स्वागत संपादन

     स्वागत Sudam.Jangam, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
  आवश्यक मार्गदर्शन Sudam.Jangam, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१६० लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
 
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

 


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

  Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
  नेहमीचे प्रश्न
  सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
  धोरण
  दालने
  सहप्रकल्प

संतोष गोरे ( 💬 ) १६:३७, १० जानेवारी २०२४ (IST)Reply

आपली संपादने संपादन

नमस्कार, नुकतेच आपण व्यसनमुक्ती, मद्य आणि हुंडा यावर संपादने केली होती, जी की मी उलटावली होती. यास मुख्य कारण म्हणजे, सदरील मजुकुर संबंधित लेखास विशेष उपयोगाचा नव्हता. बशीर मोमीन यांनी केलेले कार्य योग्य आहे यात काही शंका नाही, परंतु आपण एकच मजकूर तीन तीन लेखात जोडला होता. अशा वेळी सदरील मजकूर मुख्य लेखात, म्हणजे बशीर मोमीन (कवठेकर) या लेखात जोडून त्यात व्यसनमुक्ती, मद्य आणि हुंडा; या व इतर लेखांचे दुवे, चौरस कंस टाकून जोडावेत. असे अपेक्षित आहे. काही शंका असल्यास येथे साद घालावा.- संतोष गोरे ( 💬 ) १८:४७, १० जानेवारी २०२४ (IST)Reply

