गुरू ठाकूर (जुलै १८, वर्ष अज्ञात - हयात) हा मराठी गीतकार, पटकथा-संवादलेखक, नाटककार, चित्रपट-अभिनेता आहे.

गुरू ठाकूर
Guru Thakur 2010.jpg


जन्म जुलै १८
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र गीतकार, कवी, कथाकार, पटकथाकार, अभिनेता
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी

जीवनसंपादन करा

गुरू ठाकूर: मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरु ठाकूर यांनी स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा, संवाद लेखक, गीतकार अशी चौफेर मुशाफिरी केली असून त्यांतल्या प्रत्येक क्षेत्रात लोकप्रियतेसोबत त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तम छायाचित्रकार, अभिनेता आणि कवी म्हणूनही त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे.

कारकीर्दसंपादन करा

चित्रपटसंपादन करा

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
२००४ अगं बाई अरेच्चा! मराठी संवाद ,गीते
२००६ गोलमाल मराठी गीते
२००६ मातीच्या चुली मराठी गीते
२००६ घर दोघांचे मराठी गीते
२००८ लेक लाडकी मराठी गीते
२००८ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मराठी गीते
२००९ अनोळखी हे घर माझे मराठी गीते
२००९ सुंदर माझे घर मराठी गीते
ऑक्सिजन मराठी गीते
२०१० मर्मबंध मराठी संवाद, गीते
२०१० मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मराठी गीते
२०१० शिक्षणाच्या आईचा घो मराठी गीते
२०१० नटरंग मराठी संवाद,गीते,अभिनय
२०१० झेंडा मराठी गीते
२०१० क्षणभर विश्रांती मराठी गीते
२०१० रिंगा रिंगा मराठी गीते
२०१० लालबाग परळ मराठी गीते
२०१० सिटी ऑफ गोल्ड हिंदी गीते
२०१० अगडबम मराठी गीते
२०१३ जय महाराष्ट्र भटिंडा धाबा मराठी गीते
२०१३ बालकपालक मराठी गीते
२०१३ नारबाचीवाडी मराठी गीते
२०१३ मंगलाष्कट्क वन्स मोअर मराठी गीते
२०१४ टाईमपास मराठी गीते

दूरचित्रवाणीसंपादन करा

वर्ष (इ.स.) मालिका वाहिनी भाषा सहभाग
२००२ हसा चकट फू झी मराठी मराठी लेखन,गीते
२००३ श्रीयुत गंगाधर टिपरे झी मराठी मराठी लेखन,गीते
२००२ जगावेगळी झी मराठी मराठी लेखन
यह जीवन है दूरदर्शन हिंदी लेखन,गीते
२००७ असंभव झी मराठी मराठी गीते
२०१० कुलवधू झी मराठी मराठी गीते
२०१० प्राजक्ता मी मराठी मराठी गीते

रंगमंचसंपादन करा

वर्ष (इ.स.) नाटक भाषा सहभाग
१९९९ तू तू मी मी मराठी गीते
२००० आता होऊनच जाऊ द्या मराठी गीते
२००६ भैया हातपाय पसरी मराठी लेखन, गीते
२००९ म्हातारे जमीं पर मराठी गीते

पुरस्कार व नामांकनेसंपादन करा

वर्ष (इ.स.) पुरस्कार व नामांकने कामगिरी भाषा
२००७-२००८ 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद' - सर्वोत्कृष्ट नाटककार नाटक भय्या हातपायपसरी मराठी
२००७-२००८ 'नाटककार बबन प्रभू स्मृती पुरस्कार' - विनोदी नाट्यलेखन नाटक भैय्या हातपायपसरी मराठी
२००८-२००९ 'मुंबई मराठी साहित्य संघ पुरस्कार' - सर्वोत्कृष्ट नाटककार नाटक भैय्या हातपायपसरी मराठी
२००९ 'इंद्रधनू युवोन्मेष पुरस्कार' [१] गीतलेखन मराठी
२००९ 'कलागौरव पुरस्कार' - सर्वोत्कृष्ट गीतकार चित्रपट नटरंग मराठी
२००९ '४६ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' [२] - सर्वोत्कृष्ट संवाद (नामांकन) चित्रपट मर्मबंध मराठी
२०१० 'संस्कृती कलादर्पण पुरस्कार' [३] - सर्वोत्कृष्ट संवाद चित्रपट नटरंग मराठी
२०१० 'चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार' [४]- सर्वोत्कृष्ट गीतकार चित्रपट नटरंग मराठी
२०१० 'मटा सन्मान' [५]- सर्वोत्कृष्ट गीतकार चित्रपट नटरंग मराठी
२०१० 'झी गौरव पुरस्कार' [६] - सर्वोत्कृष्ट गीतकार चित्रपट नटरंग मराठी
२०१० 'BIG FM [७] BIG Lyricist Award'- सर्वोत्कृष्ट गीतकार चित्रपट नटरंग मराठी

संदर्भसंपादन करा

  1. ^ TOI (2 December 2009). "ठाण्यात रंगणार 'इंदधनू'चे रंग!". Bennett Coleman & Co. Ltd. 2010-04-07 रोजी पाहिले. 
  2. ^ TOI (9 April 2009). "राज्य चित्रपट पुरस्काराची नामांकने जाहीर". Bennett Coleman & Co. Ltd. 2010-06-28 रोजी पाहिले. 
  3. ^ Sanskruti Kala Darpan, 2006. "SANSKRUTI KALA DARPAN" (English मजकूर). (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २६ जुलै २०१४ रोजी मिळविली). 2010-04-07 रोजी पाहिले. 
  4. ^ The Indian Express Online Media (6 April 2010). "व्ही. शांताराम पुरस्कारांवर ‘झिंग चिक झिंग’चे वर्चस्व[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Bennett Coleman & Co. Ltd. 2010-06-28 रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  5. ^ TOI (22 March 2010). "मटा सन्मान विजेत्यांच्या प्रतिक्रिया". The indian express ltd. 2010-06-28 रोजी पाहिले. 
  6. ^ Zee Marathi. "Zee Gaurav Awards[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (English मजकूर). Zee News Limited, 2006. 2010-06-28 रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  7. ^ RnM Team. "Lata Mangeshkar felicitated at Big Marathi Music Awards" (English मजकूर). Indiantelevision Dot Com Pvt Ltd. 2010-10-30 रोजी पाहिले. 


बाह्य दुवेसंपादन करा