औसा

लातूर जिल्ह्यातील तालुका व शहर.
(औसा ग्रामीण या पानावरून पुनर्निर्देशित)

औसा (Ausa) हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे औसा तालुक्याचे मुख्यालयही आहे. औसा नगर परिषद ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. नागरी संस्थेचे कार्यक्षेत्र ५.४ किमी (२.१ चौरस मैल) मध्ये पसरलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३६,११८ एवढी होती.[]

हा लेख औसा शहराविषयी आहे. औसा तालुक्याच्या माहितीसाठी पहा, औसा तालुका
  ?औसा

महाराष्ट्र • भारत
—  तालुका आणि शहर  —
Map

१८° १५′ ००″ N, ७६° ३०′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१,२०४ चौ. किमी
• ६३४ मी
जवळचे शहर लातूर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
लोकसंख्या
घनता
२,४१,७८१ (२०११)
• २०१/किमी
भाषा मराठी
आमदार अभिमन्यू पवार
नगराध्यक्ष अफसर शेख
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील औसा
पंचायत समिती औसा
नगरपालिका औसा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३५२०
• +०२३८३
• MH 24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in

औसा शहराला ऐतेहासिक, सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. हे शहर साधाराणपणे साडेसहाशे वेर्षापुर्वी वसलेले आहे. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने "औच्छ" असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकांबर हा औशाचा रहिवासी होता. त्याने "करंडक चरयू" हा काव्यग्रंथ लिहिला आहे.या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची "असई"असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नवे रूढ झाली असावीत. यादव कालीन खोलेश्वर दरवाजा, अंबाजोगाई शिलालेख (शके १४५०) यात उदगीर बरोबर औश्याचीही नोंद आहे. यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते.

भुईकोट किल्ला

संपादन

औसा येथे भुईकोट किल्ला असून, त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. किल्ल्याभोवती खंदक असून, ते सध्याही चांगल्या स्थितीत आहे. खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पहिला मोठा दरवाजा लागतो त्यास "लोह्बंदी" दरवाजा म्हणतात. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक्ष किल्ल्याच्या पहिल्या तटास "अह्शमा" नावाचा दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. किल्ल्यात एकूण दोन तट आहेत. खंदकाचे भिंतीपासून पहिल्या तटाच्या भिंतीपर्यंत साधारणपणे १४० ते २५० फुट अंतर आहे. दुसरया तटाच्या आत इशरतमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात पारिबा, कटोरा व चांद या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत. बिदरच्या बहमनी राज्याच्या मुख्य वजीर खाजा महंमद गवान याने शके १३८२ला औसा किल्ला बांधण्यास सुरुवात केली व शके १४०३ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.

किल्ल्याचे राजकीय महत्त्व

संपादन

शहरातील किल्ल्याला ऐतेहासिक काळात राजकीय महत्त्व होते. हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्त्व होते. इ.स. १३५७ मध्ये बहमनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे इ.स. १५४० मध्ये पहिला बुऱ्हाण निजामशहा याने ताबा मिळविला होता. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इ.स. १६३५ मध्ये झालेल्या तहाच्या फर्मानात औश्याची नोंद आहे. मोगल बादशहा शाहजहान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता.

मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या. हैद्राबादच्या निजामी संस्थानकडून १८५३ मध्ये इंग्रजांनी हा भाग गहाण म्हणून घेतला होता. त्यांचा ताबा ह्या भागावर १८६१ पर्यंत होता. त्यावेळी कर्नल मेडीज टेलर हा ब्रिटिश कमिशनर म्हणून नळदुर्ग परगाण्याचा प्रमुख होता. त्याच्या निवासाची वास्तू किल्ल्याजवळ आहे. त्याने अंगुरबाग, जामबाग इत्यादी महत्त्वाच्या बागा लावल्या होत्या. त्या आजही या शहरात प्रसिद्ध आहेत.

पर्यटन स्थळे

संपादन
  • भुईकोट किल्ला,

प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे

संपादन

माहिती

संपादन

औसा तालुक्यातील आकडेवारी

  • क्षेत्रफळ ( चौकीमी ) : १२०४
  • लोकसंख्या: २,४१,७८१
  • गावाची संख्या : १३२
  • ग्रामपंचायती : १०८
  • नगर परिषद : १
  • पोलिस ठाणी : ३
  • महसुल मंडले : ७
  • जिल्हा परिषद सर्कल : ९
  • प्राथमिक आरोग्य केंद्र : ७
  • शाळांची संख्या : १८१
  • महाविदयालये : ११

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ausa Municipal Council City Population Census 2011-2022 | Maharashtra". www.census2011.co.in. 2022-03-16 रोजी पाहिले.
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका