अब्दुल रहमान अंतुले

भारतीय राजकारणी


बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले (९ फेब्रुवारी १९२९ - २ डिसेंबर २०१४) हे भारतामधील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले अंतुले मनमोहन सिंग केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री होते.

अ.र. अंतुले

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री
कार्यकाळ
२९ जानेवारी २००६ – इ.स. २००९
मागील -
पुढील सलमान खुर्शीद

लोकसभा सदस्य
कुलाबा साठी
कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील रामशेट ठाकूर
पुढील -
कार्यकाळ
इ.स. १९८९ – इ.स. १९९८
मागील दिनकर पाटील
पुढील रामशेठ ठाकूर

कार्यकाळ
जून ९, इ.स. १९८० – जानेवारी १२, इ.स. १९८२
मागील शरद पवार
पुढील बाबासाहेब भोसले

जन्म ९ फेब्रुवारी, १९२९ (1929-02-09)
रायगड, महाराष्ट्र
मृत्यू २ डिसेंबर, २०१४ (वय ८५)
मुंबई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी नर्गिस अंतुले
अपत्ये १ मुलगा व ३ मुली
धर्म मुस्लिम

रायगड जिल्ह्याच्या आंबेत गावामध्ये जन्मलेल्या अंतुले ह्यांनी मुंबई विद्यापीठलंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये १९६२ सालापासून कार्यरत असलेले अंतुले १९६२ ते १९७६ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. १९७६ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर १९८०मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवर निवडून आले व जून १९८० ते जानेवारी १९८२ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले. १९८२मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम देणे भाग पडले. १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले ९व्या लोकसभेवर निवडून गेले व १९९८ पर्यंत खासदारपदावर राहिले.

२००४ साली १४व्या लोकसभेवर निवडून आल्यानंतर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना रायगड मतदारसंघामधून अनंत गीते ह्यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला.

२ डिसेंबर २०१४ रोजी अंतुले ह्यांचे मुत्रपिंडाच्या विकाराने मुंबई येथे निधन झाले.

बाह्य दुवे

संपादन