सुरेश मेहता
सुरेश मेहता (जन्म ५ ऑगस्ट १९३६) हे भारतीय राजकारणी आणि १९९५ ते १९९६ दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री होते.[१][२]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ५, इ.स. १९३६ Mandvi | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत केशुभाई पटेल यांनी सरकार स्थापन केले तेव्हा त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. पटेल यांनी त्यांचे सहकारी शंकरसिंह वाघेला यांच्या बंडानंतर ऑक्टोबर १९९५ मध्ये राजीनामा दिला आणि परिणामी, मेहता यांनी ऑक्टोबर १९९५ मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी सप्टेंबर १९९६ पर्यंत काम केले. मात्र, वाघेला यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय जनता पक्षामूळे भाजपमध्ये फूट पडली. मेहता यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर पटेल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा उद्योग कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.[३]
त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला विरोध केला आणि २००७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ८ डिसेंबर २००७ रोजी भाजप सोडले.[४] नंतर ते २०१२ मध्ये माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी स्थापन केलेल्या गुजरात परिवर्तन पार्टी मध्ये सामील झाल.[५] त्यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये जीपीपीच्या भाजपमध्ये विलीन होण्यास विरोध केला आणि पक्ष सोडला.[६][७]
संदर्भ
संपादन- ^ Preston, I. (2001). A Political Chronology of Central, South and East Asia. Chronologies of the world series. Taylor & Francis Group. p. 112. ISBN 978-1-85743-114-8. 16 Apr 2023 रोजी पाहिले.
- ^ Ruparelia, S. (2015). Divided We Govern: Coalition Politics in Modern India. Oxford University Press. p. 221. ISBN 978-0-19-026491-8. 16 Apr 2023 रोजी पाहिले.
- ^ "I won't join his ministry, says Suresh Mehta". द टाइम्स ऑफ इंडिया. 2001-10-03. 2014-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Suresh Mehta quits BJP". द हिंदू. 2007-12-09. 2007-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Keshubhai may step down as GPP chief". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 2018-03-21 रोजी पाहिले.
- ^ "Gujarat Parivartan Party merges with BJP". Niticentral. 2014-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Keshubhai Patel's Gujarat Parivartan Party merges with BJP". Jagran.