औंढा नागनाथ मंदिर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
औंढा नागनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील प्राचीन ज्योतिर्लिंग आहे.[१][२]
औंढा नागनाथ मंदिर ( नागेश्वर ज्योतिर्लिंग ) | |
---|---|
स्थानिक नाव | |
चित्र मथळा | |
नाव | |
भूगोल | |
गुणक | 19°32′14″N 77°02′29″E / 19.537087°N 77.041508°E |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | हिंगोली |
स्थान | औंढा नागनाथ, हिंगोली, महाराष्ट्र |
संस्कृती | |
मूळ आराध्यदैवत | शिव |
उत्सव दैवत | महाशिवरात्री |
स्थापत्य | |
स्थापत्यशैली | हेमाडपंथी |
इतिहास व प्रशासन |
इतिहास
संपादन१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. यालाच 'अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग' असे म्हणतात. या शहराचे सध्याचे नाव हे 'औंढा' असून पूर्वीच्या काळी याचे नाव हे 'दारुकावण' असे होते.
आख्यायिका
संपादनप्राचीन काळात दारूका नावाची एक राक्षसीण होती, तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. पार्वती तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिले. हे वन फार चमत्कारिक होते. दारूका जिकडे जाईल तिकडे ते तिच्यामागे जात असे. या वनात दारूका आपला पती दारूक सोबत राहत होती. दारूका आणि दारूक या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. हे दोघे सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करत होते. अनेक ब्राह्मणांना यांनी ठार मारले होते. काही ब्राह्मणांना बंदी बनवले होते. बंदी केलेल्या ब्राह्मणांमधील एक ब्राह्मण शिवभक्त होता. कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला. ही गोष्ट जेव्हा दारूक राक्षसाला समजली तेव्हा त्याने ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला. काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरू केली. दारूकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडुन टाकली. तो ब्राम्हणांना ठार मारु लागला. त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला. त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारूक आणि दारूका राक्षसांचा वध केला. त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की,"मी येथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रुपाने कायमचे वास्तव्य करेल". तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवती जे अरण्य आहे त्याला दारुकावन असे म्हणतात.
नंतर कालांतराने या ठिकाणी एक मोठे आमर्दक सरोवर तयार झाले. आणि ज्योतिर्लिंग हे त्या सरोवरात समाविष्ट झाले.
मंदिराचा इतिहास
संपादनपांडवकालीन इतिहास
संपादनपांडव हे कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर, त्यांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. यादरम्यान पांडव भारतभर फिरले. फिरता–फिरता ते या दरुकवनात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती. असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गाईच्या पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलिंगावर दूध सोडत होती. मग पाचही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले. आणि विर भीमाने आपल्या गदा प्रहरणे त्या सरोवराच्या चारही बाजूंनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले श्री कृष्णाने त्यांना त्या शिवलिंग विषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मग पाच पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले.
यादवकालीन इतिहास
संपादनकालांतराने हे सध्याचे मंदिर सेउना (यादव) घराण्याने हेमाडपंथी शैलीने बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते हे मंदिर सात मजली दगडाच्या इमारतिचे होते .
इ.स.१६०० नंतरचा इतिहास
संपादननंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराच्या इमारती ध्वस्त केल्या होत्या, औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिरचे शिखर हे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिराचे शिखर पुन्हा बांधले. आणि ते आजही आपल्याला पाहायला भेटते.
औंढा नागनाथ (नागेश्वरम) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक मंदिर आहे, हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.[३] सध्याचे मंदिर सेउना (यादव) घराण्याने बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.[१] पहिले मंदिर महाभारताच्या काळातील असल्याचे म्हणले जाते आणि पांडवांमधील ज्येष्ठ युधिष्ठिर यांनी ते बांधले होते, जेव्हा त्यांना हस्तिनापूरमधून १४ वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले होते, असे मानले जाते.[२] मंदिराची इमारत औरंगजेबाने पाडण्यापूर्वी ती सात मजली होती असे नमूद केले आहे.[४]
रचना
संपादनया मंदिराची उंची ६० फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमीनीच्या पृष्ठ भागावर या मंदिराची रचना केली केली आहे. तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असतांना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे.
मंदिराचे क्षेत्रफळ ६६९.६० चौरस मीटर (७२०० चौरस फूट) आणि उंची १८.२९ आहे मी (६० फूट)[१][५] मंदिर परिसरात पसरलेले एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०,००० चौ. फूट आहे.[२] धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, मंदिर स्वतःच त्याच्या सुंदर कोरीव कामासाठी पाहण्यासारखे आहे.[२] सध्याच्या मंदिराचा पाया हेमाडपंती स्थापत्यशास्त्रातील आहे, जरी त्याच्या वरच्या भागाची नंतरच्या काळात दुरुस्ती करण्यात आली आणि ती पेशव्यांच्या राजवटीत प्रचलित असलेल्या शैलीत आहे.
ज्योतिर्लिंग जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे ज्यासाठी दोन खोल पायऱ्यांनी प्रवेश करावा लागतो. औंढा नागनाथ परिसरात १२ ज्योतिर्लिंगांची १२ छोटी मंदिरे आहेत. तसेच आवारात १०८ मंदिरे आणि ६८ तीर्थे आहेत, ती सर्व भगवान शिवाची आहेत.[६]
पुनर्बांधकाम
संपादनऔरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिराचे शिखर. अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधले.
आख्यायिका
संपादननामदेव, विसोबा खेचरा आणि ज्ञानेश्वर यांच्या जीवनाशीही मंदिराचा निकटचा संबंध आहे, हिंदू धर्मातील वारकरी पंथाचे पूजनीय संत.
नामदेव त्यांचे गुरू विसोबा खेचरा यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले. त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता. ज्ञानदेव गाथा या ग्रंथानुसार, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरूच्या शोधात औंढा नागनाथाच्या मंदिरात जाण्यास सांगतात. मंदिरात, नामदेवांना विसोबा शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर पाय ठेवून विसावलेले दिसतात. शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवांनी त्यांची निंदा केली. विसोबांनी नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे नामदेवांनी विसोबाचे पाय ठेवले तेथे एक शिवलिंग उगवले. अशा प्रकारे, विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्वव्यापकतेची शिकवण दिली.[७][८]
नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा ते ज्ञानेश्वर, विसोबा खेचरा आणि आणखी काही वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर भजन म्हणत असताना मंदिराच्या पुजारींनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन, त्यांच्या नित्य पूजा आणि प्रार्थनामध्ये व्यत्यय आणत आहे आणि त्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. मंदिराच्या पुजारीने भगत नामदेव यांना अपमानित केले व तो खालच्या जातीचा असून तो मंदिरात का आला असे सांगितले. मग भगत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजने म्हणू लागले. पण देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी आणि मंदिर फिरवले.[९] मंदिराच्या मागील बाजूस नंदी का आहे हे त्या चमत्काराची साक्ष आहे.[९]
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी औंढा नागनाथ मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी या भागात फिरताना आणि नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी बामणीलाही भेट दिली होती. शिख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानले जाते हे येथे नमूद करावे लागेल.[९][१०]
जत्रा
संपादनदरवर्षी येथे हिंदू कालनिर्णयाच्या माघ महिन्यात जत्रा भरते, जी फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते.[११]
संदर्भ
संपादन- ^ a b c Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12. Government Central Press. 1994.
- ^ a b c d "Aundha Nagnath". District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra. 22 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2013 रोजी पाहिले.
- ^ Indo-European Affairs by Naresh K. Pande. 1981. p. 29.
- ^ Imperial Gazetteer of India, Volume 19, Page 417.
- ^ Maharashtra State Gazetteers: Parbhani, 1994 - Page 546
- ^ "Aundha Nagnath". mahatourism.in. 2021-04-22 रोजी पाहिले.
- ^ Schomer p. 225-6
- ^ Ranade p. 189
- ^ a b c Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98
- ^ Guru Nanak in Maharashtra[permanent dead link]
- ^ Bhatt, S. C. (572). Land and People of Indian States and Union Territories: In 36 ..., Volume 16 edited by S. C. Bhatt, Gopal K. Bhargava. ISBN 9788178353722.