गुंटकल जंक्शन रेल्वे स्थानक

(गुंटकल रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

गुंटकल जंक्शन (तेलुगू: గుంతకల్లు జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील गुंटकल शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले गुंटकल जंक्शन देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. मुंबई-चेन्नई मार्ग येथून जातो व त्याचबरोबर येथून बंगळूर, मडगावविजयवाडा ह्या शहरांकडे देखील रेल्वेमार्ग जातात. त्यामुळे मुंबईहून चेन्नई, बंगळूर, कोइंबतूर इत्यादी शहरांकडे तसेच बंगळूरहून दिल्ली, कोलकाता शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या गुंटकलमार्गे जातात.

गुंटकल जंक्शन
గుంతకల్లు జంక్షన్
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता गुंटकल, आंध्र प्रदेश
गुणक 15°10′30″N 77°22′1″E / 15.17500°N 77.36694°E / 15.17500; 77.36694
मार्ग मुंबई−चेन्नई रेल्वेमार्ग
गुंटकल-हुबळी रेल्वेमार्ग
गुंटकल-बंगळूर रेल्वेमार्ग
गुंटकल-विजयवाडा मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७२
विद्युतीकरण होय
संकेत GTL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
गुंटकल is located in आंध्र प्रदेश
गुंटकल
गुंटकल
आंध्र प्रदेशमधील स्थान

रोज थांबा असणाऱ्या गाड्या

संपादन