कुंवरसिंह
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कुंवरसिंह हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म इ.स. १७७७ साली जगदिशपूरचे राजा जादासिंह यांच्या कडे झाला होता.
कुंवरसिंह | |
---|---|
टोपणनाव: | कुंवरसिंह |
मृत्यू: | एप्रिल २६, १८५८ जगदीशपूर |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
धर्म: | हिंदू |
बालपण आणि शिक्षणसंपादन करा
कुंवरसिंह यांचे मूळ गाव शहाबाद तालुक्यातील जगदिशपूर. जमीनदार घराण्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून अश्वरोहण, नेमबाजी, भालायुद्ध, तलवारयुद्ध, तिरंदाजी इत्यादी युद्धकलांचे त्यांनी उत्तम शिक्षण प्राप्त केले होते.
कारकीर्दसंपादन करा
राजा जादासिंहजीच्या मृत्युनंतर जगदिशपूरच्या संस्थानाचा कारभार कुंवरसिंहानी स्वीकारला. १८५६ च्या शेवटच्या काळात इंग्रज सरकारने जगदिशपूरचे संस्थान खालसा केले. कुंवरसिंहानी या अन्यायारोधात लढा देण्याचे ठरविले. दाणापूर-पाटणा भागातील क्रांतिकारकांचे नेतृत्व पत्करून जुलै २९, १८५७ रोजी या ८० वर्षाच्या क्रांतिकारकाने आरानगरवर हल्ला करून ३००हून आधील गोऱ्या सैनिकांना ठार केले.[ संदर्भ हवा ] या युद्धात ते जबर जखमी झाले. २३ मे १८५८ला कुंवरसिंहाचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांचा भाऊ अमरसिंह याने हा लढा पुढे चालू ठेवला.