श्री सिद्धारूढ स्वामी कर्नाटकातील हुबळी ह्या शहरी संत होऊन गेले. तेथे त्यांचा आश्रम (सिद्धाश्रम) तसेच त्यांची समाधी आहे.

गुरूशांतप्पा (वडील) आणि देवमल्लम्मा (आई)(काही लोक फक्त मल्लम्मा असेसुद्धा म्हणतात)ह्या दंपतीच्या पोटी त्यांचा जन्म इ.स. १८३६ साली चळकापूर (बीदर जिल्हा) या गावी कर्नाटकात झाला.

श्री सिद्धारुढ स्वामींचे शिष्य श्री शिवराम चंद्रगिरी ह्यांनी लिहिलेल्या "श्री सिद्धरूढ कथामृत" अनुसार स्वामी निजामाच्या राज्यातील वंशदुर्ग ह्या ठिकाणी शके १७५८ मध्ये दुर्मुखनाम संवत्सरात[] मध्ये जन्मले .

त्यांचे जन्मस्थान बिदरकोटी आहे असेसुद्धा सांगितले जाते.[ संदर्भ हवा ]

बालपण

संपादन

अगदी लहानपणापासून त्यांनी आध्यात्मिक शास्त्रामध्ये रुची दाखवायला सुरुवात केली. तसेच बालपणीच गुरूदीक्षा घेण्यापूर्वीच अनेक चमत्कार केले. एकदा अगदी लहान असताना त्यांनी म्हैस न हलल्याने तिला शाप दिला त्यासरशी ती मरून पडली; परंतु त्यांच्या आईच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या म्हशीला पुन्हा जिवंत केले.

त्यांच्या कुटुंबाचे कुलगुरू श्री वीरभद्रस्वामी हे दररोज त्यांच्या घरी येऊन त्या दंपतीकरिता प्रवचन आणि धार्मिक चर्चा करीत, त्यावेळी ते त्यांना अनेक प्रश्न विचारीत. एकदा वीरभद्रस्वामींनी त्यांना प्रवचनात सांगितले की प्रलय झाल्यावर संपूर्ण पृथ्वी, पंचमहाभूते, स्वर्ग तसेच अन्य लोक (जेथे देवता राहतात)सुद्धा पाण्यात बुडून जातील आणि नष्ट होतील; प्रत्येक मनुष्यप्राणी नष्ट होईल. कुलगुरूंचे शब्द ऐकून बालसिद्ध म्हणाला, "आकाश कसे नष्ट होईल?" आश्चर्याने थक्क झालेल्या वीरभद्रस्वामींनी त्याला सांगितले की ह्या प्रश्नाचे उत्तर केवळ सदगुरूच देऊ शकतील. हे ऐकून बाळसिद्धाने सदगुरूचा शोध घेण्याकरिता अल्पवयातच घर सोडले.

सद्गुरूंचा शोध

संपादन

पहिल्याप्रथम ते श्रीशैल येथे गेले; तेथे त्यांना कळले की आध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर अधिकारी तसेच कट्टे मठाचे प्रमु़ख असलेले सत्पुरुष श्री गजदंडस्वामी हे गुडगंटी या गावी राहतात. बाळसिद्ध गुडगंटी येथे गेला आणि श्रीगजदंडस्वामींना भेटला; त्यांनी सिद्धाची परीक्षा घेतल्यानंतर त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारला. सदगुरूंच्या आश्रमामध्ये सदगुरूंचीच नव्हे तर त्यांच्या शिष्यांचीदेखील कामे ते करत.सदगुरूंच्या आश्रमाची झाडलोट, नदीवर जाऊन त्यांचे व शिष्यांचे कपडे धुणे, स्वयंपाक करणे, घोड्यांच्या तबेल्यातील लीद स्वतःच्या हाताने काढून तबेला स्व्च्छ ठेवणे, भांडी घासणे, स्वयंपाकाकरिता लाकडे आणणे इत्यादी सर्व कामे ते आनंदाने करीत; याव्यतिरिक्त उरलेला सर्व वेळ ते शास्त्रांचा सखोल अभ्यास तसेच चिंतन व मनन करण्यात घालवीत. ते गुरुगृहात ते कधीही जेवण घेत नसत; दररोज पाच घरी भिक्षा मागून घेऊन त्यावर ते स्वतःचा उदरनिर्वाह चालवीत. ते कधीही गुरूच्या नजरेला नजर देऊन बोलत नसत. गुरुगृही असतानाच सुब्बय्यशास्त्री नावाच्या एका ब्राह्मणाने गजदंडस्वामींच्या सभेत येऊन मुद्दाम "'उपनिषद' या शब्दाची कोणी खरोखर व्याख्या करू शकतो काय?" असा प्रश्न उद्दामपणे विचारला; त्यावेळी गुरूंची आज्ञा घेऊन सिद्धांनी अतिशय समर्पपपणे 'उपनिषद' या शब्दांची व्याख्या सांगितली आणि सुब्बय्यशास्त्रींचा अहंकार नाहीसा केला.

अभ्यास

संपादन

ह्याच्याव्यतिरिक्त त्यांचा आध्यात्मिक अभ्यासदेखील अविरत चालला होता. सर्व शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी केला. गजदंडस्वामींनी त्यांना 'सिद्धारूढ' (म्हणजे सात्त्विक, राजसी, तामसी हे त्रिगुण आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू ह्यांच्यावर आरूढ झालेला अर्थात त्यांच्यावर विजय मिळविलेला) हे नाव बहाल केले आणि सर्व भारतभर तीर्थयात्रा करून लोकोद्धार करण्याचा आदेश दिला.

गजदंडस्वामींचा आश्रम सोडण्यापूर्वी त्यांनी गळ्यातील इष्टलिंग काढून तेथेच ठेविले आणि ते यात्रेला निघाले. या यात्रेमध्ये ते अखंड भारत हिंडले; काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ते पायी चालत प्रत्येक तीर्थक्षेत्राला भेट देत आणि वाटेतील भक्तांच्या, मुमुक्षूंच्या वेदांतशास्त्रातील तसेच साधनेतील अडीअडचणी दूर करून त्यांना मोक्षमार्गी लावीत. आत्मज्ञानप्राप्ति हेच मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय असून त्याने ते प्राप्त करण्याकरिता अखंड परिश्रम करावेत असे ते सांगत. ==कार्य सर्व तीर्थयात्रा संपवून शेवटी ते कर्नाटकातील हुबळी ह्या शहरी येऊन शहराबाहेरील मोकळ्या जागी येऊन स्थिरावले आणि निर्वाणापर्यंत तेथे राहिले.

निजगुण योगी ह्यांनी लिहिलेल्या पाच आध्यात्मिक ग्रंथांचे त्यांनी जनकल्याणाकरिता पुन्हा प्रकाशन करविले.

गळ्यात इष्टलिंग घालत नसल्याने तसेच जातिपंथभेदाचा विचार न करता सर्वांना "ऊँ नमः शिवाय," ह्या परमपवित्र पंचाक्षरी मंत्राचा उपदेश देऊन पावन करीत असल्याचे पाहून रुढीवादी लोकांनी त्यांचा अनन्वित छळ केला,[ संदर्भ हवा ] परंतु त्यांनी सर्व छळ आणि अपमान सोसून भक्त तसेच अभक्त ह्यांचा एकसारखाच उद्धार केला[ व्यक्तिगतमत ].

त्यांनी अद्वैत तत्त्वाचा प्रसार केला आणि स्वस्वरूप प्राप्त करण्याकडे भक्तांनी लक्ष पुरवावे म्हणून कष्ट घेतले; भारतातील सर्व जातिधर्मांच्या आणि पंथांच्या लोकांत त्यांचे भक्त आहेत [ व्यक्तिगतमत ].

त्यांनी भक्तांच्या भौतिक गरजा तसेच आध्यात्मिक उन्नतीकरिता अनेक अगाध आणि अगम्य असे चमत्कार केले. ते १६व्या शतकात होऊन गेलेल्या निजगुण शिवयोगी ह्या प्रख्यात संत-तत्त्वज्ञाचा अवतार होत.[ संदर्भ हवा ] अद्वैत-चक्रवर्ती अशी त्यांची कीर्ती [ व्यक्तिगतमत ]होती. लोकांना त्यांच्या धार्मिक चर्चा तसेच प्रवचनाचा फायदा झाला.

रथोत्सव

संपादन

शिवरात्रीच्या निमित्ताने एक फार मोठा रथोत्सव सिद्धाश्रमात साजरा होत असेसाचा:अपूर्ण माहिती. त्यावेळी भक्तमंडळी स्वामींना वस्त्रालंकार तसेच सोन्याचा मुकुट घालून रथात बसवून तो रथ दोरखंडांनी ओढीत असत. शिवरात्रीपूर्वी सात दिवस उत्सवाला सुरुवात होत असे आणि रथोत्सवानंतर उत्सवाची सांगता होत असे. ह्या उत्सवानिमित्त हजारो भक्तजन आणि गोरगरिबांना पोटभ‍र जेवण मिळत असे. हे जेवण उघड्या अशा स्वयंपाकघरांमध्ये शिजवीत असत. त्याला कन्नडमध्ये दसोह असे म्हणतात.

शिष्या श्रीमती रुक्माबाई मल्लापूर

संपादन

त्यांच्या प्रख्यात शिष्या श्रीमती रुक्माबाई मल्लापूर उर्फ परमपूज्य श्रीकलावतीदेवी (ज्यांना महाराष्ट्रात प्रेमाने "आई" असे म्हणले जाते) ह्या थोर हरिभक्त संत होऊन गेल्या; त्यांची समाधी श्रीहरिमंदिर, अनगोळ, बेळगावमध्ये आहे.

संडूर, कोल्हापूर तसेच अक्कलकोट संस्थानाचे राजे त्यांचे शिष्यत्व पत्करून धन्य झाले होते.[ अपूर्ण वाक्य]

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच महात्मा गांधी हे लोकप्रिय नेते त्यांच्या दर्शनाला आले होते.[ संदर्भ हवा ]

समकालीन

संपादन

कर्नाटकातील त्यांच्या समकालीन संतांमध्ये श्री मडीवाळप्पा, हुबळी जवळील शिशुविनहाळ या गावीचे श्री शिवयोगी शरीफ साहेब, नवलगुंदचे नागलिंगस्वामी, आणि गदगचे श्री शिवानंदस्वामी हे होत तर महाराष्ट्रातील शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा[ संदर्भ हवा ], श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती, कोल्हापुरचे श्रीकृष्ण सरस्वती (कुंभारस्वामी), पळुसचे धोंडीबुवा, बग्गीचे श्री मणीरामबाबा, धनकवडीचे शंकर महाराज ,श्री गुलाबराव महाराज हे होत.

संदर्भ

संपादन
  1. ^ सिद्धारूढ स्वामींचे एक प्रख्यात शिष्य श्री शिवराम चंद्रगिरी ह्यांनी लिहिलेल्या "श्री सिध्दारुढ कथामृत"