@संतोष गोरे नमस्कार, आपल्या विचारांचा मला आदर आहे. परंतु, एखाद्या व्यक्तीने जर व्यसनमुक्ती विषयाशी निगडित कार्य केले आहे तर ते या विषयाशी संबंधित लेखात उदृत करणे योग्यच आहे. जर तुमच्या मताप्रमाणे हे योग्य नसेल, तर या विषयाशी निगडीत अनिल अवचट वा मुक्तांगण यासारखे स्वतंत्र लेख असताना सुध्दा त्याचा व्यसनमुक्ती या लेखात जोडलेली माहिती सुध्दा तुम्ही वजा केली असती. नाही केली ते योग्यच आहे...कारण व्यसनमुक्ती लेखात/विषयवार हा माहिती लेख आहे तर त्या विषयात योगदान देणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख किंवा माहिती येथे जोडणे उचितच आहे आणि त्याच कारणास्तव, एका ग्रामीण भागात जनजागृती करणाऱ्या लोकशाहीराच्या कार्याचा येथे उल्लेख करणे योग्यच आहे. म्हणूनच, कोणताही दूजाभाव न करता, जोडलेली माहिती पुनर्स्थापित करावी अशी अपेक्षा. Sudam.Jangam (चर्चा) १४:२१, ११ जानेवारी २०२४ (IST)Reply
  1. कृपया वरील सूचना नीट वाचावी. आपण एकच मजकूर तीन तीन लेखात जोडला होता. असे करण्या ऐवजी बशीर मोमीन यांच्या मुख्य लेखात तो मजकूर जोडावा असे आपल्याला सांगितले होते. अनिल अवचट यांचा असा कोणता तोच तो मजकूर आपल्याला विविध लेखात जोडलेला दिसला आहे? तसा मजकूर असल्यास येथे त्याचा उल्लेख करावा, नक्कीच उडवण्यात येईल.
  2. राहिला प्रश्न बशीर मोमीन यांच्या कार्याचा, तर तो आपण व्यसनमुक्ती लेखात तसा उल्लेख नक्कीच करावा.
  3. आणि हो ग्रामीण भागातील कार्यकर्ते, दुजा भाव, असे राजकीय भाषणात जोडण्या योग्य संबोधने येथे टाळावीत. विकिपीडिया हा विश्वकोश आहे, ना ही सोशल मीडिया किंवा वैयक्तिक ब्लॉग. इथे आपण कितीही लिखाण करू शकता, परंतु येथील सूचना आणि सल्ले यांचे पालन करत करत. आपल्या कोणत्याही अडचणीसाठी येथील कोणत्याही जाणकारास साद घालू शकता.-संतोष गोरे ( 💬 ) १६:५९, ११ जानेवारी २०२४ (IST)Reply
    @संतोष गोरे धन्यवाद. कृपया आपण पुन्हा एकदा वाचावे/ पाहणी करावी.मजकूर हा त्या-त्या लेखाला अनुसरून आहे.
    व्यसनमुक्तीसाठी (१)दारु सुटली चालना भेटली (२) दारूचा झटका, संसाराला फटका अशा वगनाट्यांचा उल्लेख आहे तर हुंडाबळी/हुंडा बंदी लेखात (१) सोयर्याला धडा शिकवा (२) हुंद्यापयी घडेल सार या वगनाट्यांचा उल्लेख आहे.
    संदर्भ किंवा भाषा शैली आपणास एक सारखी जाणवली असेल परंतु प्रत्येक लेखात मजकुर/माहिती वेगळी आहे आणि त्या लेखास संयुक्तिक अशीच आहे. आपण पुन्हा परीक्षण करावे आणि जोडलेली माहिती ही पुनर्स्थापित करावी.
    आणि, मी ग्रामीण कार्यकर्ते किंवा राजकीय भाषण वगेरे असे काही लिहिले नाही. मी फक्त लॉजिक मधील (एकाला वगळावे व दुसऱ्याला ठेवावे) विसंगती वर लक्ष वेधले आहे. Sudam.Jangam (चर्चा) १८:२७, ११ जानेवारी २०२४ (IST)Reply
    पुन्हा एकदा विचारतो, कुणाला वगळून कुणाला ठेवले? अनिल अवचट यांचा असा कोणता तोच तो मजकूर आपल्याला विविध लेखात जोडलेला दिसला आहे? तसा मजकूर असल्यास येथे त्याचा उल्लेख करावा, नक्कीच उडवण्यात येईल.-संतोष गोरे ( 💬 ) संतोष गोरे ( 💬 ) २०:१७, ११ जानेवारी २०२४ (IST)Reply
    @संतोष,
    मोमीन कवठेकर यांची जोडलेली माहिती सुध्दा प्रत्येक लेखाला अनुसरूनचआहे आणि हे मी उदाहरणासह वर स्पष्ट केलेच आहे.
    विकिपीडिया योग्य माहिती जोडण्यासाठी आहे. अवचट यांची या लेखात माहिती असावीच..ते विषयाला धरून आहे आणि माझा याला विरोध नाहीच मुळी. त्यांचे उदाहरण देऊन फक्त तुमच्याकडून होणारी विसंगती (मोमीन कवठेकर यांचे कार्य उडवणे) स्पष्ट केली आहे.
    हे वेगवेगळ्या विषयाचे लेख एकाच वेळी कोणी वाचेल असे नाही. त्यामुळे, माहिती योग्य आणि प्रत्येक लेखाला अनुसुरून सुसंगत असल्यामुळे पुनर्स्थापित करावी. Sudam.Jangam (चर्चा) २२:२१, ११ जानेवारी २०२४ (IST)Reply
मी आपणास वरती राहिला प्रश्न बशीर मोमीन यांच्या कार्याचा, तर तो आपण व्यसनमुक्ती लेखात तसा उल्लेख नक्कीच करावा. असे म्हटले होते, जे की आपल्याला नीट समजले नसावे म्हणुनी स्वतः व्यसनमुक्ती या लेखात जोडले आहे. कृपया आपण नवीन आहात, थोडे समजून घ्यावे, बशीर मोमीन कवठेकर असो की अनिल अवचट असो, अथवा अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस, त्यांचे कार्य हे त्यांच्या लेखात जोडवायचे असते. व्यसनमुक्ती या लेखात फक्त त्यांचा उल्लेख आणि जुजबी माहिती जोडावी असे अभिप्रेत आहे. आपणास परत काही अडचण असल्यास मला किंवा कोणालाही संपर्क साधावा, विकिपीडिया सर्वांसाठी आहे, आपण राग न मानता येथे नियमित लिखाण करावे अशी विनंती आहे.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:०१, १३ जानेवारी २०२४ (IST)Reply
@संतोष गोरे धन्यवाद आणि आपला आभारी आहे. Sudam.Jangam (चर्चा) १०:५३, १३ जानेवारी २०२४ (IST)Reply

