आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)[International Society for Krishna Consciousness ISKCON] किंवा हरे कृष्ण चळवळ ही एक वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. ही संघटना १९६६ साली, संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्तस्वामी प्रभुपाद ह्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क ह्या महानगरात स्थापली. तिची तत्त्वे ही हिंदु संस्कृतीतील धार्मिक ग्रंथ श्रीमद भागवतम्भगवदगीता ह्यावर आधारित असून ती हिंदु मान्यतेनुसार सुमारे ५००० वराहे जुनी आहेत. तिचे भारतातील मुख्यालय पश्चिम बंगाल मधील एक गाव मायापूर येथे आहे. कृष्ण हेच परम ईश्वर आहेत किंवा स्वयम भगवान आहेत व तेच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत अशी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची मान्यता आहे. भारतीय संस्कृती व वैदिक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हा पंथ काम करतो.

कृष्ण व्हॅली येथील कृष्ण मंदिर मेलबर्न
वैदिक पद्धतीने बांधलेले इको हाऊस यात कमीत कमी ताण निसर्गावर येतो - कृष्ण व्हॅली मेलबर्न जवळ

इस्कॉन चा मूलमंत्र:

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे

नियमसंपादन करा

हेच व्यावहारिक पालन करण्यासाठी ISKCON चे काही मूलभूत नियम आहेत.

कोणत्याही प्रकारची नशा नाही. (चहा, कॉफी नाही)

अवैध स्त्री / पुरुष गमन नाही

 मांसहार / बायोगिक भक्षण नाही. (कांदा, लसुन नाही)

जुआ नाही (शेअर बाजारही नाही)

त्यांना तामसिक अन्न सोडून द्या (तामसिक अन्न म्हणून त्यांना ,कांदा लसुन, मांस, मदिरा इत्यापासून दूर राहा)

अनैतिक वर्तणुकीपासून दूर राहा (जुगार, पब, वेश्यालय अशा स्थानांवर बंदी घातलेली आहे)

एक तास शास्त्रीययन (यात गीता आणि भारतीय धर्म-इतिहास संबंधित शास्त्रांचा अभ्यास करणे)

'हरे कृष्णा-हरे कृष्णा' नावाची १६ वेळा माळा जपा.

ते शुद्ध शाकाहार खातात

प्रमुख तत्त्वेसंपादन करा

  • मांसाहार वर्ज्य
  • जुगार वर्ज्य
  • सर्व प्रकारची नशा वर्ज्य
  • व्याभीचार वर्ज्य

कार्यसंपादन करा

जगात हिंदू धर्माचे महत्त्व आणि आध्यात्मिक जीवनातील आनंद समजावण्याचे काम हरेकृष्ण संप्रदाय करत असतो. या धर्मप्रसाराची सुरुवात म्हणून कृष्णभक्ती आणि तत्त्वज्ञान समजावून दिले जाते. याद्वारे जास्तीत जास्त लोक याकडे आकर्षित होतील असे पाहिले जाते. त्यासाठी शहरातून भक्तिमार्ग दर्शवणाऱ्या भजनांच्या फेऱ्या काढल्या जातात. या मिशनने अनेक ठिकाणी खाद्यपदार्थाच्या सोई करून दिल्या आहेत. त्यासाठी फूड फॉर लाइफ ही वेगळी उपशाखा निर्माण करण्यात आली आहे. भारताबाहेर सुमारे शंभराहून अधिक देशांमध्ये या संस्थेने हिंदुधर्म प्रसाराचे महत्त्वाचे काम सुरू ठेवलेले आहे. आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीत राहणाऱ्या ११ लाख विद्यार्थ्यांना व मुलांना भारतात इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशन द्वारे दुपारचे जेवण देण्यात येत आहे. हे सर्व कार्य स्वयंसेवकांद्वारे विनामूल्य केले जाते.

 
मेलबर्न येथील भारतीय वेशात सहजतेने वावरणारे स्वयंसेवक

जगातल्या काही प्रमुख संगीतकारांना हरेकृष्ण संप्रदाय आकर्षक वाटला आहे. जसे बीटल्स, जॉन लेनन, इ.

भारतातील मंदिरेसंपादन करा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मंदिरेसंपादन करा

चित्रदालनसंपादन करा

हे पण पहासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.