सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/जुनी चर्चा १
विशेष चर्चा पाहा |
संदर्भ
संपादननमस्कार,
तुमच्या प्रश्नानंतर विकिपीडियावर शोध घेतला असता संदर्भ कसे द्यावे याबद्दल पटकन काही सापडले नाही म्हणून तीन सहाय्यपाने सुरू करीत आहे. हा पाने आहेत --
- विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साधे संदर्भ कसे द्यावे
- विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून - संदर्भ देण्यासाठी साचे कसे वापरावे
- विकिपीडिया:संदर्भीकरण - क्लिष्ट किंवा नेहमी न वापरले जाणार्या संदर्भीकरणाच्या पद्धती
सुरुवातीस इंग्लिश विकिपीडियावरील माहिती असली तरी हळूहळू त्यात मराठी विकिपीडियावरील स्थानिक धोरणे त्यात घातली जातील.
सदस्य:माहितगार यांनी याबद्दल काही तयार केले असल्याची दाट शक्यता आहे तरी त्यांनाही एक संदेश द्यावा.
अभय नातू १७:३७, २० एप्रिल २०११ (UTC)
संदर्भ देण्याची पद्धत बरोबर आहे.
काही सूचना --
- पुस्तकाचा संदर्भ देताना शक्य झाल्यास आयएसबीएन द्यावा.
- लेखांमध्ये आपली सही (~~~~) करू नये. चर्चा पानांवर, चावडीवर जरुर करावी.
अभय नातू १७:५९, २० एप्रिल २०११ (UTC)
सहाय्याबद्दल
संपादनधन्यवादसंतोष दहिवळ १८:०५, २० एप्रिल २०११ (UTC).
पुनर्निर्देशन
संपादनतुम्ही केलेले बदल पाहिले. एखाद्या लेखाचे दुसरीकडे पुनर्निर्देशन करताना पहिल्या लेखात फक्त '''#पुनर्निर्देशन[[लेखाचे नाव]]''' इतकाच मजकूर पाहिजे. तुम्ही पहिल्या लेखात पुनर्निर्देशन घातले परंतु उरलेला मजकूर काढला नाहीत म्हणून तुम्हाला अपेक्षित बदल झाला नाही.
अभय नातू ०२:०१, २२ एप्रिल २०११ (UTC)
धर्मापुरी आणि केदारेश्वर
संपादननमस्कार!
मला वाटते धर्मापुरीतील केदारेश्वर मंदिर अश्या संदर्भात सध्याचा लेख ठीक ठरेल. मात्र त्यासाठी त्याचे "केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी" किंवा "केदारेश्वर मंदिर, जे-कोणते-गाव-असेल-त्या-गावाचे/जिल्ह्याचे-नाव" असे स्थानांतरण करता येईल (हे तुम्हीदेखील 'स्थानांतरण' टॅब वापरून करू शकाल). एकदा हा लेख योग्य शीर्षकाखाली आला, की मग धर्मापुरी लेखात या मंदिराबद्दल संक्षेपाने (दोनेक वाक्यांत) उल्लेख करून विकिदुवा टाकता येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३०, २२ एप्रिल २०११ (UTC)
इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस?
संपादनलंडनमध्ये ऑक्सफ़र्ड युनि.प्रेस, केंब्रिज युनि.प्रेस सारख्या संस्था आहेत. पण ज्या छापखान्यात रामदास भटकळांनी काम केले ती English University's (किंवा Universities) Press लंडनमध्ये नेमकी कुठे आहे? लंडन गाइडमध्ये सापडली नाही. ...J १८:०८, ९ मे २०११ (UTC)
इंग्लिश युनिव्हर्सिटीज
संपादनEngish Universities चा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद....J १८:५७, ९ मे २०११ (UTC)
अर्धा ऱ
संपादनऱ्य | ऱ्ह | ॲ | ऑ
या व इतर सर्व शब्दांची माहिती मी युनिकोड या पानावर लिहिलेली आहे. . . Ashish Gaikwad १५:१२, १० मे २०११ (UTC)
स्थानांतरण
संपादननमस्कार,
जर एखादे पान चुकीच्या (शुद्धलेखन, व्याकरण, इतर दृष्ट्या) शीर्षकाखाली तयार केले गेले तर त्याचे बिनचूक शीर्षकाखाली स्थानांतरण केले जाते. बरेचदा जुन्या पानावरुन नवीन पानाकडे पुनर्निर्देशनही ठेवले जाते. असे केल्याने जर एखाद्याने जुन्या नावाने शोध घेतला तर त्याला आपोआप नवीन पानाकडे नेले जाते. क्वचित जुने पान (शीर्षकात अनेक चुका, इंग्लिशमध्ये असलेले) गाळलेही जाते.