ताकीद संपादन

  1. आपण मराठी विकिपीडियावर आल्यापासून बेछूट आरोप करत सुटले आहात. नुकताच No justification for deletion of information. Some accounts working in collaboration to impose one's views. Information added is relevant to the topic, authentic and with reference so should be added असा आरोप केलेला दिसतोय. आपण नवीन सदस्य आहात, तेव्हा जाणकारांचा सल्ला घ्यावा असे आपणास वाटत नाही का?
  2. अजून आपली चर्चा संपली नसताना देखील आपण काही संपादने मनानेच परतावलित. आपण चर्चा पूर्ण होण्याची वाट देखील पाहिली नाहीत. आपल्यात सामंजस्य आणि समजूतदारी नाही असे दिसतेय.

ही आपणास अंतिम ताकीद देण्यात येत आहे. इथून पुढे आपण कोणाशीही बोलताना थोडी समजूतदारी दाखवाल अशी अपेक्षा आहे, अन्यथा आपण येथे कायम प्रतिबंधित व्हाल. -संतोष गोरे ( 💬 ) १७:१६, १२ जानेवारी २०२४ (IST)Reply

@संतोष गोरे Mr. Khirid आपल्या संपर्कात आहेत का? किंवा आपल्या मार्गदर्शनात कार्य करतात का? ते आपले किंवा तुम्ही त्यांचे पाठीराखे आहात का? ...असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Mr Khirid Harahad यांनी माहिती वजा करताना कुठल्याही प्रकारचे कारण दिले नाही. Wikipedia च्या "जाणकार" लोकांनी असेच काम करायचे असते का? आपण उडवलेली माहिती पुन्हा Mr. Khirid तुमच्या पाठोपाठ पुन्हा उडवतात, तेही कोणतेही कारण न देता, तेंव्हा हे (vandalism or collaboration) आहे अशी शंका मी व्यक्त केली आहे.
विकिपीडिया किंवा तुमच्यापेक्षा अधिक जाणकार, यावर नियमानुसार नक्कीच पडताळणी करतील अशी मला अपेक्षा आहे. आपली ही 'ताकीद ' म्हणजे व्यक्त केलेल्या शंकेला बळ मिळतेय. कारण न देता माहिती का उडवली या विषयी अशीच विचारणा/ताकीद आपण Mr Khirid यांच्याकडे केलीय का?
असो, मोमीन यांचे कार्य माहिती जोडण्यास आपण या पूर्वीच अनुकूलता दाखवली होती (चर्चा पहावी) परंतु पुनर्स्थापित केली नव्हती तेंव्हा आपल्यास वेळ नसावा असे गृहीत धरून मी ती माहिती पूर्ण केली. यात राग येण्याचे काही कारणं नसावे कारण विकी हा महिताचा सागर आहे आणि म्हणतात ना, "थेंबे थेंबे तळे साचे" तेंव्हा फक्त नवीन आहोत म्हणून असे ताकीद वगेरे योग्य नाही. मलाही चांगले माहिती जोडून, लिंक जोडून विविध लेखात माहिती जोडण्याचे पुण्य काम करायचे आहे. Sudam.Jangam (चर्चा) १०:५२, १३ जानेवारी २०२४ (IST)Reply
  1. पाठीराखे - असा काही संबंध नसतो.
  2. संपर्क - विकिपीडियावर कोण कोणाशी बोलतो, काय बोलतो, हे सार्वजनिक असते, यात काहीही लपून नसते, सबब माझ्या तसेच @Khirid Harshad यांच्या चर्चा पानावर गेल्यास कोण कोणाशी काय बोलले ते तुम्हाला दिसून येईल.
  3. कोणतेही कारण न देता माहिती उडवणे - असे होऊ शकते. परंतु यात एक विशेष बाब म्हणजे, द्रुतमाघारकार आणि प्रचालक यांना एक विशेष सुविधा असते. ती म्हणजे 'द्रुतमाघार' याद्वारे ह्या व्यक्ती जेव्हा कोणतीही संपादने परतावतात तेव्हा ते काम एका सेकंदात होते. त्यांच्या समोर संपादन सारांश नावाची खिडकी देखील येत नसते. ज्यामुळे ते कारण लिहू शकत नाहीत.-संतोष गोरे ( 💬 ) १३:३४, १३ जानेवारी २०२४ (IST)Reply