कृष्णाजी सरोदे

(कृष्णाजी सरवदे या पानावरून पुनर्निर्देशित)


साचा:अधिकृत संदर्भांची आवश्यकता असलेला लेख

या लेखातील मजकूर [१] येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(ऑगस्ट २०१३)



पठ्ठे कृष्णाजी सरवदे,(? मृत्यू:?),शाहीर पठ्ठे बापूराव आणि शाहीर शिवा-संभा (तमासगीर काळु-बाळु यांचे वडील) यांचे समकालीन; गांव गव्हाण तालुका तासगांव जिल्हा सांगली, येथील शाहीर होते.[ दुजोरा हवा]

शाहीर पठ्ठे कृष्णाजी सरवदे

संपादन

शाहीर पठ्ठे कृष्णाजी सरवदे गांव गव्हाण तालुका तासगांव जिल्हा सांगली येथे होऊन गेले. त्यांची ख्याती अशी की, ते सवाल जवाबात कधीच हरले नव्हते.सिद्धार्थ सरवदे यांच्या अनुदिनी (ब्लॉगवरील) उल्लेखानुसार शाहीर पठ्ठे कृष्णाजी सरवदे,यांनी संपादन केलेले यश महार समाजाच्या दृष्टीने अभिमानास्पद होते.[][ दुजोरा हवा]

कथित जीवन प्रसंग

संपादन

त्यांचे वाढते वर्चस्व प्रसिद्धी लक्षात घेता, दस्तुरखुद्द पठ्ठे बापूरावांनी गव्हाणमधे जाऊन त्यांची भेट घेण्याचे ठरवले व ते गव्हाणमधे दाखल झाले.आता तिथे सांगितल्या जाणाऱ्या सत्यकथेनुसार, विचारत विचारत बापुराव कृष्णाजी सरवदेंच्या घरी निघाले. एकाला विचारताना, त्या व्यक्तिने पठ्ठे बापूरावांची चौकशी केली. त्यावेळी आविर्भावात गर्वात आपली ओळख सांगुन बापुरावांनी कृष्णाजी महारास भेटण्यास आलो, असे सांगितले. त्यावेळी त्या व्यक्तिने एक प्रश्न विचारला व त्याचे उत्तराची विचारणा केली परंतु बापुराव गडबडले उत्तर काही सापडेना... त्यावेळी ती व्यक्ति म्हणाली, ‘जावा राव आपल्या घरी, माझ्यासारख्या साधारण माणसांच्या सवालाचे उत्तर नाही, तर त्या कृष्णाजी महाराच्या सवालांची काय उत्तरे देणार...’. झालेला प्रकार सहन न झाल्यामुळे बापुराव न भेटताच परत आपल्या गावी फिरले परंतु ती भेटलेली व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नसुन पठ्ठे कृष्णाजी सरवदेच होते.[ दुजोरा हवा]

असेच एकदा बडोद्याची एक व्यक्ती उंट घेऊन आली होती. त्या व्यक्तीने तर पुरा डामडौल करुण कृष्णाजींचे नामोहरण करण्यासाठी आला होता. परंतु प्रत्यक्ष भेटीत अचंभीत करणाऱ्या सवालांना उत्तर न देता आल्यामुळे ते उंट व त्यासोबत आणलेले लेजामोजा सोडुन जायला ती व्यक्ती तयार झाली परंतु कृष्णाजीने ते ठेवून न घेता त्याला सगळे घेऊन जाण्याची आज्ञा केली.[ दुजोरा हवा]

त्यांचा अभ्यास यावरुण कळतो की, त्यांना केलेले प्रश्न हे बहुत करुण अनिष्ठ रुढी परंपरा तसेच पौराणिक कथेलाही आव्हाण करणारे होते. त्यामुळेच की काय समोरचा उत्तरच नसल्यासारखा लगेच त्यांच्यापुढे हार मानत असे.

