इस्लाम

(मुस्लिम धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्लाम हा एक आदम प्रथम पुरूषआहे असे मानणारा धर्म असून अल्लाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. हा धर्म साधारण पणे 1400 वर्षांपासून अस्तित्वात आला. त्याचे अंतिम संदेश आणणारे दुत हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इ.स. ६१० मध्ये अरब़च्या मक्का या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हणले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.

प्रेषित मोहम्मद (इश्वर त्यांच्या वर कृपा करो ) अंतिम पैगम्बर असुन त्यांना पवित्र कुरआन हा देवाचा संदेश मिळाला आहे. त्यांच्या नंतर दिव्य कुरआन मुसलमानांसाठी जिहाद करून मोक्ष प्राप्ति चा एकमेव मार्ग आहे. मुस्लिमांच्या मते इस्लाम एकमेव असा धर्म आहे जो देवाच्या एकमेवतेला मानतो आणि आणि मानवजातीला ऐक्य शिकवतो, असा मुसलमानांचा विश्वास आहे. आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे, याचे चांगले उदाहरण म्हणजे जगातील अतिशय शांततेत व सहिष्णू पणे जगत असणारे जगातील 57 ते 60 मुस्लिम देश हे होय. कारण जिहाद हे इस्लामचे शिक्षण आहे. खरे तर, तो अल्लाहने मागील 1400 वर्षांपासून संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविला, तो ईश्वराच्या एकमेवतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा मूळ संदेश आहे. इस्लाम  अल्लाच्या एकमेवतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करतो. मुसलमान त्यांच्या धर्मा ला इस्लाम म्हणतात. (अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय.) मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेले एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ इस्लाम धर्म पाळणारा माणूस.

इस्लामची  शिकवणूक

संपादन

मनुष्य शुद्ध आणि निर्दोष जन्माला येतात, अशी इस्लामची शिकवणूक आहे.. कोणीही इतरांच्या पापांची जबाबदारी घेत नाही किंवा घेऊ शकत नाही. ज्यांनी पश्चात्ताप केला आहे, त्यांना क्षमाशीलतेचे दरवाजे नेहमीच उघडतात .

इस्लामची तत्त्वे

संपादन
  • अल्लाह हा एकच ईश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. (ला इल्ह् हिल्लल्लाह् )
  • मुहम्मद हे अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत. (महम्मदे रसूल-अल्लाह)
  • दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे
  • आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज) ( शक्य असल्यास)
  • आपल्या मिळकतीतील अडीच% मिळकत गोरगरिबांसाठी दान करणे. (जकात)

कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात.

इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना (अनेकेश्वरवाद) पूजता कामा नये.

मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने (अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी कुर्आन उलगडवले. या कामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुरआन व मुहंमद पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहंमद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या अगोदरचे एकेश्वरवादी आज सनातनी, यहुदी व ख्रिस्ती धर्म या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले, असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माचे मुहम्मदद्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.

इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. ज्यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाला बांधले आहे, अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत.. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.

इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शियासुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून ते एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथांत मोडतात. या सर्व पंथांतही अनेक उपप्रकार आहेत. मुहंमद पैंगबराच्या मृत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्त चौथ्या खलीफाला मानणारे शियापंथीय बनले.

पाच स्तंभ

संपादन

अर्कान अल-इस्लाम أركان الإسلام; अरकान अद-दीन أركان الدين धर्माचे स्तंभ या इस्लाममधील मूलभूत प्रथा आहेत, ज्यांना सर्व मुस्लिमांसाठी उपासना करणे अनिवार्य मानले जाते. गॅब्रिएलच्या हदीसमध्ये त्यांचा सारांश आहे. [] [] [] सुन्नी आणि शिया या कृत्यांच्या कार्यप्रदर्शन आणि सरावाच्या मूलभूत तपशीलांवर सहमत आहेत,[] [] [] परंतु शिया त्यांना त्याच नावाने संबोधत नाहीत (विश्वासाचे अनुषंगिक, बारहासाठी, आणि इस्माईलवादाचे सात स्तंभ पहा). ते आहेत: मुस्लिम पंथ, प्रार्थना, गरिबांना दान, रमजान महिन्यात उपवास आणि जे सक्षम आहेत त्यांच्यासाठी मक्काची तीर्थयात्रा.[] [] []

इस्लामवरील पुस्तके

संपादन
  • करिन-ऐ-जिंदगी
  • सिरत-ऐ-मोहम्मद
  • फैजान-ऐ- सुन्नत
  • इस्लाम ज्ञात आणि अज्ञात (अब्दुल कादर मुकादम)
  • इस्लामी तत्त्वज्ञान आणि मुस्लिम (प्रा. फकरुद्दीन बेन्नूर)
  • इस्लाम एक ऐतिहासिक शोध (मूळ लेखक डॉ. मोहम्मद युनूस, मराठी अनुवाद-मृदुला देशपांडे)[]
  • आधुनिक जगाचा इस्लाम (डाॅ. असगरअली इंजिनिअर)
  • इस्लाम का पैगाम (हिंदी, विनोबा भावे)
  • तलवारीच्या छायेत (एम.जे. अकबर : मराठी अनुवाद :रेखा देशपांडे)
  • इस्लामचे ऐतिहासिक योगदान (मूळ इंग्रजी लेखक - मानवेंद्रनाथ रॉय; मराठी अनुवाद - फ्रा. सुभाष भिंगे)
  • इस्लामचे धर्मनिष्ठ खलीफा (मूळ लेखक डाॅ. माजिद अली खान; मराठी अनुवाद - डाॅ. मीर इसहाक शेख)
  • इस्लामचे विचारवैभव (अनिस चिश्ती)
  • इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन (मुजफ्फर हुसैन)
  • Islam - Maker of the Muslim Mind (शेषराव मोरे)
  • इस्लाम - समज आणि गैरसमज (प्रभा श्रीनिवास)
  • कुपीबंद अमृत (सफीउर रहमान-मराठी अनुवाद मीर इसहाख शेख)
  • इस्लामी संस्कृती (साने गुरुजी)
  • ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा (निळू दामले)
  • गुड मुस्लिम बॅड मुस्लिम (मूळ लेखक-महमूद ममदानी, मराठी अनुवाद-मिलिंद चंपानेरकर)[१०]
  • जिहाद : (हुसैन जमादार)
  • प्रेषित मुहंमद (स) नवयुगाचे प्रणेते - (लेखक:-: सय्यद इफ्तेखार अहमद)
  • भारतीय मुसलमान : शोध आणि बोध (सेतुमाधवराव पगडी)
  • भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास : १८५८ ते १९४७ (मूळ पुस्तक The Indian Muslims लेखक - राम गोपाल; मराठी अनुवाद - कमल पाध्ये)
  • मध्ययुगीन मुस्लिम विद्वान (सरफराज अहमद)
  • महात्मा आणि मुसलमान (प्रा. यशवंत गोपाळ भावे)
  • मुस्लिम मनाचा शोध (शेषराव मोरे)
  • मुस्लिम जगत-एक दृष्टिक्षेप (डाॅ. प्रमोद पाठक)
  • मुस्लिम बलुतेदार (तमन्ना इनामदार)
  • मुस्लिमद्वेष मोहीम : वस्तुस्थितीच्या शोधात (स.मो. दहिवले)
  • मुस्लिम प्रश्नांची गुंतागुंत (विलास सोनवणे)
  • सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान (रफिक झकेरिया)

देखील पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Pillars of Islam". Oxford Centre for Islamic Studies. United Kingdom: Oxford University. 2017-04-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-11-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Five Pillars". United Kingdom: Public Broadcasting Service (PBS). 2011-06-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-11-17 रोजी पाहिले.
  3. ^ "The Five Pillars of Islam". Canada: University of Calgary. 2017-06-07 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-11-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Islam Fast Facts". 12 November 2013.
  5. ^ "The Five Pillars of Islam". United Kingdom: BBC. 2010-11-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-11-17 रोजी पाहिले.
  6. ^ Hooker, Richard (July 14, 1999). "arkan ad-din the five pillars of religion". United States: Washington State University. 2010-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-11-17 रोजी पाहिले.
  7. ^ "Religions". The World Factbook. United States: Central Intelligence Agency. 2010. 2016-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-25 रोजी पाहिले.
  8. ^ Hajj
  9. ^ "Islam Eak Aitihasik Shodh by Muhammad Yunus - Book Buy online at Akshardhara". Akshardhara (इंग्रजी भाषेत). 2020-05-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-30 रोजी पाहिले.
  10. ^ "गुड मुस्लिम बॅड मुस्लिम-Good Muslim Bad Muslim (Marathi) by Mahmood Mamdani - Rohan Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-01-30 रोजी पाहिले.