१९९४ ऑस्ट्रेलेशिया चषक
१९९४ ऑस्ट्रेलेशिया चषक (किंवा १९९४ पेप्सी ऑस्ट्रेलेशिया चषक) ही १२ ते २२ एप्रिल १९९४ या कालावधीमध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. ऑस्ट्रेलेशिया चषक मालिकेतील ही तृतीय व अखेरची आवृत्ती होती. ही स्पर्धा आशिया आणि ऑस्ट्रेलेशिया या खंडातील क्रिकेट खेळाणाऱ्या प्रमुख देशांसाठी भरवली गेली होती. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. सर्व सामने शारजाह मधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले. १९९४ आय.सी.सी. चषकद्वारे १९९६ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीने या स्पर्धेत सहभाग घेतला. संयुक्त अरब अमिरातीने त्यांचे पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले.
१९९४ ऑस्ट्रेलेशिया चषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | बाद फेरी | ||
यजमान | संयुक्त अरब अमिराती | ||
विजेते | पाकिस्तान (३ वेळा) | ||
सहभाग | ६ | ||
सामने | ९ | ||
मालिकावीर | आमिर सोहेल | ||
सर्वात जास्त धावा | आमिर सोहेल (२७४) | ||
सर्वात जास्त बळी | जवागल श्रीनाथ (१०) | ||
|
सहभागी देशांना तीन संघांच्या दोन गटात विभागले. दोन्ही गटामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवत सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकला. पाकिस्तानच्या आमिर सोहेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक २७४ धावा करत आघाडी फलंदाज ठरला. तर सर्वाधिक १० गडी मिळवत भारताचा जवागल श्रीनाथ आघाडीचा गोलंदाज ठरला.
गट स्टेज
संपादनगट अ
संपादनसंघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | निना | धावगती | गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | २ | २ | ० | ० | ० | ५.४५३ | ४ |
भारत | २ | १ | १ | ० | ० | ५.०९८ | २ |
संयुक्त अरब अमिराती | २ | ० | २ | ० | ० | ३.४७६ | ० |
वि
|
||
मजहर हुसेन ७० (११२)
भूपिंदर सिंग ३/३४ (१० षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अतुल बेदाडे आणि भूपिंदर सिंग (दोन्ही भारत), आणि संपूर्ण संयुक्त अरब अमिराती संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
गट ब
संपादनसंघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | निना | धावगती | गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | २ | २ | ० | ० | ० | ४.३२३ | ४ |
न्यूझीलंड | २ | १ | १ | ० | ० | ४.२४० | २ |
श्रीलंका | २ | ० | २ | ० | ० | ३.७०९ | ० |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मायकेल बेवन आणि जस्टिन लँगर (दोन्ही ऑस्ट्रेलिया), आणि उपुल चंदना आणि मंजुला मुनासिंघे (दोन्ही श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मार्क डग्लस (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हीथ डेव्हिस (न्यू झीलंड) आणि अजित वीराकोडी (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
बाद फेरी
संपादनउपांत्य सामने | अंतिम सामना | ||||||
१९ एप्रिल | |||||||
ऑस्ट्रेलिया | २४४/९ | ||||||
भारत | २४५/३ | ||||||
२२ एप्रिल | |||||||
पाकिस्तान | २५०/६ | ||||||
भारत | २११
| ||||||
२० एप्रिल | |||||||
पाकिस्तान | ३२८/२ | ||||||
न्यूझीलंड | २६६/७ |
उपांत्य फेरी
संपादनवि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
आडम परोरे ८२ (१०२)
वसीम अक्रम २/५० (१० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम
संपादनवि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.