१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
दिनांक | १० मे १८५७ - २० जून १८५८ |
---|---|
स्थान | उ.भारतीय मैदानी प्रदेश, बंगाल |
परिणती | ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात शिपायांचा उठाव दडपला गेला मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्यांचा शेवट ब्रिटीश राणीचा अंमल सुरू |
युद्धमान पक्ष | |
---|---|
ईस्ट इंडिया कंपनीचे बंडखोर शिपाई मुघल ग्वाल्हेर संस्थान झांंशी संस्थान मराठा साम्राज्य |
ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश साम्राज्य भारतातील युरोपीय नागरिक २१ भारतीय संस्थाने नेपाळचे साम्राज्य |
सेनापती | |
बहादूरशहा दुसरा नानासाहेब पेशवा 2 राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे बख्त खान बेगम हजरत महल कुंवरसिंघ |
इंग्रजी सेनाधिकारी
|
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.
१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.
१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.
उठावाची कारणेसंपादन करा
बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.
कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.
कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.
१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.
१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)संपादन करा
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.
आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’
अन्य पुस्तकेसंपादन करा
- अठराशे सत्तावन्न आणि मराठी कादंबरी (प्रमोद मुनघाटे)
- १८५७ चा जिहाद (शेषराव मोरे)
- १८५७ चा प्रस्फोट (ज.द. जोगळेकर)
- १८५७ ची यशोगाथा (अनिल गोडबोले)
- १८५७ चे आणखी काही पैलू (सेतुमाधवराव पगडी)
- १८५७ चे स्वातंत्र्यसमर (वि.दा. सावरकर)
- १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील तात्या टोपे (डॉ. पद्माकर प्रभाकर जोशी)
- १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील सेनानी नानासाहेब पेशवे (डॉ. पद्माकर प्रभाकर जोशी)
- १८५७ : बंडाचा वणवा (कादंबरी, लेखक - परशुराम सदाशिव देसाई, वरदा प्रकाशन)
- इंग्रजांच्या दृष्टिकोनातून १८५७ चा प्रस्फोट (ज.द. जोगळेकर)
- रणसंग्राम १८५७ चा - भाग १, २ (कॅप्टन राजा लिमये)