अर्थात, स्थानांतरण झालेले प्रत्येक पान साफ चूक असते असेही नाही, पण अधिक समर्पक अशा शीर्षकाखाली त्याचे स्थानांतरण केले जाते. तसेच विकिपीडियावरील काही संकेतांचे पालन करण्यासाठीही असे केले जाते. उदा. येथे व्यक्तिलेखांची शीर्षके लिहिताना आद्याक्षरांत जागा सोडली जात नाही पण आद्याक्षरे व आडनावात जागा असते. म्हणजे ह.अ.भावे हे चूक नाही पण ह.अ. भावे हे अधिक बरोबर.
अभय नातू १८:१९, ११ मे २०११ (UTC)
पुराचुंबकिय कालमापन पद्धती
संपादनमी पुराचुंबकिय कालमापन पध्दती पानाचे पुराचुंबकिय कालमापन पद्धती असे स्थानांतरण आधीच केले होते.
स्थानांतरण करण्यासाठी पानाच्या वरच्या बाजूस संपादन, इतिहास जवळ स्थानांतरण असा एक टॅब असतो, त्यावरुन स्थानांतरण करता येते.
अभय नातू १९:३७, ११ मे २०११ (UTC)
चुंबकीय ... ईय ... ई = दीर्घ.
-धनंजय आदित्य.
आग मराठी फॉन्ट
संपादनआग मराठी फॉन्ट हा खास फॉन्ट मी स्वतः माझ्या आग ऑपरेटिंग सिस्टिम साठी तयार केला आहे. हा फॉन्ट वापरण्यासाठी तुम्हाला आग ऑपरेटिंग सिस्टिम वापरावी लागेल.
Ashish Gaikwad १३:२०, १३ मे २०११ (UTC)
अॅपल
संपादनतुम्ही अॅपल या पानाबद्दल केलेली सूचना पाहिली.
1. ती मला अशी दिसते --
मला दोन्ही अॅपलमध्ये काहीही फरक दिसत नाही.
2. कोणता कोड नक्की वापरावा याबद्दल एकमत होईपर्यंत लेखांचे स्थानांतरण करू नये अशी विनंती मी आधीच केली आहे.
तरी सध्या अशा लेखांची यादी बनवून विकिपीडिया:युनिकोड/बदल सारख्या एखाद्या पानावर करुन ठेवावी. एकदा पुढील पावले ठरली की मग सांगकाम्या वापरून एकगठ्ठा सुसूत्रीकरण करता येईल.
अभय नातू १४:३९, १३ मे २०११ (UTC)
आंतरविकी दुवे
संपादनसंतोष,
तुम्ही ऑब्सिडियन कालमापन पद्धतीमध्ये आंतरविकी दुवे घातलेले पाहिले. हे करणे स्वागतार्ह असले तरी ते तुम्ही स्वतः करण्याची गरज नाही. विकिपीडियावर अनेक सांगकामे नेमके हेच करण्यासाठी फिरत आहेत तरी त्यांना ते करू द्यावे व तुमचा वेळ अधिक चांगल्या संपादनांत वापरावा. या सांगकाम्याना एका कोणत्या तरी (उदा. इंग्लिश) विकिपीडियाकडील आंतरविकी दुवा पुरतो. त्यानंतर ते इतर सगळे विकिपीडिया धुंडाळून तेथील दुवे येथे घालतात.
अर्थात, ही फक्त सूचना आहे आणि तुम्हाला स्वतःच हे दुवे घालायचे असतील तर त्यात आडकाठी नाही.
अभय नातू १५:११, १३ मे २०११ (UTC)
उत्खनन साचा
संपादनमहाराष्ट्रातील पुरातत्वीय उत्खननस्थळे हा साचा बनवताना त्यात नेवासे (पुरातत्व उत्खनन स्थळ) अशी नावे द्यावी. शिवाय त्यात्या गाव/शहराच्या लेखात जमल्यास तेथील उत्खननाबद्दल दोन-चार ओळी लिहाव्यात, किमानपक्षी हे सुद्धा पहा मथळ्याखाली नेवासे (पुरातत्व उत्खनन स्थळ) असा दुवा द्यावा.
अभय नातू १६:५७, १३ मे २०११ (UTC)
त्व आणि त्त्व; त्य आणि त्त्य, त आणि त्त
संपादनसंस्कृतमधून मराठीत आलेले सत्त्व, तत्त्व, महत्त्व, व्यक्तिमत्त्व, हे शब्द अनुक्रमे सत्, तत्, महत्, आणि व्यक्तिमत् या शब्दांना त्व हा प्रत्यय लागून बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या लिखाणात ’त्व’ न येता त्त्व(त्त्व) येतो.
वक्तृत्व, नेतृत्व, मातृत्व, पितृत्व, पटुत्व, जडत्व, गुरुत्व, स्त्रीत्व, पुरुषत्व आदी शब्दांत ’त्व’ असतो, ’त्त्व’ नाही.
याच कारणाने पाश्चात्त्य, पश्चात्ताप, वृत्त, वृत्ती, परावृत्त वगैरे शब्दांत आधीच्या भागांत ’त्’ असल्याने एकूण शब्दांत ’त्त’ येतो. पाश्चिमात्य, पौर्वात्य, या शब्दांत एकेरी ’त्य’ आहे, (त्त्य)त्त्य नाही.
अनावृत(न झाकलेले, जाहीर) मध्ये एक ’त’, आणि अनावृत्त(आवृत्ती न काढलेले, पुन्हा न घडलेले) मध्ये (त्त)त्त असतो.
साहजिकच पुरातत्त्वमध्ये दुहेरी त पाहिजे...J ०६:००, १४ मे २०११ (UTC)
चावडी, भांगरे
संपादननमस्कार,
तुम्ही कोणा अनामिक सदस्याच्या राघोजी भांगरे लेखाबद्दलच्या संदेशास दिलेले उत्तर पाहिले. संयम ठेवून मुद्देसूद उत्तर दिलेत हे पाहून आनंद वाटला. अनेकदा विकिपीडियावर खूप व्यक्ती येउन स्वतःच्या किंवा इतरांच्या कामाबद्दल अनेक प्रक्षोभक संदेश ठेवून जातात. त्यांना प्रक्षोभक उत्तरे न देता असेच समजावून देणे हे आपणा सर्वांचे (प्रसंगी खूप अवघड असे) काम आहे.
धन्यवाद,
०४:२४, १६ मे २०११ (UTC)
अॅ साठी तीन मार्ग
संपादनमी टंकित केलेला अॅ (अ वर चंद्र असलेला असा) कसा दिसतो, हे आजपर्यंत मला कुणी सांगितले नव्हते. त्यामुळे माझा अॅ ही इतरांसारखाच (अॅ) उमटतो असे मला वाटत होते. पण जर मी काढलेला अॅ खरोखरीच योग्य असेल, तर तो काढण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यांतल्या दोन अशा :
१. विकिपीडियाचे फॉन्ट्स वापरण्याऐवजी बरहा, गमभन किंवा दुसरे काही विशिष्ट फॉन्ट्स वापरावेत. स्पोर्ट्स, लॉर्ड्स सारखे शब्द टंकताना फॉन्ट्स बदलावेच लागतात. विकीवर हे शब्द स्पोर्ट्स, लॉर्ड्स असे चुकीचे उमटतात.
२. विकीचेच फॉन्ट्स वापरून अॅ टाइप करायचा असेल तर, संपादन पानाच्या तळाशी दिलेल्या अॅ वर टिचकी मारावी. जिथे कर्सर असेल तिथे अॅ उमटेल. हीच पद्धत एरवी र्य किंवा र्ह टाइप करणे जमत नसेल तरी वापरता येते. ....J १६:११, २० सप्टेंबर २०११ (UTC)
अलंकार
संपादनहा लेख फारच सुंदर झाला आहे. माझ्या बालपणात शिकलेल्या गोष्टींची आठवण झाली. या लेखाबद्दल माझे अभिनंदन कृपया स्विकारावे.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०६:३०, २१ सप्टेंबर २०११ (UTC)
अनावश्यक संपादने
संपादननमस्कार संतोष ! तुम्ही मांडलात तो मुद्दा रास्तच आहे. मात्र पाने संपादताना काही वेळा सदस्यांकडून टायपो/तत्सम चूक व्हायचीही शक्यता असू शकते. त्या चुका नंतर दुरुस्त करणे हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय. माझ्या चर्चापानावर जे चुकीचे वर्गीकरण पडले होते, ते मंदार कुलकर्णी यांनी माझ्या एका संदेशात एका वर्गाविषयी चौकशी करताना चुकीचा सिंटॅक्स वापरल्याने घडले होते.. व ते मी आज दुरुस्त केले. माझ्या चर्चापानाचा आजचा इतिहास जाऊन तपासल्यास, मी काय दुरुस्ती केली, ते आपल्याला कळू शकेल. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५२, २३ सप्टेंबर २०११ (UTC)
खेळांविषयी
संपादननमस्कार संतोष !
मैदानी मराठा खेळांविषयी तुम्ही लेख लिहीत असल्याचे पाहून बहुत संतोष जाहलां! :) बाकी गोल खो-खो या लेखात मांडणी व आशयात काही किरकोळ (, पण आकर्षक ठरतील असे) बदल केले आहेत. ते ठीक वाटल्यास, अन्य क्रीडाविषयक लेखांमध्येही अश्या स्वरूपात मांडणी वापरता येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५१, २४ सप्टेंबर २०११ (UTC)
मराठी विकिपीडियाचा झेंडा - मुंबई विकिकॉन्फरन्स मध्ये..
संपादननमस्कार,
विकिपीडिया कॉन्फरन्स बाबत आपण चावडीवर वाचलेच असेल. आपण त्यास उपस्थित राहणार आहेत का ? सदर कार्यक्रमात मराठी विकिपीडिया साठी काय काय आणि कसे करावे असे आपणास वाटते ? कळवावे.मंदार कुलकर्णी १६:०५, २४ सप्टेंबर २०११ (UTC)
- >>यापूर्वीच्या विकी कॉन्फरन्सला जे कोणी उपस्थित असतील त्यांचे अनुभव कळाल्यास किंवा वाचायला मिळाल्यास बरे होईल. असा प्रयत्न आपल्याला करता येईल काय ?
संतोष दहिवळ १६:३६, २४ सप्टेंबर २०११ (UTC)
- नमस्कार संतोष,
- अशा तर्हेचे विकी संमेलन भारतात प्रथमच होत आहे. त्यामुळे मागील अनुभव हे विदेशी आहेत. त्यातही ते मुंबईत होत असल्याने साहजिकच मराठमोळा छाप त्यावर पडावा हि रास्त अपेक्षा. आपण मराठीसाठी वेगळी खास सत्रे मंजूर करून घेतली आहेत. आता मराठी विकिपिडीयन्सनि त्याचे सोने करावे असे वाटते.
- आपण आपल्या परीने ह्यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदत करू शकता/करावी असे मला वाटते. आपण त्यास अनकूल असाल तर मंदारला मी तसे कळवतो आपणही marathiwikipedia@gmail.com येथे इमेल दिला तर एकास -एक संपर्क करणे सोपे जाईल.
- धन्यवाद
- राहुल देशमुख १२:५४, २५ सप्टेंबर २०११ (UTC)
लेखांतील एचटीएमएल
संपादननमस्कार, लेखांमध्ये सुबकता आणण्यासाठी एचटीएमएल वापरताना शक्यतो direct tags वापरू नयेत. यासाठी शक्यतो विकिसिंटॅक्सचा उपयोग करावा -- उदा. ठळक मजकूरासाठी <bold></bold>च्या ऐवजी '''''' वापरावे, किंवा <br /> एवजी दोन ओळी सोडाव्यात, इ. जेथे विकिसिंटॅक्स उपलब्ध नसेल तेथे divचा उपयोग करावा उदा - मजकूम मध्यात आणण्यासाठी <center></center>च्या ऐवजी <div style="text-align: center;">मजकूर</div> वापरावे. असे बरेच टॅग संपादनपेटच्यावर उपलब्ध असतात. अगदीच नाईलाज असल्यास direct tags वापरावे.
