२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक

२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे सुरू केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची बारावी आवृत्ती ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान न्यू झीलंडमध्ये झाली. न्यू झीलंडमध्ये महिला क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी १९८२ आणि २००० साली न्यू झीलंडमध्ये विश्वचषक झाला होता. मूलत: स्पर्धा ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित केली जाणार होती परंतु कोव्हिड-१९ रोगाच्या फैलावामुळे स्पर्धा १ वर्ष पुढे ढकलण्यात आली. यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या आठ देशांनी सदर विश्वचषकात सहभाग घेतला. पैकी बांगलादेशने महिला विश्वचषक पदार्पण केले.

२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक
तारीख ४ मार्च – ३ एप्रिल २०२२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान न्यूझीलंड न्यू झीलंड
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
सहभाग
सामने ३१
मालिकावीर ऑस्ट्रेलिया अलिसा हीली
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया अलिसा हीली (५०९)
सर्वात जास्त बळी इंग्लंड सोफी एसलस्टोन (२१)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०१७ (आधी) (नंतर) २०२५

न्यू झीलंड संघ स्पर्धेचा यजमान म्हणून आपोआप पात्र ठरला. मूलत: २०१७-२० आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेमधून आणखी तीन संघ पात्र ठरतील असे ठरले असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये हा निर्णय बदलला गेला आणि सर्वोत्तम ४ संघ + स्पर्धेचा यजमान अस ठरवलं गेल. २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रतामधून आणखी ३ संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते. १२ मे २०२० रोजी आयसीसीने कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे पात्रता स्पर्धा जी ३-१४ जुलै २०२० दरम्यान श्रीलंकेत होणार होती ती अनिश्चित काळाकरता पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली. पात्रता स्पर्धा नोव्हेंबर २०२१ मध्ये झिम्बाब्वेमध्ये हलवण्यात आली. परंतु पुन्हा एकदा कोव्हिड-१९ पसरल्यामुळे पात्रता स्पर्धा अर्ध्यातूनच रद्द करावी लागली. महिला एकदिवसीय क्रमवारीनुसार विश्वचषकातील शेष तीन जागा भरवल्या गेल्या.

ऑस्ट्रेलियाने पहिले ६ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. पाठोपाठ पहिल्या ६ सामन्यांमध्ये ४ विजयांसह दक्षिण आफ्रिका देखील उपांत्य फेरीस पात्र ठरला. इंग्लंडने शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. गट फेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भारतावरील विजयामुळे ७ गुणांसह वेस्ट इंडीज चौथे स्थान पटकावत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात अलिसा हीलीच्या १७० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत सातव्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाच्याच अलिसा हीलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. तिने स्पर्धेतील सर्वाधिक ५०९ धावा केल्या. तर २१ बळी घेऊन इंग्लंडची सोफी एसलस्टोन ही स्पर्धेत आघाडीची गोलंदाज ठरली.

सहभागी देश

संपादन

२७ नोव्हेंबर २०२१ रोजी आफ्रिका खंडात कोव्हिड-१९ पसरायला लागल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने पात्रता स्पर्धा रद्द केली. महिला वनडे क्रमवारीच्या आधारे शेष तीन जागांसाठी बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज हे तीन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले.

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
  न्यूझीलंड यजमान, महिला अजिंक्यपद स्पर्धा १२ २०१७ विजेते (२०००)
  ऑस्ट्रेलिया महिला अजिंक्यपद स्पर्धा १२ २०१७ विजेते (१९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५, २०१३)
  इंग्लंड १२ २०१७ विजेते (१९७३, १९९३, २००९, २०१७)
  भारत १० २०१७ उपविजेते (२००५, २०१७)
  दक्षिण आफ्रिका २०१७ उपांत्यफेरी (२०००, २०१७)
  बांगलादेश विश्वचषक पात्रता स्पर्धा
महिला वनडे क्रमवारी
पदार्पण पदार्पण पदार्पण
  पाकिस्तान २०१७ सुपर सिक्स(२००९)
  वेस्ट इंडीज २०१७ उपविजेते(२०१३)

मैदाने

संपादन

११ मार्च २०२० रोजी आयसीसीने मैदानांची घोषणा केली. क्राइस्टचर्च शहरातील हॅगले ओव्हलवर अंतिम सामना खेळविण्यात आला.

क्राइस्टचर्च ऑकलंड माऊंट माउंगानुई हॅमिल्टन वेलिंग्टन ड्युनेडिन
हॅगले ओव्हल ईडन पार्क बे ओव्हल सेडन पार्क बेसिन रिझर्व युनिव्हर्सिटी ओव्हल
प्रेक्षक क्षमता: १८,००० प्रेक्षक क्षमता: ४२,००० प्रेक्षक क्षमता: १०,००० प्रेक्षक क्षमता: १०,००० प्रेक्षक क्षमता: ११,६०० प्रेक्षक क्षमता: ३,५००
           

सर्व संघांनी प्रत्येकी १५ खेळाडूंची पथके जाहीर केली. ६ जानेवारी २०२२ रोजी खेळाडूंचे पथक जाहीर करणारा भारत पहिला देश ठरला. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी, आयसीसीने स्पर्धेसाठी खेळण्याच्या अटी जाहीर केल्या, ज्याने संघात कोविड-१९चा उद्रेक झाल्यास केवळ नऊ खेळाडू असल्यास सामने खेळण्याची परवानगी दिली.

स्पर्धा प्रकार

संपादन

सर्व संघांनी प्रतिस्पर्धी संघाबरोबर एक सामना खेळला. गट फेरीमध्ये प्रत्येक संघासाठी ७ सामने निश्चित होते. गुणफलकातील सर्वोच्च चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. पहिला उपांत्य सामना हॅगले ओव्हल, दुसरा उपांत्य सामना बेसिन रिझर्व आणि अंतिम सामना इडन पार्क वर झाला.

सराव सामने

संपादन

सामनाधिकारी

संपादन

सामनाधिकारी

संपादन

गट फेरी

संपादन

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  ऑस्ट्रेलिया १४ १.२८३ उपांत्य फेरीसाठी पात्र
  दक्षिण आफ्रिका ११ ०.०७८
  इंग्लंड ०.९४९
  वेस्ट इंडीज -०.८८५
  भारत ०.६४२ स्पर्धेतून बाद
  न्यूझीलंड ०.०२७
  बांगलादेश -०.९९९
  पाकिस्तान -१.३१३


सामने

संपादन


२० मार्च २०२२
धावफलक
न्यूझीलंड  
२०३ (४८.५ षटके)
वि
  इंग्लंड
२०४/९ (४७.२ षटके)


बाद फेरी

संपादन
  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
   ऑस्ट्रेलिया ३०५/३ (४५ षटके)  
   वेस्ट इंडीज १४८ (३७ षटके)  
       ऑस्ट्रेलिया ३५६/५ (५० षटके)
     इंग्लंड २८५ (४३.४ षटके)
   दक्षिण आफ्रिका १५६ (३८ षटके)
   इंग्लंड २९३/८ (५० षटके)  

१ला उपांत्य सामना

संपादन

विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना ३० मार्च रोजी झाला. पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला. वेस्ट इंडीज महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज राचेल हेन्स आणि अलिसा हीली या दोघींनी पहिल्या गड्यासाठी तब्बल २१६ धावांची भागीदारी रचली. राचेल हेन्स हिने १०० चेंडूमध्ये ८५ धावा केल्या तर अलिसा हीली हिने १०७ चेंडूमध्ये १२९ धावांची शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ४५ षटकांमध्ये ३ गड्यांच्या मोबदल्यात ३०५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने मंद सुरुवात केली. कर्णधार स्टेफनी टेलर हिने सर्वाधिक ४८ धावा केल्या. वेस्ट इंडीजचे अखेरचे दोन फलंदाज छिनेल हेन्री आणि अनिसा मोहम्मद हे फलंदाजी करु न शकल्याने वेस्ट इंडीज १४८ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने सामना १५७ धावांनी जिंकत दणक्यात अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवला. शतकवीरांगना अलिसा हीली हिला सामनाविरांगनेचा पुरस्कार देण्यात आला.


२रा उपांत्य सामना

संपादन

हॅगले ओव्हल इथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे इंग्लंडने तुफान फलंदाजी करत ८ गड्यांच्या मोबदल्यात २९३ धावा केल्या. डॅनियेल वायट हिने १२९ धावांची शतकी खेळी केली. धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे तीनतेरा उडाले. सलामी फलंदाज लवकर बाद झाले. सोफी एसलस्टोन हिच्या ६ बळींच्या जोरावर ३८व्या षटकामध्येच दक्षिण आफ्रिकेचा डाव १५६ धावांवर आटोपला. विद्यमान जगज्जेते इंग्लंडने पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.


अंतिम सामना

संपादन

विद्यमान विजेते इंग्लंडने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन फलंदाज अलिसा हीली हिने तडाखेबंद फलंदाजी करत १७० धावांची अजरामर खेळी केली. हीलीच्या १७० धावा या पुरुष अथवा महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा आहे. ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकांमध्ये ३५६ धावा केल्या. डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. परंतु नंतर नॅटली सायव्हर हिने एकीकडून किल्ला लढवत ठेवून नाबाद १४८ धावा केल्या परंतु तेवढ्या पुरेश्या नव्हत्या. इंग्लंडचा डाव २८५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक आपल्या नावावर केला.

आकडेवारी

संपादन

सर्वाधिक धावा

संपादन
खेळाडू सामने डाव धावा सरासरी स्ट्रा.रे. सर्वो. धावा १०० ५० चौकार षटकार
  अलिसा हीली ५०९ ५६.५५ १०३.६६ १७० ६९
  राचेल हेन्स ४९७ ६२.१२ ८२.५५ १३० ५७
  नॅटली सायव्हर ४३६ ७२.६६ ९२.९६ १४८* ४७
  लॉरा वॉल्व्हार्ड ४३३ ५४.१२ ७७.७३ ९० ४६
  मेग लॅनिंग ३९४ ५६.२८ ८८.७३ १३५* ४४

सर्वाधिक बळी

संपादन
खेळाडू सामने डाव बळी षटके इकॉ. सरासरी सर्वो. गोलंदाजी स्ट्रा.रे. ४ गडी ५ गडी
  सोफी एसलस्टोन २१ ८५.३ ३.८३ १५.६१ ६/३६ २४.४
  शबनिम इस्माइल १४ ६०.५ ४.०२ १७.५० ३/२७ २६.०
  जेस जोनासन १३ ६०.३ ४.०४ १८.८४ ३/५७ २७.९
  अलाना किंग १२ ६५ ४.५२ २४.५० ३/५९ ३२.५
  मेरिझॅन कॅप १२ ६६.३ ४.७३ २६.२५ ५/४५ ३३.२