विवेक (अभिनेता)

(विवेक या पानावरून पुनर्निर्देशित)

गणेश अभ्यंकर तथा विवेक (१६ फेब्रुवारी, १९१८ - ९ जून, १९८८) हे मराठी कृष्णधवल चित्रपटांतील अभिनेता होते.

विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्‍न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ सालच्या भक्तीचा मळा या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. १९५० च्या बायको पाहिजे या चित्रपटात बाळ कुडतरकर यांनी अभ्यंकर यांना विवेक असे नाव दिले. हे नाव अभ्यंकरांनी पुढे वापरले. कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते.

विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.

अंबरनाथ येथील नवप्रकाश चित्र या चित्रसंस्थेच्या हमारी कहानी या हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत विवेक यांची निवड झाली होती. या चित्रपटाचे निर्माते- लेखक- दिग्दर्शक भालचंद्र वासुदेव कुलकर्णी होते. हा चित्रपट प्रकाशित झाला नाही.

नाटके (आणि त्यांतील भूमिका) संपादन

चित्रपट संपादन

  • अबोली (१९५३)
  • एक होता राजा (१९५२)
  • ओवाळणी (१९५४)
  • ओवाळिते भाऊराया (१९७५)
  • कल्याण खजिना (१९५०)
  • संत कान्होपात्रा (१९५०)
  • संत चोखामेळा (१९५०)
  • चोरावर मोर (१९८०)
  • संत जनाबाई (मराठी-हिंदी, १९४९)
  • जोहार मायबाप (संत चोखामेळा, १९५०)
  • झंजावात (१९५४)
  • झालं गेलं विसरून जा (१९५७)
  • नरवीर तानाजी (१९५२)
  • नेताजी पालकर (१९७८
  • तीन मुलं (१९५४)
  • तू सुखी रहा
  • थांब लक्ष्मी कुंकू लावते (१९६७)
  • दिसतं तसं नसतं (१९५६)
  • दूधभात
  • देवघर (१९५६)
  • देवबाप्पा (१९५३)
  • देवाचा कौल (१९५२)
  • नवरा माझा ब्रह्मचारी (१९७७)
  • नसती उठाठेव (१९७३)
  • नांव मोठं लक्षण खोटं (१९७७)
  • संत नामदेव (१९४९)
  • पुढचे पाऊल (१९५०)
  • पुत्र व्हावा ऐसा
  • पोस्टातली मुलगी (१९५४)
  • संत बहिणाबाई (१९५३)
  • बाईने केला सरपंच खुळा (१९८१)
  • बायको पाहिजे (१९५०)
  • बेबी (१९५४)
  • बोलकी बाहुली
  • भक्तीचा मळा (१९४४)
  • भालू (१९८०)
  • मर्द मराठा (१९५१)
  • माझं घर माझीं माणसं (१९५६)
  • मामे भाचे (१९७९)
  • माय बहिणी (१९५२)
  • माया मच्छिंद्र/गोरखनाथ (१९५१)
  • लोकशाहीर राम जोशी (१९४७)
  • वहिनींच्या बांगड्या (१९५३)
  • श्रीकृष्ण दर्शन (१९५०)
  • श्रीगुरुदेव दत्त (१९५२)
  • संसार करायचाय मला (१९५४)
  • सापळा (१९७६)
  • सुवासिनी
  • सौभाग्यकांक्षिणी (१९७४)
  • ही वाट पंढरीची (१९७३)


(अपूर्ण यादी)

पुस्तक संपादन

चिचेक यांच्या कलाप्रवासाची कहाणी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकात सांगितली आहे. सांगाती प्रकाशनातर्फे २०१७ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, प्रभाकर भिडे आणि भारती मोरे यांनी केले आहे.

हे सुद्धा पहा संपादन