बे ओव्हल
बे ओव्हल (ब्लेक पार्क ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते) हे न्यू झीलंडमधील माऊंट माउंगानुई प्रदेशातील एक क्रिकेटचे मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | तौरंगा, माऊंट माउंगानुई |
गुणक | 37°39′10.13″S 176°11′26.65″E / 37.6528139°S 176.1907361°Eगुणक: 37°39′10.13″S 176°11′26.65″E / 37.6528139°S 176.1907361°E |
स्थापना | २००७ (नोंदवला गेलेला पहिला सामना) |
आसनक्षमता | १०,००० |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम ए.सा. |
२८ जानेवारी २०१४: कॅनडा वि. नेदरलँड्स |
अंतिम ए.सा. |
५ जानेवारी २०१६: न्यूझीलंड वि. श्रीलंका |
प्रथम २०-२० |
७ जानेवारी २०१६: न्यूझीलंड वि. श्रीलंका |
अंतिम २०-२० |
८ जानेवारी २०१७: न्यूझीलंड वि. बांगलादेश |
यजमान संघ माहिती | |
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स महिला संघ (२००५-सद्य) नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स (१९८७-सद्य) | |
शेवटचा बदल १२ मार्च २०१७ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
इतिहास
संपादनपूर्वी ब्लेक पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,[१] ह्या मैदानावर पहिला लिस्ट अ सामना १९८७/८८ मध्ये शेल चषक स्पर्धेदरम्यान नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स आणि सेंट्रल डिस्ट्रिक्ट दरम्यान खेळवला गेला. १९८० आणि ९० च्या दशकात एक-दिवसीय सामन्यांसाठी ह्या मैदानावर सुटीच्या दिवशी प्रेक्षक मोठ्या संख्येने जमा झाले होते,[२] त्यावेळी १९८७/८८ ते २००१/०२ मोसमादरम्यान मैदानावर २६ लिस्ट अ सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.[३] नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स महिला संघ २००४/०५ मध्ये राज्यस्तरीय लीग स्पर्धेत दोन सामने खेळला आहे.[४]
नंतर द बे ऑफ प्लेंटी क्रिकेट असोसिएशनने ब्लेक पार्कवर नवीन क्रिकेट मैदान तयार केले, बे ओव्हल, ज्यावर वरिष्ठ संघाचा पहिला सामना २००८-०९ राज्य ट्वेंटी२० स्पर्धेदरम्यान नॉर्दन डिस्ट्रिक्ट्स आणि ओटॅगो संघांदरम्यान खेळवला गेला. त्या स्पर्धेत आणखी एक ट्वेंटी२० सामना ह्या मैदानावर खेळवला गेला, त्यानंतरच्या मोसमात २००९-१० एचआरव्ही चषक स्पर्धेतील तीन सामने आणि २०१०-११ एचआरव्ही चषक स्पर्धेतील दोन सामने ह्या मैदानावर खेळवले गेले.[५]
२०११-१२ फोर्ट चषक स्पर्धेतील दोन सामन्यांसोबत, २०१०-११ एचआरव्ही चषक स्पर्धेतील चार ट्वेंटी२० सामने येथे खेळवले गेले. डिसेंबर २०११ मध्ये ॲक्शन क्रिकेट चषक स्पर्धेतील नॉर्दन डिस्ट्रिक्ट्स महिला संघाचे सामने येथे आयोजित केले गेले होते. बे ओव्हलवर प्रथम वर्गीय क्रिकेट सामने खेळविण्यास सुद्धा परवानगी आहे.[२]
बे ओव्हलवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २८ जानेवारी २०१४ मध्ये कॅनडा आणि नेदरलँड्स ह्या संघांदरम्यान २०१४ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचा एक भाग म्हणून खेळवला गेला.
ऑक्टोबर २०१४ मध्ये, दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशातील एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने ह्या मैदानावर खेळवले गेले, परंतु २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी हे मैदान वापरले गेले नाही. २०१६ च्या सुरुवातीला बे ओव्हलवर न्यूझीलंड आणि श्रीलंका संघांदरम्यान एकदिवसीय आणि टी२० सामने आयोजित केले गेले होते.
मैदानावर पहिला कसोटी सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांदरम्यान जानेवारी २०२० मध्ये खेळवला जाईल.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "मैदान माहिती: ब्लेक पार्क". १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "ब्लेक पार्कवर ट्वेंटी२० क्रिकेट सामने होणार". ४ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|मृत दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्हदुवा=
ignored (सहाय्य) - ^ "ब्लेक पार्कवर खेळवले गेलेले लिस्ट अ सामने". १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड महिला स्थानिक लीग सामने ब्लेक पार्क, माऊंट माउंगानुईवर खेळवले जाणार". १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बे ओव्हल, माऊंट माउंगानुईवर खेळवले गेलेले ट्वेंटी२० सामने". १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.