क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक
क्राइमिया (युक्रेनियन: Автономна Республіка Крим; रशियन: Автономная Республика Крым; क्राइमियन तातर: Qırım Muhtar Cumhuriyeti, Къырым Мухтар Джумхуриети) हा पूर्व युरोपातील एक वागद्रस्त भूभाग आहे. मार्च २०१४ सालापर्यंत युक्रेन देशाचे एक स्वायत्त प्रजासत्ताक असलेले क्राइमिया सध्या रशियाच्या अधिपत्याखाली आहे. क्राइमिया युक्रेनच्या दक्षिणेस व रशियाच्या नैऋत्येस काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर क्राइमिया ह्याच नावाच्या द्वीपकल्पावर वसले आहे.
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक Автономна Республіка Крим (युक्रेनियन) Автономная Республика Крым(रशियन) क्राइमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Процветание в единстве (रशियन) एकात्मतेमध्ये उन्नती | |||||
राष्ट्रगीत: Нивы и горы твои волшебны, Родина (रशियन) | |||||
क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सिंफेरोपोल | ||||
अधिकृत भाषा | युक्रेनियन | ||||
इतर प्रमुख भाषा | रशियन, क्राइमियन तातर | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
रशिया देशाचे स्वायत्त प्रजासत्ताक रशियन साम्राज्य / सोव्हिएत संघापासून |
|||||
- घोषणा | १८ ऑक्टोबर १९२१ | ||||
- बरखास्ती | ३० जून १९४५ | ||||
- पुन्हा स्वायत्तता | १२ फेब्रुवारी १९९२ | ||||
- संविधान | २१ ऑक्टोबर १९९८ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २६,१०० किमी२ (१४८वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १९,७३,१८५ (१४८वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ७५.६/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | युक्रेनियन रिउनिया | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८० | ||||
क्राइमियाच्या इतिहासात अनेक महासत्तांचा समावेश आहे. १५व्या ते १८व्या शतकादरम्यान हा भूभाग ओस्मानी साम्राज्याच्या तर १८व्या ते विसाव्या शतकादरम्यान रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने हा प्रदेश बळकावला व युद्धानंतर सोव्हिएत संघाच्या राजवटीदरम्यान क्राइमिया आधी सोव्हिएत रशिया व नंतर सोव्हिएत युक्रेनचा राजकीय विभाग होता.
२६,१०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या क्राइमिया प्रजासत्ताकाची लोकसंख्या २००७ साली सुमारे २० लाख इतकी होती. सिंफेरोपोल ही क्राइमियाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर सेव्हास्तोपोल, याल्ता व कर्च ही इतर मोठी शहरे आहेत. पर्यटन व शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत दालन Archived 2014-02-22 at the Wayback Machine.
- क्राइमियाचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील क्राइमिया पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |