सात्त्विक आहार

योगिक आणि आयुर्वेदिक साहित्यातील पदार्थांवर आधारित आहार

सात्त्विक आहार हे सत्त्वगुण किंवा सात्त्विक,सात्त्विक,सत्त्व प्रकृतीचे गुण आहे.शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणारे वस्तुंना सात्त्विक संबोधले जाते.

फल भाज्या

एखादी वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असण्यासाठी कोणताही रोग,वाईट/उपद्रवी शक्ति किंवा दुषितपणा फैलणार नाही हे आवश्यक असते,तसेच ती कोणत्याही इतर मुलद्रव्यांपासून दुषित असता कामा नये,

ज्या वस्तुंमुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांच्या आस्तित्वाने आजुबाजूचे वातावरण शुद्ध होते अशा वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक होय.जेव्हा एखादी व्यक्ती सात्त्विक अन्न ग्रहण करते (खाते) त्यावेळी तिला शुद्धतेचा अनुभव मिळून मनाचे समाधान मिळते.धर्म आणि मोक्ष साधनेचे मार्ग आहेत.

गर्भवतीने सात्त्विक आहार घेतल्यास गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर होते.[१]

अन्न शाकाहारी आणि सात्त्विक असेल, तर मन आणि बुद्धी सात्त्विक होते.

हिन्दु ब्राम्हण आणि जैन, वैष्णव या धार्मिक आध्यात्मिकानुसर सात्त्विक आहाराचे पालन करतात

आयुर्वेद

संपादन


आहाराचे तीन प्रकार: सात्त्विक, राजसिक और तामसिक आहार

सत्त्व, रजतम हे तीन गुण (त्रिगुण) आहे.

सर्व प्राणिमात्रांना आवडणारा आहार देखील ३ प्रकारचा असतो. आयुष्य, बुद्धी, शक्ती, आरोग्य, सुख व प्रेम वाढवणारे असून, रुचिकर, स्निग्ध, शरीरात मुरून चिरकाल राहाणारे आणि मन प्रसन्न ठेवणारे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सात्त्विक वृत्तीचा देखील माणसांना आवडतात.

  1. सात्त्विक आहार : ताजी फळे, भाज्या,धान्य, सलाड इ., मूग, नाचणी, भाज्यांची सूप्स, ज्यूस, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा,गूळ,मध , सात्त्विक मसाले( तुलसी,वेलची, दालचिनी, धणे, बडीशेप, आले आणि हळद वगैरे..)
  2. राजसिक आहार : मिठाई,खूप तळलेले/ जास्त तिखट/ चमचमीत/ तेलकट पदार्थ,लोणचे वगैरे.
  3. तामसिक आहार : मांसाहारी पदार्थ, शिळे/ दुर्गंधीयुक्त पदार्थ, बऱ्याच वेळा गरम केलेले पदार्थ, कांदा,मुळा, लसूण, अंडी वगैरे.

तामसिक आहार, लैंगिकता, लोभ, मत्सर, क्रोध, विश्वासघात, कल्पनाशक्ती, गर्व आणि अनीती या भावना निर्माण होतात.मुळा,कांदा लसूण तामसिक आहेत.

म्हणून ब्राम्हण आणि जैन, वैष्णव या अत्यंत धार्मिक पावित्र्य जपणाऱ्या समाजात ते वर्जित आहे.

श्रीमद्भगवद्गीता

संपादन

श्रीकृष्णाने सात्त्विक, राजसिक आणि तामसिक गुणाची विस्तृत व्याख्या दिली आहे आणि त्याच्या शरीरावर, मन आणि बुद्धीवर प्रभाव देखील स्पष्ट केला आहे.

श्रीभगवानुवाच - त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा। सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु॥17.2॥

अर्थ :मानवाच्या स्वभावामुळे निर्माण झालेला श्रद्धा सात्त्विक आणि राजसी आणि तमसी हे तीन प्रकार आहे, माझे ऐका.

भगवद्गीतेचा १७वा अध्याय "श्रद्धात्रयविभागयोग" असा आहे. त्यात सत्त्व, रज आणि तम या ३ श्रद्धा, गुण आणि अन्न यावर भगवंतांचं भाष्य आहे.

आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ।। – श्रीमद्भगवद्गीता १७.८[२]

अर्थ : आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा; स्निग्ध; शरिरामध्ये जास्त काळ रहाणारा अन् मनास आनंददायक असा आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतो.

सात्त्विक मनुष्याची लक्षणं

संपादन

सात्त्विक मनुष्याची लक्षण खालील प्रमाणे.

अहिंसा,सत्य,ज्ञान, परोपकार, दान, समाधान, देवभक्ती, विवेक, उत्साह, मनावर ताबा ही सत्त्वगुणाची आहेत.

त्याचे मन स्थिर,एकाग्र आणि शांत ,प्रसन्नचित्त असते.त्याच्या बोलण्यात कधीही अश्लिल किंवा उद्धटपणा नसतो.त्यास कसलाच लोभ,मोह,नसतो व ईर्ष्या नसते.त्यास काम आणि क्रोध विचलीत करू शकत नाही.तो कुणासही फसवत नाही किंवा चुकीचे उपदेश देत नाही,त्याउलट त्याच्या वाणीत सदैव सत्यवचन असून त्याचे बोलणे नियंत्रीत असते.कर्म करित असतांना फळाची अपेक्षा न ठेवता निर्व्याज वृत्तीने कर्म करणे हे त्याचे ध्येय असते.तो धर्माने नेमुन दिलेल्या तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करतो.शांत आणि मृदू स्वभाव ही त्याची ठळक लक्षणं असतात.

सांख्य शास्त्रात उल्लेखीत केल्याप्रमाने ,सत्त्व(सात्त्विक) म्हणजे शुद्ध किंवा "प्रकाशमान" तर रज(राजसिक ) म्हणजे "मंद" आणि तम (तामसिक ) म्हणजे "गडद"/काळोख/अंधार तत्त्व.ह्या गुणात कोणतीही क्रमवारी किंवा उच्च नीच असे न मानता ह्या गुणांका एकमेकांचे "पुरक" असे मानण्यात आले आहे,व प्रत्येक गुण हा "अविभाज्य" मानण्यात आले आहे.

सत्त्व गुण हा प्रकृती मुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुण आहे. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.


हे सुद्धा पहा

संपादन

वैष्णव पंथ

इस्कॉन

श्रीलक्ष्मीनारायण

कृतयुग किंवा सत्य युग.

जैन धर्म

संदर्भ

संपादन
  1. ^ "गर्भवतीने सात्त्विक आहार घेण्याचे महत्त्व". सनातन संस्था (इंग्रजी भाषेत). 2019-08-21 रोजी पाहिले.
  2. ^ "आहाराचे (अन्नाचे) प्रकारआणि त्याचे शरिरावर होणारे परिणाम". सनातन संस्था (इंग्रजी भाषेत). 2019-08-21 रोजी पाहिले.