सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ४
योगासनविषयक लेखांमधील चित्रांबद्दल
संपादननरसीकर, मी DrYogita यांनी काही योगासनांच्या लेखांत वापरलेली चित्रे तपासली. ती सर्व चित्रे 'विकिमीडिया कॉमन्स' या संस्थळावरील आहेत (तुम्ही प्रत्येक चित्र मराठी विकिपीडियातून उघडले, तर त्यात पुढीलप्रमाणे एक संदेश दिसतो : 'This file is from Wikimedia Commons and may be used by other projects. The description on its file description page there is shown below' . असा संदेश ज्या संचिकांवर दिसतो, त्या सर्व संचिका विकिकॉमन्सात चढवलेल्या असतात.)
विकिकॉमन्स संकेतस्थळ मराठी विकिपीडियाच्या अंतर्गत येत नाही. विकिकॉमन्स येथील प्रचालक व सक्रिय सदस्य तेथील चित्रांची पडताळणी करत असतातच (ही चित्रे बहुधा त्यांनी तपासली असावीत). खेरीज, या चित्रांवर संबंधित संकेतस्थळाने 'ग्नू जीएफडीएल' परवान्यांतर्गत प्रताधिकार मुक्त केले असल्याची नोंद आहे; तीही लक्षात घ्यायला हवी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:११, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
प्रताधिकार / स्रोत ?
संपादननमस्कार नरसीकर, तुम्ही चढवलेल्या चित्र:Rashtrasant Tukdoji Maharaj.jpg चित्राच्या प्रताधिकारांबद्दल किंवा स्रोतांबद्दल काही माहिती लिहिलेली नाही. कृपया प्रताधिकारांबद्द्ल खुलासा करावा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४४, ७ जानेवारी २०१० (UTC)
कडधान्ये / द्विदल धान्ये की अजून काही?
संपादनविकिपीडियावरील सर्वसाधारण संकेतांप्रमाणे लेखांची / वर्गांची शीर्षके पारिभाषिक नावांप्रमाणे ठेवावीत (म्हणजे धान्यांच्या/ वनस्पतींच्या संदर्भात जीवशास्त्रीयदृष्ट्या अधिक नेमक्या नावाची). तुम्ही विचारलेल्या प्रश्नासंदर्भात मी मोल्सवर्थाच्या मराठी शब्दकोशात तपासले असता, 'कडधान्ये' या शब्दाची व्याख्या अशी मिळाली. या व्याख्येनुसार कडधान्ये म्हणजे 'A general name for legumes' असे दिसते. आता इंग्लिश विकिपीडियावर तुम्ही कडधान्यांचे लेख पाहिले, तर ते सर्व en:Category:Edible legumes या वर्गात मोडतात. त्यावरून मला असे वाटते, की खाण्याजोग्या legumes गटातील प्रजातींना आपण 'कडधान्ये' म्हणतो. त्यामुळे मूग, उडीद, चवळी, मसूर, वाटाणा यांबद्दल माहिती लिहायला 'वर्ग:कडधान्ये' अशा नावाचा वर्ग बनवायला हरकत नसावी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:२३, २९ डिसेंबर २००९ (UTC)
एक-हजारी बार्नस्टार x २
संपादनएक-हजारी बार्नस्टार | ||
वि. नरसीकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
नरसीकर, तुमच्या लेख-संपादनांची संख्या दोनेक हजारांपर्यंत पोचली, म्हणून हा बार्नस्टार! (खरेतर दोन-हजारी बार्नस्टार द्यायला हवा होता, पण सध्या तसा बार्नस्टार उपलब्ध नसल्याने, ओतकामापासून सुरुवात करावी लागेल. :D त्यामुळे, तूर्तास हेच साजरे मानून घ्या. :))
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१३, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
शुद्ध लेखन सहाय्य हवे
संपादन- मराठी विकिपीडिया संदर्भातील काही प्रश्न ऑफलाईन फील्डवर्कने लॉजीकल कन्लक्ल्यूजनला न्यावयाचे आहेत. त्या दृष्टीने लॉ कॉलेज नमुना पत्र अपडेट करून एक नवीन टिपणही जोडले आहे त्यात शुद्धलेखन आणि इतर काही बदल सुयोग्य वाटल्यास करून हवे आहेत.
त्या शिवाय एका इमेलवरून प्रताधिकारांसदर्भात चर्चा चालू आहे ते ईमेलही मी आपल्या कडे माहितीकरिता फॉर्वर्ड करेन. माहितगार ०७:११, ३० डिसेंबर २००९ (UTC)
- शुभेच्छांकरिता धन्यवाद माहितगार ०४:४९, २ जानेवारी २०१० (UTC)
- चित्रा करिता थँक्स. टेस्ट करून पहातो आहे पण मायनर काही सुधारणा लागेल काय् ते पहातो आहे. माहितगार ०७:३५, २ जानेवारी २०१० (UTC)
वैशिष्ट्यपूर्ण
संपादन- वैशिठ्यपूर्ण अक्षरसमूहाचा विकिपीडीयाच्या शोधयंत्रातून शोध घेतला असता, चार-पाच लेखात असे लेखन सदस्य अजयबिडवे यांच्या कडून झाल्याचे निदर्शनास आले माझा अंदाजा ते एका पेक्षा अधीक मराठी कळफलक वापरत असावेत , सहसा फोनेटीक कळफलकात small t चा त होतो कॅपिटल T चा ट होतो सदस्य अजयबिडवे यांनी कळ्फलक बदलल्यांनतर कॅपिटल T चा ठ होत असावा. मला वाटते तुम्ही त्यांच्या चर्चा पानावर हि गोष्ट लक्षात आणून दिल्यास त्यांच्याकडून अनवधानाने होणारी त्रुटी टळण्यास मदत होईल माहितगार ०५:४३, ४ जानेवारी २०१० (UTC)
विशेष या शब्दापासुन वैशिष्ट्य (विशेष असलेला) हे शब्द बनले आहेत.त्यापासुन वैशिष्ट्यपूर्ण असा शब्द बनतो.अनेक लेखात वैशिठ्यपूर्ण असा शब्द बघावयास मिळतो. अचुक शब्द कोणता? जाणकार कृपया मार्गदर्शन करतील काय? उदा. दिलवाडा मंदिर वि. नरसीकर (चर्चा) ०७:४३, ३ जानेवारी २०१० (UTC)
माझे सदस्यपान
संपादनविकिचावडीवर माझ्या सदस्यपानाविषयी आपले मत वाचले. मलातरी यात काही गैर वाटत नाही, तरीही इतर सदस्यांचेही तसे मत असेल तर त्या पानावर बदल करण्यात माझी काही हरकत नाही. गणेश धामोडकर ०५:०६, ५ जानेवारी २०१० (UTC)
- आकस असण्याचं काहीच कारण नाही. आपण सर्व इथे फक्त मराठी विकिच्या निर्मितीसाठी आहोत. आणि मी सदस्यापानावर काही बदल केलेही आहेत. आपल्या मताचा मला पूर्ण आदर आहे. आपण माझ्या सदस्यापानाला भेट देऊन बदल सुचवला यात आपला विकिला अधिकाधिक उत्तम बनवण्याचाच हेतू होता हे मी जाणतो. गणेश धामोडकर ०६:११, ५ जानेवारी २०१० (UTC)
दुवा दिसत नाही ,काय करावे बरे?
संपादनशिराळा या तालुक्याच्या चौकटित दिलेला दुवा दिसत नाहि,मदत हवी. कर्हाडे ०७:१३, ६ जानेवारी २०१० (UTC)
global sysops proposal
संपादनयाचे भाषांतर केलेले चांगलेच, पण मराठी विकिपीडियावरील किती सदस्य हे वाचतील, वाचून त्यात interest दाखवतील आणि मत देतील याबद्दल मला शंकाच आहे. शिवाय, हे पान short term आहे, मतदानानंतर याचा फारसा उपयोग नाही.
तुमचा बहुमोल वेळ या पानाच्या भाषांतरात खर्च न करता इतर ठिकाणी केल्यास अधिक चांगले असे मला वाटते. तरीही भाषांतर करण्यास मुळीच आडकाठी नाही. केल्यास कळवावे म्हणजे त्याला चावडीवर प्रसिद्धी देता येईल.
अभय नातू १६:३५, ८ जानेवारी २०१० (UTC)
- नरसीकर, अभय नातूंनी सांगितल्याप्रमाणे हे भाषांतर केलेले चांगले, पण करायची अतीव आवश्यकता नाही. तुमच्या प्राधान्यक्रमानुसार वेळ ठरवून तुम्ही या कामी मदत केल्यासही चालेल. सर्व पानांच्या वर दिसणार्या या नोटिसा काही महिन्यांतून/आठवड्यांतून बदलत राहतात - तशा अर्थी ती नोटीस-पाने अल्पमुदतीची असतात.
- बाकी, 'त्या' चित्राचे प्रताधिकारविषयक स्पष्टीकरण वाचले. तूर्तास मी त्याला 'प्रताधिकार संचिका' म्हणूनच वर्ग करणे इष्ट समजतो. प्रताधिकारविषयक गोष्टी मी कसोशीने हल्ली पाहण्याचे कारण असे, की महाराष्ट्रात/ मराठी भाषिकांत प्रताधिकारविषयक जागरूकपणा एकंदरीत कमी आहे; परंतु विकिपीडियाच्या 'मुक्त' ज्ञानकोशकार्याच्या धोरणांमध्ये प्रताधिकार या बाबीला खूप मोठे व संवेदनशील स्थान आहे. आणि ते योग्यही आहे - कारण एखाद्या फोटोग्राफराने व्यावसायिक संधी मिळवण्यासाठी आपल्या कामाची झलक दाखवण्याच्या हेतूने इंटरनेटावर आपल्या चांगल्या फोटोंचा अल्बम ठेवलेला असू शकतो; किंवा सहज टाकलेल्या एखाद्या फोटोला मागाहून एखाद्या पार्टीकडून खरेदीच्या ऑफरी येऊ शकतात. अशा वेळी एखाद्या प्रतिभावंताच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर (= या मासल्यात, प्रतिभेतून निपजलेल्या फोटोंवर) हक्क सांगण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकार इतरांनी बळकावू नये; यासाठी हे सर्व प्रताधिकार कायदे आहेत. एखाद्या चित्रकाराने / प्रकाशचित्रकाराने (= फोटोग्राफर) किंवा लेखकाने इंटरनेटावर चढवलेले चित्र अथवा मजकूर जर प्रताधिकारितच ठेवले असेल, तर त्याच्या योग्य ते प्रताधिकार/ परवाने / परवानग्या न मिळवता विकिपीडियावर वापरले जाऊ नये, हे विकिमीडिया फाउंडेशनाचे धोरण म्हणूनच अतिशय नैतिक, कायदेशीर आणि प्रतिभेची खरी कदर जाणणारे आहे.
- हे सर्व विवरण्याचे कारण, असे की सध्या या अनुषंगाने विकिपीडियावर किंवा इतरत्र 'प्रताधिकारांचा बागुलबुवा कशाला?' अशी अन्य बर्याच मराठी नेटजनांकडून पृच्छा होत आहे. त्या दृष्टीने याचे महत्त्व तुमच्यासारख्या विकिकरांपर्यंत पोचवावे, असे वाटल्याने हा पोस्टप्रपंच. :)
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:४८, १० जानेवारी २०१० (UTC)
वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे
संपादनवर्ग:वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे असा वर्ग करणे योग्य राहील काय?या वर्गात औष्णिक,जलविद्युत,अणुविद्युत असे सर्व प्रकार येतील. त्याचे उपवर्ग औष्णिक,जलविद्युत,अणुविद्युत हे राहु शकतात.
