गजानन दिगंबर माडगूळकर
गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेता होते. ते त्यांच्या नावाच्या आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने फार लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना गीतरामायण ह्याचे बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे देखील झाली आहेत, गीतरामायण या त्यांच्या लोकप्रिय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा आणि २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. लिखानासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला. त्यांना १९५७ मध्ये संगीत नाटक अकादमी चा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला आणि १९६९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) | |
---|---|
![]() | |
जन्म नाव | गजानन दिगंबर माडगूळकर |
टोपणनाव | गदिमा |
जन्म |
१ ऑक्टोबर १९१९ शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
१४ डिसेंबर, १९७७ (वय ५८) पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | साहित्य, चित्रपट |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, गीत, नाटक, पटकथा, कथा, कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | गीतरामायण |
वडील | दिगंबर बळवंत माडगुळकर |
आई | बनुताई दिगंबर माडगुळकर |
अपत्ये | ३ मुले आणि ४ मुली |
टीपा | ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
वैयक्तिक आयुष्यसंपादन करा
गदिमांचा जन्म १ आॅक्टोबर १९१९ ला शेटफळे या सांगली जिल्ह्यातील गावी झाला. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. मराठी कविता आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांचे ते थोरले बंधू होते. त्यांचा विवाह विद्या (पाटणकर, कोल्हापुरातील) यांच्याशी झाला आणि त्यांना ३ मुले (श्रीधर, आनंद, शरतकुमार) आणि ४ मुली (वर्षा, कल्पलता, दीपा, शुभदा) झाल्या. गदिमांचे वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील निवास स्थानी निधन झाले.
कारकीर्दसंपादन करा
ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
ग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता'या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो','सुखद या सौख्याहुनी वनवास' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.
चित्रपट कारकीर्दसंपादन करा
गदिमांचे साहित्यिक योगदानसंपादन करा
लघुकथासंपादन करा
- लपलेले ओघ
- बांधावरल्या बाभळी
- कृष्णाची करंगळी
- बोलका शंख
- वेग आणि इतर कथा
- थोरली पाती
- तुपाचा नंदादीप
- चंदनी उदबत्ती
- भाताचे फूल
- सोने आणि माती
- तीन चित्रकथा
- कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवासवर्णन)
- तीळ आणि तांदूळ
- वाटेवरल्या सावल्या
- मंतरलेले दिवस (राज्य पुरस्कार)
काव्यसंग्रहसंपादन करा
कादंबरीसंपादन करा
- आकाशाची फळे
- उभे धागे आडवे धागे
बालवाङमयसंपादन करा
- दे टाळी ग घे टाळी (केंद्र पुरस्कार)
- मिनी (राज्य पुरस्कार)
- शशांक मंजिरी
- नाच रे मोरा
नाटकसंपादन करा
- युद्धाच्या सावल्या
संकीर्णसंपादन करा
- तुलसी रामायण (गद्य भाषांतर)
- गदिमा नवनीत (वेचे)
संपादित मासिकेसंपादन करा
- शब्दरंजन
- अक्षर
- भरती
पुस्तकेसंपादन करा
ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-
- कविश्रेष्ठ गदिमा (डॉ. श्रीकांत नरुले)
- गीतयात्री गदिमा : लेखक - मधू पोतदार
- ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन (श्रीपाद जोशी)
- गदिमा साहित्य आणि लोकतत्त्व (डॉ. वासंती राक्षे)