सुंदरगिरी मठ
सुंदरगिरी मठ महाराष्ट्राच्या औसा शहराच्या पूर्व भागातील निलंगा वेशीजवळ आडतलाइनच्या शेजारी असलेला मठ आहे. हा दशनाम गोसावी पंथाचा विरक्त मठ ७०० वर्षापूर्वीचा असावा, असे आपल्याला 'मुन्तखब क्रमांक(११८)च्या माहितीनुसार. निशान क्र. तारीख १२७ फ २६' यावरून सांगता येते.या मठाची रचना त्याच्या ऐतिहासिकतेची साक्ष देते. मठाचे बांधकाम दगडी आहे. तळघरात दोन खोल्या आहेत. सकाळचे सूर्यकिरण तळघरात पोहचतील अशी त्याची रचना आहे. एका खोलीत नंगेबाबांची समाधी आहे तर दुसऱ्या खोलीतील मूर्ती जैन महावीरांची किंवा पाश्र्वनाथांची असावी. अशी मुर्तीची रचना आहे. ही मुर्ती नंगेबाबांची आहे म्हणुन आजही त्यांचे शिष्य तिची पूजा करतात. मूर्ती दगडाची आहे. ती अत्यंत रेखीव आहे. मूर्तीच्या रचनेवरून ती १३ व्या शतकातील असावी, असे सांगता येते. तिथेच पादुका ही आहेत. यातुन एक गुप्त रस्ता औशाच्या किल्ल्यात निघतो.[१]
चित्रदालन
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ मोरे, संगीता. लातूर : वसा आणि वारसा. p. १७९-१९९.