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प असणारी गावे बरोबर वाटते पण जलविद्युत वीजनिर्मिती प्रकल्प असणारी गावे, अणुविद्युत वीजनिर्मिती प्रकल्प असणारी गावे यात repeatition वाटते, तरी उचित नावे वापरुन वर्ग तयार करावे.
अभय नातू १६:४०, ८ जानेवारी २०१० (UTC)
- वर्ग:विद्युत निर्मिती प्रकल्प असणारी गावे, वर्ग:जलविद्युत निर्मिती प्रकल्प असणारी गावे, वर्ग:अणुविद्युत निर्मिती प्रकल्प असणारी गावे, वर्ग:औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प असणारी गावे अशा नावांचे वर्ग करणे अर्थाच्या दृष्टीने अधिक योग्य ठरेल.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:५२, १० जानेवारी २०१० (UTC)
लक्ष्मी-केशव (कोळिसरे)
संपादनआपल्या मताशी मी सहमत आहे. अधिक माहिती मी संपादन केली आहे. आणखी महिती नंतर मिळवीन. देवस्थानांच्या पानासाठी काही साचा आहे काय? किंवा एखादे चांगले उदाहरण नमुना म्हणून आपण सांगू शकाल का? धन्यवाद.
अरुण कांबळे या लेखाविषयी
संपादनसदर लेख हा माहितीवजा वा शोक स्वरुपाचा झाला आहे. काय करावे. लेखकच मुळात वादग्रस्त त्यामुळे संपादन करताना अडचण आली तर काय करावे बरे? कारण लेखक सदर परिचयाचे असल्याने व संपादन त्यांचा मुलगा अपरांत अधांतर या नावाने करतोय. विनोद रकटे १८:२८, १० जानेवारी २०१० (UTC)
वेद-विभागात
संपादनवेद विभागात वर्ग:ब्राह्मणे असा आहे.खरं म्हणजे ब्राह्मणके वा ब्राम्हणके असा वर्ग असावा. कळावे. विनोद रकटे १९:३६, १० जानेवारी २०१० (UTC)
याचा उलघडा करावा.
विनोद रकटे १९:२६, १४ जानेवारी २०१० (UTC)
प्रताधिकारीत चित्रांच्या अनुमतीसाठी पाठवावयाच्या ई-मेलचा मसुदा कोठे मिळेल?
संपादन{{पर्याय:प्रताधिकारसूचना}} पहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर पण सामावले आहे तसेच हा साचा अद्ययावत करण्यास सवडीनुसार सहाय्य करावे.माहितगार ०८:१९, १३ जानेवारी २०१० (UTC)
वर्गीकरणातील नावांचे संकेत
संपादननरसीकर, तुम्ही बनवलेला वर्ग:नक्षत्र हा वर्ग पाहिला. सहसा वर्गीकरणात अनेक लेखांचा समावेश होत असल्यामुळे वर्गांची नावे समुच्चयदर्शक स्वरूपाची - आणि म्हणूनच अनेकवचनी - असतात. त्यामुळे योग्य नाव वर्ग:नक्षत्रे असे हवे. कृपया 'वर्ग:नक्षत्र' वर्गातील लेख या योग्य वर्गात हलवले, तर बरे होईल. तसदीबद्दल क्षमस्व.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४९, १७ जानेवारी २०१० (UTC)
- ओह्. तसे असल्यास, माझा गैरसमज झाला असावा. क्षमस्व. तरीही वर्गीकरणामधील अनेकवचनाचा मुद्दा विकिसंकेत म्हणून अनायासे अधोरेखित करता आला, हेही बरे झाले.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:१५, १७ जानेवारी २०१० (UTC)
- कोणत्या वर्गांबद्दल बोलत आहात? मला नीटसे उमजले नाही.
- बाकी, तुम्ही नुकत्याच बनवलेल्या फावडे इ. लेखांमध्ये 'उपकरणे' असे लिहिले आहे; ते योग्य नाही. उपकरण = instrument, अवजार, हत्यार = tool. त्यातही 'अवजार' याची अर्थच्छटा अधिक लवचिक व समावेशक आहे; तर हत्यार याची अर्थच्छटा 'शस्त्र' या संकल्पनेला अधिक जवळची आहे. त्यामुळे en:Category:Tools या इंग्लिश विकीवरील वर्गाला समांतर वर्ग बनवायचा झाल्यास 'वर्ग:अवजारे' हे नाव अधिक योग्य ठरेल.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३१, २५ जानेवारी २०१० (UTC)
धन्यवाद
संपादनमी पुरेपूर प्रयत्न करतो आहे आणि चालू ठेवीन. फक्त शुद्धलेखनामूळे थोडे ह्ळु काम होते. --प्रशांत शिरसाठ १०:४५, २० जानेवारी २०१० (UTC)
- चर्चा:शृंगारचेष्टा चर्चा पहावी व अभिप्राय द्यावा माहितगार ०५:२१, २१ जानेवारी २०१० (UTC)
मोनोरेल वा एकल-रेल
संपादनमहोदय, मराठी विकि वर मी कालचं एक नवीन सदर चालू केले - "मोनोरेल". त्यात आपण केलेले योगदान पाहिले. हे योगदान होते "मोनोरेल"साठी "एकल-रेल" हा पर्यायी मराठी प्रतिशब्द. परंतू मी या शब्दाशी असहमत आहे. कारणे खालील प्रमाणे,
१. मुंबई-पुण्यात मोनोरेल झाल्यावर किती लोकं 'एकल-रेल' अथवा दुसरा पर्यायी शब्द वापरतील? २. मोनोरेल हे तंत्रज्ञान आपण विकसित केलेले नाही. जर तंत्रज्ञान जसेच्या तसे वापरतो तर त्यास संबोधण्यासाठीचा शब्द का वापरू नये? ३. मोनो साठी एकल तर मग रेल हा शब्द रूळ असा का वापरू नये? ४. मराठीभाषेत वापरले जाणारे परभाषेतील असे अनेक शब्दा आहेत. उदा. सिमेंट, तिकीट, इंजीन. इत्यादी. तसेचं भारतीय भाषांतील शब्दांनी परदेशी भाषांमधे शिरकाव केल्याची बरीचं उदाहरणे अहेत. या सगळ्याचा विचार करता, मोनोरेल या शब्दाला पर्यायी शब्द न वापरणे हेचं मला उचित वाटते. धन्यवाद, मंदार
मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख
संपादननमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
लेखात प्रयुक्त संज्ञा
संपादन- होय आपण केलेत त्या प्रमाणेच अभिप्रेत होते. उत्खनक शब्द चपखलपणे वापरला गेला आहे पण archeology संबधीत उत्खनन शब्दाशी मिळताजूळता पण वेगळा अर्थ असलेला शब्द असल्यामुळे मी लेखात प्रयुक्त संज्ञा आराखडा लावला होता.माहितगार १३:२५, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
रोडरोलर ला काय नाव द्यावे ?
संपादनरोडरोलर ला काय नाव द्यावे- रस्ता(रोड) ढकलदंड(रोलर) कि सरळच खडी दाबण्याचे यंत्र? वि. नरसीकर (चर्चा) १३:३३, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
- मला वाटते 'रोडरोलर' ला रोडरोलर ठेवलेले बरे कारण ते यंत्र एक तर बरेच जुने असल्यामुळे माहित असलेला शब्द आहे शिवाय बर्याचदा विनोदबुद्धीला चालना देणारा शब्द असल्यामुळेजही लोकप्रीय असेल असे वाटते :).
- रोल शब्दाची व्यूत्पत्ती रथ या संस्कृत शब्दाशी साधर्म्य असलेल्या रोटा या लॅटीन शब्दावरून येतो (इती-इंग्रजी विक्शनरी),त्यावरून पथदमनरथ हा शब्द थोडा अतीच होईल नाहीका ? त्या पेक्षा खडी-दाब्या असा मराठमोळा शब्द कसा राहील ?
- आपण सुचवलेला ढकलदंड शब्द पण चांगला आहे,मला असाच गमतीने सुचलेला शब्द म्हणजे 'पथलाटणं' :)
- लोठ(रोलर-ऑनलाईन संस्कृत डिक्शनरी),खडी दाबण्याचा रूळ (गूगल आणि खांडबहाले शब्द कोश),
- माझ्या काही सुचलेले: खडी-दाब्या,पथलाटणं, आवर्तवाहन(ऑनलाईन संस्कृत डिक्शनरी सहाय्यने) , सान्द्रलोठ(कॉम्पॅक्ट रोलर-ऑनलाईन संस्कृत डिक्शनरी सहाय्यने)
- तुमच्या पृच्छेमुळे ऑनलाईन डिक्शनर्या शोधण्यात वेळा मजेत व्यतीत झाला धन्यवाद
- ता.क. ढकलदांडू ( -हे आपल गमतीने ढकलदांडू हाकणार्या चालकास ढकलदांडू हाकण्याच्या दृष्टीने अजून काही शब्द सुचले पण येथे नमुद करू शकत नाही आहे, ह.घ्या.)
- जाता जाता दंड शब्दावरून आठवले, धोतर सदरा आणि अंगरखा टोपी आणि दंड देण्याकरिता हातात दंड या वेषातील गुरूजन पाहिलेली कदाचीत माझी शेवटची पिढी तर आमच्या गुरूजनात एक गणिताचे गुरूजी दंडेबापू म्हणूनच परिचीत होते,(It is about just feeling nostalgic)
माहितगार १४:१७, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
- तूर्तास मराठीत 'रोडरोलर' हा इंग्लिशीतून उसना आलेला शब्द असल्यासारखे चित्र दिसते. त्यामुळे रोडरोलर या नावाने तूर्तास लेख बनवावा. जर कुठल्या विश्वासार्ह शब्दकोशात/ संदर्भात मराठी प्रतिशब्द आढळला, तर त्या नावाने नंतर बदल करावेत.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
वर्गःसाम्राज्य
संपादननमस्कार, संक्षिप्त सूची मधील इतिहास या वर्गात साम्राज्य विभागात आपणास नेमके काय अपेक्षित आहे.
मराठा साम्राज्य मुघल साम्राज्य इंका साम्राज्य गुप्त साम्राज्य ब्रिटिश साम्राज्य रोमन साम्राज्य रशियन साम्राज्य
हि साम्राज्य वर्गवारीत मोडू शकत नाही का? हि त्या वर्गवारीत येऊ शकत नाहीत का ?
कळावे...विनोद रकटे ०४:४६, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)
ढोबळ वर्गीकरणापेक्षा नेमके वर्गीकरण बरे
संपादननरसीकर, तुम्ही सध्या वनस्पतीविषयक विषयांवर काम करत आहात. त्यातील बर्याच लेखांमध्ये वर्ग:वनस्पती असे पालकवर्गात वर्गीकरण केलेले दिसत आहे (जे तुम्ही केलेले नसेल, तुमच्याआधीच्या संपादकांनी केलेले असू शकेल.). त्या लेखांमध्ये तुम्ही नेमके वर्गीकरण करू शकाल का? साधारणपणे विकिपीडियावरील लेख नेमक्या वर्गांमध्ये वर्ग करण्याची रीत आहे; उदा. : 'विष्णू वामन शिरवाडकर' यांना वर्ग:मानव य वर्गात तांत्रिकदृष्ट्या वर्ग करणे गैर नाही; पण तसे वर्गीकरण फारच ढोबळ ठरेल. त्यामुळे वि.वा. शिरवाडकर हे मराठी भाषिक व्यक्ती असून, कवी होते, हे व्यक्तिविशेष लक्षात घेता त्यांच्यावरील लेखाला वर्ग:मराठी कवी या वर्गात वर्ग केले आहे. त्याप्रमाणेच वनस्पतींवरच्या संबंधित लेखांना वर्ग:औषधी वनस्पती, वर्ग:पवित्र वनस्पती, वर्ग:भाज्या, वर्ग:कंदमुळे इत्यादी नेमक्या वर्गांमध्येच ठेवावे. पालकवर्गात शक्यतो ठेवू नये. तुम्ही संपादने करत असताना, ही बाबही ध्यानात ठेवून मदत करू शकाल, म्हणून ही सूचना.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:३०, १३ फेब्रुवारी २०१० (UTC)
- काही हरकत नाही. खरे तर हे विकिसंकेत एव्हाना दस्तऐवज करण्याची वेळ आली आहे. पण असलेल्या कामांमधून वेळ मिळत नाही; त्यामुळे ते काम लांबणीवर पडत आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:४८, १३ फेब्रुवारी २०१० (UTC)
- अहो, क्षमा वगैरे औपचारिकता कशाला? शुद्धलेखन व व्याकरण ही भाषिक अंगे आपण सर्वांनीच सांभाळली पाहिजेत. मला जमेल तेवढी शुद्धलेखनविषयक दर्जा उंचावण्याविषयी कामे करत असतो. त्यात तुमच्यामुळे किंवा अन्य कुणामुळे काही त्रास होतोय किंवा कसे, हा मुद्दा गौण ठरतो... तात्पर्य, तुम्ही सध्या करत आहात, त्या उत्साहाने सक्रिय सहभाग चालू राहू द्या. :)
- तरीही, वर्ग व साचे या दोन गोष्टींत आपण सर्वांनीच शुद्धलेखनाकडे जरा कटाक्षाने, जागरूकपणे लक्ष पुरवायला हवे; कारण एकदा यांत चुका झाल्या, की मागाहून त्या निस्तरत बसणे मोठे काम होऊन बसते.
- बाकी, शुद्धलेखन, व्याकरण याविषयी मराठी विकिपीडियावर थोडी चांगली माहिती उपलब्ध आहे :- शुद्धलेखनाचे नियम.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४९, १५ फेब्रुवारी २०१० (UTC)
टूलसर्व्हर टॅगांसंदर्भात
संपादनमलादेखील नेमकी माहिती नाही. माझ्या माहितीनुसार, टूलसर्व्हर प्रकल्प विकिमीडियाबाहेरील प्रकल्प आहे; त्यातील बारकावे मला माहीत नाहीत... केवळ सदस्यनिहाय सांख्यिकीसाठी मी आजवर त्याच्या सेवा वापरल्या आहेत. टॅग, अनटॅग्ड वगैरे गोष्टी बहुधा प्रताधिकारविषयक विशिष्ट टॅग अपेक्षिणार्या असाव्यात, असा माझा कयास आहे. विकिमीडिया कॉमन्सावर तुम्हांला प्रताधिकार टॅगांविषयी माहिती मिळेल. मराठी विकिपीडियावर सध्या चित्रांवर लावायला टॅग साचे बनवले नाहीयेत; ते महत्त्वाचे, पण मोठे काम बाकी आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:१४, १८ फेब्रुवारी २०१० (UTC)
अभ्यागत व्यवस्थापन भाषांतरात सहाय्य हवे
संपादन- सुरक्षा सजगतेच्या दृष्टीने अभ्यागत व्यवस्थापन चे महत्व मोठे आहे पण सहसा दुर्लक्षीले जाते. अभ्यागत व्यवस्थापन लेखाच्या भाषामतरात आपले सहाय्य झाल्यास बरे पडेल म्हणजे मला स्वत:ची माझी माहिती भरणे अधिक सुकर होईल.
- स्वत:ची- माझ्या मागच्या जॉबचा संबंध सेफ्टी इक्विपमेंट संदर्भातील सॉफटवेअरशी सुद्धा होता त्यामुळे संबंधीत क्षेत्रातील इंग्रजी विकिपीडीयात किंवा इतरांपेक्षा माझ्या कडे अधीक माइती आहे ती मी भरेनच,पण इंग्रजी विकिपीडियातील आणि माझ्या लेखनाची पुनरोक्ती टळण्यास सहाय्य होईल या अर्थाने.
धन्यवाद माहितगार ०८:३२, १७ फेब्रुवारी २०१० (UTC)
- अरे वा , अभियंता महोदय आपण वाणीज्यात पण पारंगत दिसता, लक्ष्मी देवता आपल्यावर सदैव प्रसन्न राहो हि मनःपूर्वक शुभेच्छा .माहितगार १५:००, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)
धन्यवाद
संपादनसध्या कामात थोडा जास्तच व्यस्त असल्यामुळे ..विकी साठी जास्त वेळ मिळत नाही.
Maihudon १७:३५, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)
साचा चर्चा:महाराष्ट्रातील किल्ले
संपादनकाम फत्ते...विनोद रकटे ०४:५८, २४ फेब्रुवारी २०१० (UTC)
नमस्कार
संपादन- तुम्ही केलेले बदल पाहिले, आवडलेही. एकट्याने एकाचवेळी येवढा मोठा लेख पहिल्यांदा लिहिला. काही बदल करावयाचे राहून गेले, तुम्ही ते केले फार छान वाटले. माझी परवानगी लागेल असे का वाटले? विकिच्या पॉलिसीप्रमाणे बदल कोणीही करू शकतात, शिवाय लेख चांगला होणे हे महत्त्वाचे. उपचार म्हणून नव्हे मी खरोखरच आपला आभारी आहे. Gypsypkd ०४:३८, १० मार्च २०१० (UTC)
- विदर्भ राज्याच्या मागणीचा जोर सर्वत्र वाढत चालला आहे. माझ्या मित्राने त्याच्यासाठी एक झेंडा तयार केला आहे, त्यावरून कल्पना आली, एक साचा तयार करावा, कदाचित आज तयार करेन. कळावे. 117.254.176.108 ०७:१४, १० मार्च २०१० (UTC)
सूचना:
नमस्कार!
संपादननरसीकर, सध्या मी कामात व्यग्र असल्यामुळे रोज येथे योगदान देणे अवघड बनले आहे. परंतु तुम्ही तूर्तास सर्व संचिका वर्ग:संचिका या ढोबळ वर्गात वर्ग करून ठेवू शकता. मागाहून तुम्ही, मी किंवा अन्य कोणी त्यांचे अधिक योग्य वर्गात वर्गीकरण करू शकेलच.
बाकी काही तातडीची कामे असल्यास, मला जरूर संदेश सोडा; मी दिवसातून एकदातरी इकडे चक्कर मारतोच. त्यामुळे तातडीच्या कामांमध्ये जरूर मदत करू शकेन.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:२६, १४ मार्च २०१० (UTC)
नव्या सदस्याच्या स्वागत साच्यात नाव नकोय
संपादननरसीकर, नवीन सदस्यांचा साचा टाकता तेंव्हा आपले नाव शेवटी न दिसण्यासाठी काय करावे? कारण स्वागत कुणी एकजण थोडेच करतो? तो साचा नवीन सदस्याच्या चर्चा पानावर कुणीही टाकला, तरी स्वागत सर्वांकडूनच असते ना? मग शेवटी नाव, वेळ कशाला टाकायचे (असे मला वाटते)? किमान, मला तसेच टाकायचे नसेल तर काय करावे? कृपया सांगाल? -मनोज ०७:००, १५ मार्च २०१० (UTC)
संवाद
संपादनमाझ्या चर्चापानावरील प्रस्तावाच्या उत्तरात.. वा वा, जरूर संवाद साधू, हरकत कसली त्यात! आवश्यक त्या सकारात्मक घटकांसह होत असलेल्तोया कोणत्याही सुसवांदाचे मी स्वागतच करतो, नरसीकरजी! प्रश्न निर्माण होतो तो तिरक्या शब्दांनी आणि विसंवादाने. -मनोज ०७:५६, १५ मार्च २०१० (UTC) एखादे काही कळले नसेल तर द्या सोडून. बाकी एकत्र काम करण्याविषयी तुम्ही व्यक्त केलेल्या भावनेशी एकदम सहमत. - मनोज ०८:२२, १५ मार्च २०१० (UTC)
नवा साचा
संपादननमस्कार, मी साचा:सदस्यचौकट वैदर्भीय हा साचा तयार केला आहे. तुम्ही पहावा व आवश्यक बदल करावे. शक्य असल्यास हा साचा तुमच्या सदस्य पानावर लावावा. बहुतेक आपण दोघेच वैदर्भीय सदस्य असु मराठी विकिवर. Gypsypkd ०७:४६, १९ मार्च २०१० (UTC)
बदल केला आहे.विचार कळवा.चर्चा हि पाहणे. विनोद रकटे.
आभार
संपादननमस्कार, तुम्ही नेहमी मदतीचा हात दिला, नव्या जोमाने काम सुरू ठेवण्याबद्दल वेळोवेळी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे विशेष आभार. साचा वैदर्भीय लावल्याचे पाहिले आणि आवडले. बाकी आज एक लक्षात आले की आपण वैदर्भीय आपली (स्वतःची) जाहिरात करण्यात खूपच मागे आहोत. महाराज, स्वतःची टिमकी वाजवावी लागते. Gypsypkd ०६:११, २१ मार्च २०१० (UTC)
अभिनंदन
संपादनविजयजी तुम्ही आत्तापर्यंत विकिपीडियाच्या सर्व प्रकारात एकूण ५००० पेक्षा जास्त संपादने केली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे असे करणारे तुम्ही पहिले वैदर्भीय ठरले आहात. ही लिंक पहा http://toolserver.org/~vvv/sulutil.php?user=V.narsikar
मला खात्री आहे की तुम्ही विकिपीडियासाठी असेच योगदान देत रहाल.
या निमित्ताने पार्टी दिली पाहिजे.
पुन्हा एकदा अभिनंदन. Gypsypkd ११:५५, २१ मार्च २०१० (UTC)
चोळ शासनातील देवळे लेखाविषयी
संपादनआपला संदेश मिळाला,मी ते काम नुकतच हाती घेतलं आहे,लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करीन,आठवणीने कळविल्याबद्दल धन्यवाद,क.लो.अ.Pra.K. १३:११, २३ मार्च २०१० (UTC)
गौरव
संपादन.
नमस्कार नरसीकर,
तुम्हाला हा गौरव देण्यास खरे म्हणजे उशीरच झाला आहे. सध्या पूर्वीप्रमाणे येथे वेळ देता येत नाही, पण त्याने तुमच्या कामाचे महत्व कमी नक्कीच नाही, किंबहुना जास्तच आहे!!
अभय नातू ०४:२७, २४ मार्च २०१० (UTC)
मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश
संपादन- मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश हा निबंध आपल्याला प्रताधिकारमुक्त स्वरूपात उपलब्ध झाला आहे. हा दुवे सांधणीनंतर मराठी विकिबूक्स(सध्या आपण मूळलेखन स्रोत विकिबुक्सवर ठेवत आहोत) आणि इतर मराठी संकेतस्थळांवर जसाच्या तसा लावावा असा मानस आहे.
- यातील मंडळाचे परिभाषा निर्मितीचे काम कसे चालते हि माहिती विश्वकोशिय असल्यामुळे संबधीत विकिपीडिया लेखात घेण्या जोगी आहे.
- पारिभाषिक शब्द का केव्हा आणि कसे योजावेत याबद्दलची लेखिकेची भूमिका समतोल विचाराची आहे त्यामूळे त्यातील काही चांगले मुद्दे मराठी विकिपीडियाची निती म्हणून स्विकारण्या संदर्भाने साधबाधक चर्चेनंतर सहमती घ्यावी असेही वाटते.
