एच.के. एक्सप्रेस
हाँग काँग एक्सप्रेस एरवेझ तथा एचके एक्सप्रेस ही चीनमधील हाँग काँग स्थित विमानकंपनी आहे. स्वस्त दरात प्रवासी वाहतूक उपलब्ध करणारी ही कंपनी आशियामधील चीन, मलेशिया, कोरिया, तैवान आणि थायलंडसह नऊ देशांमध्ये विमानसेवा पुरवते. हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी आपल्या ताफ्ताय फक्त एरबस ए३२० प्रकारची विमाने बाळगून आहे.
इतिहास
संपादनहाँग काँग एक्सप्रेस एरवेझ लिमिटेड या कंपनीची नोंदणी १० मार्च, २००४ रोजी झाली. याची मालकी मकाऊमधील कॅसिनो उद्योजक स्टॅन्ली हो याच्याकडे होती. जुलै २००४ मध्ये हेली हाँग काँग या हाँग काँगमधील हेलिकॉप्टर चालक कंपनीने हाँग काँग एक्सप्रेस ही विमानकंपनी सुरू करण्याची घोषणा केली. ही हाँग काँगमध्ये स्थित चौथी विमानकंपनी होती. या कंपनीचा उद्देश चीनमधील प्रादेशिक विमानतळांना तसेच दुय्यम शहरांना विमानसेवा पुरविण्याचा होता. यासाठी एचके एक्सप्रेसने बॉंबार्डिये आणि एम्ब्राएर या विमानोत्पादक कंपन्यांशी ५० आणि ७० आसनी प्रादेशिक जेट विमाने भाडेपट्ट्याने घेण्याचे नियोजन केले होते. एप्रिल २००५मध्ये या कंपनीला हाँग काँगपासून चीनमधील ठराविक शहरांना प्रवासी, मालसामान व टपालसेवा करण्याची परवानगी मिळाली.[१] याचवेळी चीनमधील इतर १५ शहरांना प्रवासी सेवा पुरविण्यासाठी चीन सरकारला अर्ज करण्याची परवानगी मिळाली. कंपनीला मे मध्ये चोंगछिंग, ग्वांगजू, हॉंग्झू, नानकिंग आणि निंग्बो या शहरांना सेवा देण्याची मंजूरी मिळाली.
या एर लाइनकडे विमान चालविण्याचे परवानगीचा दाखला जुलै 2005 मध्ये एम्ब्राएर 170 एर क्राफ्ट चालविण्याचा होता. याच महिन्यात त्यांनी जनरल इलेक्ट्रिक कमर्सियल अवियशन सर्विसेस कडून भाडे तत्त्वाने 76 आसनी ट्विन जेट एम्ब्राएर 170 पहिल्या चारची डिलीवरी घेतली आणि एशिया तिल प्रादेशिक जेट चालविणारे झाले. सन 2005 मध्ये आणखी दोन एर क्राफ्टची डिलिव्हरी घेतली. बांकी मे 2006 मध्ये मिळणार होती. दी. 19 नोवेबर 2005 रोजी हाँग काँग एर ट्रान्सपोर्ट लायसेन्सिंग अथॉरिटी ने वेळापत्रकाप्रमाणे चायनच्या मुख्या 16 ठिकाणासाठी आणखी एक लायसेन्स दिले शिवाय कोह समुई, ओकिनवा, सीम रीप, आणि ताईचेंग साठीही! दी.22-6-2006 रोजी चियंग माई आणि दी.31 जुलै 2006 रोजी चोंग्कींग साठी विमान सेवेचे वेळापत्रकाप्रमाणे अनुक्रमे उद्घाटन केले. दी.23 जानेवरी 2008 रोजी हाँग काँग सिविल एवियशन खात्याने बीजिंग आणि शांघाय साठी विमान उड्डाण सेवेची तिसरी परवानगी दिली. या वाढीव सुविधामुळे बोइंग 737-800 सध्याच्या विमान संचात घेऊन वाढविण्याची त्याच वर्षात घोषणा केली.
किफायतशीर प्रवास सेवेत रूपांतर (LCC TRANSFORMATION)
संपादनदी 26-6-2013 रोजी डेपुटी चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर अँड्रू कोवेन यांचे आदेश्या नुसार हाँग काँग एक्सप्रेस ने विमान सेवेचे किफायतशीर सेवेत रूपांतर करण्याची घोषणा केली आणि “HK EXPRESS” असे नामांतर केले. दी. 27 ऑक्टोबर 2013 रोजी एशियात 5 ठिकाणी हाँग काँग एक्सप्रेसचे किफायतशीर भाडे तत्त्वाचे विमानाचे पहिले उड्डाण[२] झाले. या एर लाइन्स ने त्याच काळात टोकीयो,पेनांग,ओसका,फुकुओका,शेऊल,आणि बूसान हे विमान मार्ग वाढविले.यांची सन 2014 मध्ये विमान संचात अधिक 5 एर बस A320 समाविष्ट करण्याची योजना आहे म्हणजे एकूण 11 एर क्राफ्ट आणि दीर्घ काळासाठी म्हणजेच पुढील 2018 पर्यंत 30 एर बस A320 ठेवण्याची योजना आहे.
गंतव्यस्थाने
संपादनहाँग काँग एक्सप्रेस खालील ठिकाणी विमानसेवा[३] पुरविते.
- सीम रीप आंतरराष्ट्रीय विमानतळ
हाँग काँग -
संपादनहाँग काँग केंद्र
- मगोंग,
- ताईचुंग
विमान संच
संपादनविमान प्रकार | संच | आसन क्षमता |
---|---|---|
एर बस A320-200 | 5 | 174 |
एर बस A320-200 | 7 | 180 |
एकूण | 12 |
सुविधा
संपादनविमानात प्रवाश्यांना खान पान व मध्यपान व्यवस्था खरेदी करून उपलब्ध आहे.इतर ब्रंडेड वस्तु ही त्यात गरम शाल व इतर किटस ही उपलब्ध आहेत.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "नागरी विमान वाहतूक विभाग". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
- ^ "योजना".
- ^ "हॉंगकॉंग एक्सप्रेस एअरलाइन्स सेवा". 2015-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "हॉंगकॉंग एक्सप्रेस ऑगस्ट 2014 पासून विमान सेवा सुरू". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.