तमासगीर काळु-बाळु यांचे वडील तमासगीर शिवा-संभा यांना देखिल सवालजवाबामधे कृष्णाजीने सवाल करून हारवले त्यावेळी त्यांनी उत्तर न देता आल्यामुळे जाहीर शपथ घेतली की, गव्हाणमधे कधीच तमाशाचा कार्यक्रम करणार नाही. तशी त्यांनी ती शपथ पाळली देखिल. आजही त्यांचे वंशज गव्हाण गांवामधे तमाशा करायला तयार होताना दिसत नाहीत...[ दुजोरा हवा]

मृत्यू आणि वारसा

संपादन

कृष्णाजी यांचे कुटकुळी येथे त्यांच्या बहीणीच्या गांवी मृत्यु झाला. त्यांचे नंतर कोणी त्यांचा वारसा चालवला नाही व इतरांनीही कोणी प्रयत्न केला नाही. त्यांचे पुत्र ‘लक्ष्मण सरवदे’ यांनी कालांतराने घरी असणारी सारे लिखाणाची गढडी अडचणी वाटता, आता काय कामाची म्हणुन अग्रणी नदीत सोडुन आले.[ संदर्भ हवा ]

तुकारामांचे लिखाण जसे नदीत सोडुन दिल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांनी सगळे पुन्हा लिखाण करुण भेट दिली तसेच काही अव्वल तमाशाप्रेमीनी त्यांचे विचार, कवीता, गाणी, लावण्या व सवाल-जवाब लिखित स्वरूपात जतन करुण त्यांचे नंतर त्यांना अभिवादन करुण तमाशाला सुरुवात करत असे. तसे त्याचे पुरावे सखा हिंगणगांवकर तमाशगीर [सांगली] तसेच सोलापूर व काही कर्नाटक मधील तमाशागीरांकडे आढळतील.[ दुजोरा हवा]

ते सगळे लिखाण नदीत सोडताना त्यांनी ती गढडी नाही बुडवली तर गव्हाण गावांचा तासगांव तालुक्याचा तसाच सांगली जिल्ह्याचा गर्वाचा इतिहास बुडविला. समस्त महार जातीचा अभिमान पाण्यात पालथा केला... दुख: एव्हढेच वाटते की, आजही तमाशा सादर करताना पठ्ठे बापुरावांची गवळण सादर केली जाते व त्यांचे नांव देखिल घेतले जाते. कृष्णाजींचे नांव अगदी १९६० दशकात घेतले जात होते. त्याचे जिवंत पुरावे म्हणजे सांगली-सोलापूर-कोल्हापुर मधील वयस्क तमाशाप्रेमी. नंतर काय झाले कोणास ठाऊक परंतु आगळ्या वेगळ्या पठ्ठ्याचे सांगलीचे तमासगीर पुराव्या अभावी नांव घेताना देखिल आढळत नाही.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]

शिष्य थळु तमाशगीर

संपादन

कोल्हापुर जिल्ह्यातील बोरगांव [सदलगं /लाटणं] येथील थळु तमाशगीराचे कृष्णाजी वरचे प्रेम तर आगळे वेगळे होते. त्याने त्यांना आपले गुरू मानले होते. ज्योतिबाच्या यात्रेला ५-७ कुटुंबे गेली असता पुरुष मंडळी रात्रीचे वेळी कुटुबांसोबत थांबण्यापेक्षा यात्रेनिम्मीत आलेला तमाशा पहावयास गेले. तसे ते तमाशाप्रेमीच शेवटी... तिथे गेल्यावर थोड्या वेळातच तमाशा चालु झाला व त्यामधल्या शाहीराने कृष्णाजी सरवदे यांचे नांव घेतल्यावर सगळे उपस्थित गव्हाणकरांमधे वीज चमकली. शेवटी कार्यक्रमा नंतर ते त्यांच्या मंडपात गेले. परंतु त्यावेळी ते जेवण करायला बसले होते. कोणाचा तरी आवाज येताना तमाशगीरांनी कोण आहे? असे विचारले असता ‘गव्हाणकर’ म्हणताना तो वयस्कर शाहीर खरकाट्या हातानेच अर्धवट जेवण सोडुन त्यांच्याकडे गेला व त्या सर्व गव्हाणकरांच्या पाया पडला व म्हणाला तुम्ही सर्व माझ्या गुरूच्या गांवचे आहात. नंतर थोडी चर्चा झाल्या नंतर शाहीर थळुने मला गव्हाण मधे तमाशा कार्यक्रम करण्याची संधी देण्याची विनंती केली. आणि तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम असेल त्यासाठी कोणतेही मानधन नको जमल्यास तुमच्या घरच्या शिळ्या पोळ्या तेवढ्या कलाकारांना जेऊ घाला, असेही सुचवले. अखेर त्यांनी गव्हाणमधेच शेवटचा आपला कार्यक्रम केला.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ सिद्धार्थ सरवदे यांची अनुदिनी दिनांक १० ऑगस्ट,२०१३,भाप्रवे : सकाळी ११ वाजता जशी अभ्यासली