कातानिया
कातानिया (इटालियन: Catania, उच्चार ) हे इटली देशाच्या सिचिल्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिचिल्याच्या पूर्व भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. कातानिया हे सिसिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे (पालेर्मोखालोखाल)[१] तर इटलीमधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्या ३,११,५८४ तर महानगराची लोकसंख्या ११,०७,७०२ इतकी आहे.[२]
कातानिया Catania |
||
इटलीमधील शहर | ||
| ||
देश | इटली | |
प्रांत | कातानिया | |
प्रदेश | सिचिल्या | |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व आठवे शतक | |
क्षेत्रफळ | १८०.९ चौ. किमी (६९.८ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १६ फूट (४.९ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,९२,०४४ | |
- घनता | १,६०० /चौ. किमी (४,१०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
comune.catania.it |
इ.स. पूर्व आठव्या शतकात वसवलेले[३] व मोठा इतिहास असणारे कातानिया रानिसां काळात इटलीमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय शहर होते. सध्या कातानिया सिसिलीमधील एक मोठे औद्योगिक व पर्यटन केंद्र आहे. हे शहर अनेकदा नैसर्गिक आपत्त्यांमध्ये उद्ध्वस्त झाले होते. ११६९मधील भूकंप, १६६९मधील माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून शहरावर आलेली लाव्हाची लाट आणि पुन्हा १६९३चा भूकंप ही काही उदाहरणे आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनकातानिया शहरातील उ लिओत्रु तथा फाँताना देल'एलेफांते हे कारंजे शहराचे मानचिह्न आहे. हे कारंजे १७३६मध्ये जियोव्हानी बाटिस्टा व्हॅक्कारिनीने बांधले. याच्यावरील हत्ती येथे सापडणाऱ्या लाव्हाजन्य खडकातून कोरलेला आहे.
शिक्षण
संपादनयेथील कातानिया विद्यापीठाची स्थापना १४३४मध्ये झाली होती. इटलीमधील हे सगळ्यात जुने विद्यापीठ आहे.[४] येथे १२ विभागांमध्ये सुमारे ६२,००० विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतात.[५]
या विद्यापीठाशी संलग्न असलेली स्कुओला सुपेरिओर दि कातानिया ही संस्था शिक्षणशास्त्रातील उच्च शिक्षण देते.[६]
यांशिवाय येथे इस्तित्युतो मुझिकाल व्हिन्सेंझो बेलिनी ही संगीतशास्त्र शिकवणारी संस्था[७] आणि अक्कादामिया दि बेल आर्ती हे कलामहाविद्यालय आहेत.[८]
वाहतूक
संपादनमहामार्ग
संपादनकातानिया ए१९ मोटरवेद्वारे मेसिना आणि ए१९ मोटरवेद्वारे पालेर्मोशी जोडलेले आहे.
रेल्वे
संपादनफेरोव्हिया सर्कमएट्निया हा नॅरो गेज रेल्वे मार्ग कातानियाला रिपोस्तो शहराशी जोडतो. ११० किमी लांबीचा हा मार्ग माउंट एटनाला प्रदक्षिणा घालतो व कातानियापासून २८ किमी ईशान्येस रिपोस्तोला थांबतो.
मेट्रो
संपादनमेत्रोपोलिताना दि कातानिया ही भुयारी रेल्वे १९९९ मध्ये सुरू झाली. ८.८ किमी लांबीचा हा भुयारी मार्ग कातानियाच्या पश्चिमेस नेसिमो गावापासून कातानिया शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत धावतो.[९]
विमानतळ
संपादनकातानिया-फाँतानारोसा विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे. येथून युरोपमधील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
जुळी शहरे
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Sicilia / Sicily (Italy): Provinces, Major Cities & Communes - Population Statistics, Maps, Charts, Weather and Web Information". www.citypopulation.de. 2023-06-02 रोजी पाहिले.
- ^ Official ISTAT figures [१] Archived 3 May 2020 at the Wayback Machine.
- ^ "Catania history – Catania culture – Catania – attractions in Catania – art Catania – history guide Catania – Italy Katane". Travelplan.it. 1 June 2010 रोजी पाहिले.
- ^ Giuseppe Giarrizzo. "La nostra storia" [Our History] (इटालियन भाषेत). 30 August 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "La storia dell'Ateneo scritta da Giarrizzo" [The History of the University by Giarrizzo] (इटालियन भाषेत). 20 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Scuola Superiore di Catania" (इटालियन भाषेत). 3 August 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Musical Institute Vincenzo Bellini – Official site". Istitutobellini.it. 18 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2011 रोजी पाहिले.
- ^ "Academy of Fine Arts of Catania". Italian official site. 5 April 2011 रोजी पाहिले.
- ^ Underground railway of Catania from Subways.net [२] Archived 29 June 2009 at the Wayback Machine. and from CityRailways.net in साचा:In lang[३] and (translation)[४]
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |