दुती चंद
दुती चंद (जन्म ३ फेब्रुवारी १९९६ जाजपूर, ओडिशा) ही एक भारतीय व्यावसायिक धावपटू आणि महिलांच्या १०० मीटर स्पर्धेत सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. उन्हाळी ऑलिंपिक खेळांमध्ये महिलांच्या १०० मीटर शर्यतीसाठी पात्र ठरणारी ती तिसरी भारतीय महिला आहे.[१][२]
ती १०० मीटर स्पर्धेत राष्ट्रीय विजेती आहे. (आय.ए.ए.एफ) हायपरअँड्रोजेनिझम नियमांमुळे एकेकाळी बाहेर बसण्यास भाग पाडलेली चंद, पीटी उषाने १९८० च्या मॉस्को ऑलिंपिकमध्ये भाग घेतल्याच्या ३६ वर्षांनंतर, २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या १०० मीटर स्पर्धेसाठी पात्र ठरली.[३]
माघील जीवन
संपादनचंद यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९९६ रोजी चक्रधर चंद आणि अखुजी चंद यांच्याकडे ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील चका गोपालपूर गावात झाला. ती दारिद्र्यरेषेखालील विणकर कुटुंबातील आहे.तिचा प्रेरणास्रोत तिची मोठी बहीण सरस्वती चंद आहे, जिने राज्य स्तरावर धावण्याची स्पर्धा केली होती. चांद आणि तिची मोठी बहीण सरस्वती यांनी २००६ मध्ये सरकारी क्रीडा वसतिगृहात प्रवेश घेतला.[४]
कारकीर्द
संपादन२०१२-२०१३
संपादन२०१२ मध्ये, दुती चंद 18 वर्षांखालील गटात राष्ट्रीय चॅम्पियन बनली, जेव्हा तिने १०० मीटर स्पर्धेत ११.८५ सेकंद पूर्ण केले.
२०१७-सध्याचे
संपादन२०१७ मध्ये, आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने भुवनेश्वर येथे श्राबानी नंदा, मर्लिन के जोसेफ आणि हिमश्री रॉय यांच्यासह दोन कांस्यपदके जिंकली, एक महिलांच्या १०० मीटरमध्ये, दुसरी महिला ४ × १०० मीटर रिलेमध्ये.
२०१८ आशियाई खेळांमध्ये, महिलांच्या १०० मीटर फायनलमध्ये, चंदने २६ ऑगस्ट रोजी ११.३२ सेकंदांसह रौप्य पदक जिंकले, तिचे पहिले आशियाई खेळ पदक.
संदर्भ
संपादन- ^ Aug 31, TNN /; 2018; Ist, 13:05. "asian games 2018: Cash awards by state governments for Asian Games medal winners | Asian Games 2018 News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-17 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Santhi Urges Establishment to Help Sidelined Dutee". The New Indian Express. 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "Undeterred Dutee Chand sticks to her track, makes it to Rio Olympics in 100 meters category". The New Indian Express. 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "Indian sprinter Dutee Chand defies the odds to make Rio 100m" (इंग्रजी भाषेत). 2016-06-25.