- मी कार्य बाहूल्यामुळे व्यस्त आहे हे खरे आहे , आपण स्वतःहून मदत करत आहात खूप खूप धन्यवाद -माहितगार
राज्य शासनाची पदे
संपादननमस्कार,
राज्य शासनात असलेली विविध पदे (सचिव (शासन),उपसचिव(शासन), कक्ष अधिकारी (शासन))व इतर अधिकारी व तेथील पदे आणि विविध विभाग (उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, रोजगार हमी योजना,महसूल, आरोग्य, विधी व न्याय,सार्वजनिक बांधकाम,पाटबंधारे इत्यादी)यावर लेख लिहिणे योग्य राहील काय?
हे लेख तयार करणे उपयोगीच असेल. मला वाटते सुरुवातीस प्रत्येक पदाचा लेख तयार करण्याऐवजी महाराष्ट्र राज्य शासनातील executive[मराठी शब्द सुचवा] पदे असा लेख तयार करुन तेथे या पदांची खिजगणती करावी. त्यानंतर या यादीतील महत्वाच्या पदांबद्दल लेख तयार करावे व त्यानंतर उरलेल्या पदांबरोबर लेख तयार करावेत. असे केल्याने एका दृष्टिक्षेपात सगळी पदे येतील व त्यात वाढ/बदल करणे सोपे जाईल. याच बरोबर महत्वाच्या पदांबद्दलचे लेख आधी तयार झाल्याने उगीचच भाराभर लेख तयार करुन ठेवले अशी टीकाही होणार नाही :-)
अधिक मदत लागल्यास कळवालच.
अभय नातू ०२:०९, ५ एप्रिल २०१० (UTC)
नमस्कार
संपादनतुम्ही कोकीळ पक्षी मध्ये समाविष्ट केलेला आवज मादीचा नसून नराचा आहे. मी हे ठामपणे सांगू शकतो (२०-२२ वर्षांचा पक्षी निरिक्षणाचा अनुभव) . मादीचा आवाज कर्णप्रिय नाही. वास्तविक पशू-पक्ष्यांच्या दुनियेत सर्व नटणेमुरडणे, विविध प्रकारचे आवाज काढणे आदी सर्व नरच करतात, मादी या वरून नराला पसंत किंवा नापसंत करते. आपल्या लेखात आवश्यक बदल करावे, तसेच जमल्यास फोटोही चढवावे. Gypsypkd ०५:२३, ५ एप्रिल २०१० (UTC)
ओ.के.
संपादनतुम्ही म्हणता तसे दोन्ही लेख एकाच वनस्पती बद्दल आहेत. पानफुटी नावाचा लेख माधव गाडगीळ यांनी तयार केला होता. मी फक्त वर्गीकरण केले, पानफुटी ला रिडायरेक्ट करावयास हरकत नाही पण जास्त प्रचलीत नाव पानफुटी असेच आहे असे मला वाटते. Gypsypkd ०७:४६, १७ एप्रिल २०१० (UTC)
ब्रिटिश व मेट्रिक पद्धतींची तुलना
संपादनमी नक्कीच ह्या लेखात तुम्हाला मदत करेल. मला {साचा:convert} वर काम करायची इछा आहे. जसे जमेल तसे मी नक्कीच हातभार लावेल.
Maihudon ०७:४४, २० एप्रिल २०१० (UTC)
- सध्या मी काहि बदल केले आहेत. काहि अडचणी, युनिटचे शुध्दलेखन करायचे असल्यास कळवणे.
- Maihudon ०९:११, २० एप्रिल २०१० (UTC)
व्यस्तता
संपादन- विकिपीडियाचे काम पुढे नेता यावे म्हणून सध्या शैक्षणिक क्षेत्रातील काम निवडले तरीसुद्धा वेळ देणे होत नाही आहे हे खरे. माहितगार १४:३९, २० एप्रिल २०१० (UTC)
संचिका, व्यस्तता
संपादननमस्कार,
तुमचा संदेश पाहिला पण लक्ष देता आले नाही, तरी क्षमस्व. संचिकांची यादी (किंवा वर्गांची) दिल्यास नजरे खालून घालेन. व्यस्तता म्हणलात तर होय, सध्या पोटापाण्याचे व इतर अनेक उद्योग एकदम उपटल्याने येथील लक्ष एकदम कमी झाले आहे. अधूनमधून चक्कर टाकतो पण क्लिष्ट बदल करण्यास घेत नाही कारण सलग वेळ देता येत नाही :-(
असो, खुशाली विचारल्याने बरे वाटले :-)
अभय नातू ००:०६, २१ एप्रिल २०१० (UTC)
मला एक संचिका चढवायची आहे. कशी चढवावी?
संचिका चढवा येथे जाऊन प्रयत्न करून पाहिला, परंतु जमत नाही..
