२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा
साचा:माहितीचौकट ॲथलेटिक्स स्पर्धा
२० वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा पुणे, भारत येथे ३-७ जुलै दरम्यान आयोजित केली गेली[१].
चेन्नईने यजमानपद नाकारल्यानंतर दिल्लीनेआणि झारखंडनेही या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले नाही. परंतु महाराष्ट्राने १२ जून २०१३ या दिवशी स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने या स्पर्धेसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे[२]
२०व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना यावर्षी ऑगस्टमध्ये मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.
लेझीम, पोवाडा, लावणी आदी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे प्रतिबिंब असलेल्या उद्घाटन सोहळ्याने पुण्यात मंगळवारी २०व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेस प्रारंभ होणार झाला. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी पुणे-बालेवाडी येथील शिव छत्रपती स्टेडियमवर केले. उद्घाटन प्रसंगी ४३ देशांच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ८००० पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या उद्घाटन समारंभात महाराष्ट्राच्या विविध कलासंस्कृतीची ओळख परदेशी खेळाडूंना करून दिली गेली. साधारणपणे एक तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम, पोवाडा, लावणी, कोळीनृत्य, आसामचे बिहू नृत्य, कथकली, मुजरा नृत्य, बॉलिवूडचे नृत्य आदींचा समावेश होता. त्याखेरीज मलखांब, योगासने, दांडपट्टा याचीही प्रात्यक्षिके सादर केली गेली. लेट्स प्ले स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडे या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कार्यक्रमात मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आदी ठिकाणची साडेतीनशे मुले-मुली सहभागी झाली.