ विजय रमणिकलालभाई रूपाणी
(जन्म १९५६)
(मतदारसंघ: राजकोट पश्चिम)
  ७ ऑगस्ट २०१६ १३ सप्टेंबर २०२१ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000037.000000३७ दिवस
—————————
२०१७
१७ भूपेंद्रभाई रजनीकांत पटेल
(जन्म १९६२)
(मतदारसंघ: घाटलोडिया)
  १३ सप्टेंबर २०२१ पदस्थ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000195.000000१९५ दिवस
—————————
२०२२

गुजरातमधील राष्ट्रपती राजवट तपशील

संपादन

गुजरातमध्ये आत्तापर्यंत एकूण पाच वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.

  • पहिला कार्यकाळ : १३ मे १९७१ ते १७ मार्च १९७२ : सत्ताधारी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्याने अल्पमतात आलेले पदस्थ मुख्यमंत्री हितेंद्र कन्हैयालाल देसाई यांचे सरकार पडले. त्यामुळे राज्यात प्रथमच राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. कुठल्याच पक्षाला बहुमत नसल्याने अखेर विधानसभा विसर्जित करण्यात आली व नवीन निवडणूकीची घोषणा करण्यात आली. १९७२ साली निवडणूकीद्वारे नवी विधानसभा गठित होऊन सरकार स्थापना करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
  • दुसरा कार्यकाळ : ९ फेब्रुवारी १९७४ ते १८ जून १९७५ : १९७४ दरम्यान राज्यात नवनिर्माण आंदोलनाने कायदा सुव्यवस्था खंडित झाली. आंदोलकांकडून तीव्र विरोधाचा सामना करत पदस्थ मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी सरकारचा राजीनामा दिला. राज्यात जाळपोळ, हिंसा वाढत चालल्याने कायदा राखण्यासाठी राज्यात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली व काही काळानंतरच विधानसभा देखील विसर्जित करून नव्याने मध्यावधी निवडणूकीची घोषणा करण्यात आली. १९७५ साली मध्यावधी निवडणूकीद्वारे नवी विधानसभा गठित होऊन सरकार स्थापना करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
  • तिसरा कार्यकाळ : १२ मार्च १९७६ ते २४ डिसेंबर १९७६ : पदस्थ मुख्यमंत्री बाबूभाई जशभाई पटेल यांचे सरकार विधानसभेत अर्थसंकल्प पारित न करु शकल्याने पडले. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. अखेर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त) पक्षाने पुरेसे संख्याबळ मिळाल्याने माधवसिंह सोळंकी यांची मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली व नवे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
  • चौथा कार्यकाळ : १७ फेब्रुवारी १९८० ते ७ जून १९८० : पदस्थ मुख्यमंत्री बाबूभाई जशभाई पटेल यांच्या नेतृत्वातील जनता पक्षाचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावून विधानसभा विसर्जित केली गेली. १९८० च्या जून मध्ये निवडणूकीद्वारे नवी विधानसभा गठित होऊन सरकार स्थापना करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
  • पाचवा कार्यकाळ : १९ सप्टेंबर १९९६ ते २३ ऑक्टोबर १९९६ : सत्ताधारी भारतीय जनता पक्षात फुट पडल्याने पदस्थ मुख्यमंत्री सुरेश मेहता यांचे सरकार पडले व राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. भाजपमधून फुटलेले शंकरसिंह वाघेला यांनी नवा राष्ट्रीय जनता पक्ष स्थापन केला व विरोधीपक्ष काँग्रेसच्या पाठिंब्यावर पुरेसे संख्याबळ मिळवले. अखेर ३४ दिवसांनंतर वाघेला यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.

संदर्भ

संपादन