--तात्या ०७:५८, २६ एप्रिल २०१० (UTC)
लिंक पहा
संपादननमस्कार, मराठी विकिवरील सदस्यांच्या एकूण एडिट बद्दलची ही लिंक [१] पहा. तुमचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. अशीच प्रगती होत रहावी. मराठी विकिवर प्रबंधक म्हणून तुम्ही काम करावे. तुमच्या नावाचे समर्थन मी करीत आहे. Gypsypkd ०५:१०, २७ एप्रिल २०१० (UTC)
मिडियाविकी चर्चा:Anontalkpagetext
संपादनAlready बर्याच असेच दिसत आहे. अभय नातू ०२:२५, ३० एप्रिल २०१० (UTC)
क्षमस्व
संपादननमस्कार, आपण दोघांनीही एकाचवेळी एकच पान संपादीत केले, मी पान काढण्याची सूचना लावली, तुम्ही त्याचे पुनर्निर्देशन केले. जर हे पान आव्श्यक आहे असे वाटत असेल तर कृपया यातील पान काढा साचा काढावा. माझ्या माहितीत सापुतारा असे नाव नाही, ते सातपुडा असू शकेल. असो. Gypsypkd ११:४३, ५ मे २०१० (UTC)
तुम्ही काल संपादीत केलेला लेख पाहिला, तो तुम्ही वाचविला येवढेच नव्हे तर त्यात माहिती लिहिली. या बद्दल आनंद वाटला. मला खरोखर सापुतारा बद्दल माहिती नव्हती. धन्यवाद. Gypsypkd ०५:०५, ६ मे २०१० (UTC)
भास्कराचार्य
संपादननमस्कार नरसीकर! तसे असेल, तर गणितज्ञ भास्कराचार्यांबद्दलचा लेख 'भास्कराचार्य दुसरा' या शीर्षकाने ठेवणे अधिक योग्य ठरेल. माझ्या आठवणीनुसार इंग्लिश विकिपीडियावरही त्यांच्यावरील लेख 'Bhaskar II' या शीर्षकाने आहे. बाकी, तुम्ही, रक्ते व इतर विकिकर मंडळी सक्रिय राहून मराठी विकिपीडियाच्या कामाची प्रगती राखत आहात, हे पाहून बरे वाटते. सध्या मला ऑफिसातील कामाच्या बोज्यामुळे फार वेळ देता येत नाही. तरीही शक्य ती महत्त्वाची व जमण्याजोगी कामे उरकण्याचा प्रयत्न चालू आहे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:३२, ९ मे २०१० (UTC)
नमस्कार जरा या भागाकडे पण पहा.विनोद रकटे ०१:०७, ११ मे २०१० (UTC)
येथे मला मदत हवी .विनोद रकटे ०१:४८, ११ मे २०१० (UTC)
माहिती पहा
संपादननमस्कार, मी सर्व राषींच्या माहितीसाठी एक तक्ता तयार केला आहे. उदा. मेष राशीची नक्षत्रापासून एकत्र माहिती [२] येथे आहे. एकदा पाहून काही उणे-अधिक असल्यास सांगावे, त्याप्रमाणे माहिती बद्लून प्रत्येक राशीच्या पानात असा तक्ता लावता येईल. Gypsypkd ०५:५७, १८ मे २०१० (UTC)
नमस्कार
संपादनमाहितगार १०:१२, १८ मे २०१० (UTC)
धन्यवाद
संपादनMaihudon ०४:३४, २० मे २०१० (UTC)
धन्यवाद
संपादनधन्यवाद नारसीकर!! अभिजीत साठे १२:४८, २० मे २०१० (UTC)
भारतातील विमानतळांची यादी
संपादनहे सुद्धा पहा - भारतातील विमानतळांची यादी
अभय नातू १७:३६, २२ मे २०१० (UTC)
- विमानतळांचे वेगळे लेख बनविणे अपेक्षित नाही काय?
- अगदी अपेक्षित आहे!! तुम्ही हे लेख तयार करीत असलेले पाहिले व तुम्हाला मदत व्हावी या साठी तो दुवा पाठवला. तुमचा लेख तयार करण्याचा सपाटा चालू राहूच दे!
- अभय नातू १७:४८, २२ मे २०१० (UTC)
- मला जोडाक्षरे नेहमी प्रमाणे व्यवस्थीत दिसत आहेत माहितगार ०७:५२, २३ मे २०१० (UTC)
येत असतो
संपादनयेत असतो पण काही खास घडत नव्ह्ते! :) तुमचा लिखाणाचा झपाटा मस्त आहे!
विमान अपघात साचा
संपादन...५०पेक्षा जास्त व्यक्ति मृत पावलेले अपघात निळ्या रंगात दाखविलेले आहेत असे नमुद आहे परंतु एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ हे हिरव्या रंगात...
हिरव्या रंगातील दुवा हा त्या वर्षातील सगळ्यात घातक अपघात दर्शवितो. अद्याप २०१० पोलंड टी.यु. १५४ दुर्घटना हा हिरव्या रंगात होता. दुर्दैवाने आता एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ला हा (अप)मान प्राप्त झाला आहे.
अभय नातू १५:५३, २६ मे २०१० (UTC)
सहाय्य हवे
संपादन- इंग्रजी विकिपीडीयावर कार्यरत मराठी भाषिक विकिपीडीयन्सना मराठी विकिपीडियावर आमंत्रीत करण्याचे दोन नवे मार्ग मला सुचले. एकतर जसे en:pune लेखाचा इतिहास तपासून मराठी असण्याची शक्यता असलेल्या सदस्य चर्चा पानांवर आमंत्रण संदेश {{User interwiki infoboard mr}} लावला. तसेच इंग्रजी विकिपीडियाच्या शोधाच्या प्रगत advance निवडून केवळ सदस्य user निवडून deshpande आनि patil हि खात्रीशीर मराठी असलेली आडनावे सुद्धा शोधून त्यांच्या चर्चा पानावरही आमंत्रण संदेश {{User interwiki infoboard mr}} लावला.
याच प्रमाणे deshmukh इत्यादी खात्री असलेली आडनावे निवडून आमंत्रण देता येईल. या कामाकरता सवडीनुसार वेळ देता आल्यास पहावे
माहितगार ०७:२४, ३ जून २०१० (UTC)
नमस्कार
संपादनतुम्ही व्यस्त होतात वाटते, असो. तुमचे हे चर्चापान जास्त लांब झाले आहे. वेळ मिळेल तसे हे पान जुनी चर्चा (आर्काईव्ह) मध्ये समाविष्ट करावे. Gypsypkd ०९:२१, ३ जून २०१० (UTC)
हलंत
संपादन- चित्र अगदी तातडीने काढून दिलेत. धन्यवाद !
माहितगार ११:०७, ४ जून २०१० (UTC)
स्वागत
संपादननमस्कार, अहो आभार कसले मानता, रथ जगन्नाथाचा आहे सगळ्यांचाच थोडा थोडा सहभाग. Gypsypkd ०८:५३, ५ जून २०१० (UTC) कदम कदम बढाये जा पद्धतीने चालू आहे. Gypsypkd १०:५५, ५ जून २०१० (UTC)