बळवंतराय मेहता

भारतीय राजकारणी

बळवंतराय मेहता (फेब्रुवारी १९, १८९९-सप्टेंबर १९,१९६५) हे गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री होते.ते १९५२ आणि १९५७ मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते. सप्टेंबर १८, १९६३ रोजी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली.सप्टेंबर १९, १९६५ रोजी दुसया भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ते कच्छ सीमेवर रणक्षेत्राची हवाई पाहणी करायला गेले असताना पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या विमानावर हल्ला केला.त्यांचे विमान कोसळून त्यात त्यांचा आणि त्यांची पत्नी सरोजबेन यांचा मृत्यू झाला.

बळवंतराय मेहता