अभय नातू १९:३२, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)
विकि टूलबार
संपादनलेखाची 'संपादन' कळ टिचकवल्यानंतर जेंव्हा संपादनास लेख उघडतो, त्यात विकि टूलबार काम करीत नाही. कोणी यात मदत करेल काय?
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:२५, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)
अनावश्यक लाइन-ब्रेक
संपादननमस्कार संतोष ! तुम्ही नुकत्याच केलेल्या संपादनांमध्ये - उदा. थॉमस जेफरसन, अँड्र्यू जॅक्सन इत्यादी - बाह्य दुवे, मार्गक्रमण साचे यांच्यात प्रत्येक ओळीनंतर एकेक ओळ अनावश्यक सोडलेली दिसत आहे. त्यामुळे पानातील आशयाची मांडणी उगाचच लांबल्यासारखी व अनाकर्षक वाटत आहे. कृपया हे अनावश्यक लाइन-ब्रेक काढावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३५, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)
- विकिएडिट मागे कधीतरी मी वापरून पाहिले होते; तेव्हा ते ठीक वाटले; मात्र तरीही काही गोष्टी स्वतः तपासून करणे व विशेषकरून जतन करायच्या आधी तपासून बघणे अधिक इष्ट ठरते, असा माझा अनुभव आहे. अगदी ऑटोविकिब्राउझर वापरून सांगकाम्या चालवतानाही, नेमके काय बदल होत आहेत, ते तपासून बघणे योग्य ठरते.. त्यामुळे ही खबरदारी कुठलीही स्वयंचलित, अर्धस्वयंचलित उपकरणे/सुविधा वापरताना घेणे उत्तम!
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४५, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)
सांगकाम्या
संपादननमस्कार,
तुम्ही सांगकाम्या चालवून बदल केल्याचे पाहिले. त्यात काही अडचण आली का? आल्यास मला किंवा संकल्पला कळवावे. आम्ही दोघेही अधूनमधून AWB-based सांगकामे चालवित असतो.
शक्यतो सांगकाम्या चालवताना तो एखाद्या वेगळ्या सदस्यनामाखाली चालवावा म्हणजे तुम्ही हाताने केलेले बदल आणि स्वयंचलित बदल यात फरक करता येतो. अशा सांगकाम्यासाठी नवीन नावाखाली सदस्यत्व घ्यावे, उदा. संकल्पचा सांगकाम्या आहे सांगकाम्या संकल्प, तर मी क्रिकाम्या, रिकाम्या आणि हरकाम्या हे तीन सांगकामे वेगवेगळ्या कामांसाठी वापरतो.
नवनवीन प्रयोग करुन पाहण्यासाठी प्रोत्साहन!
अभय नातू ०१:४६, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)
- संतोष, कदिम शहापुर व अन्य काही लेखांमध्ये सांगकाम्या चालवताना ऑर्फन साचा लावला गेला आहे, असे दिसते. त्याची खरे तर त्या लेखांमध्ये आवश्यकता दिसत नाही. तुम्हांला तेच अभिप्रेत आहे काय ?
- बाकी, प्रयोग करून पाहताना ऑटोविकिब्राउझरात 'बॉट' टॅबावरचा "ऑटोसेव्ह" पर्याय निकामी करून मग एडब्ल्यूबी चालवावा; म्हणजे प्रयोग करून पाहताना बदल करण्यापूर्वी गोष्टी तपासता येतात.
- काही मदत लागल्यास, अभय म्हणतो, तसे त्याला किंवा मला निस्संकोचपणे कळवा.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४५, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)
- सांगकाम्याची तंत्रे हळूहळू जमू लागली आहेत, असे दिसते. अभिनंदन ! :) - --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:५६, ११ ऑक्टोबर २०११ (UTC)
वर्गीकरण
संपादनचंद्रगुप्त मौर्य, अमेंडिंग अॅक्ट १७८१, आदिलशाही इत्यादी लेखांत एडब्ल्यूबी वापरून वर्ग:इतिहास हा वर्ग घातल्याचे दिसले. सहाय्य:वर्ग या साह्यपानावरील वर्गीकरणविषयक संकेतांनुसार प्रत्येक लेखात विषयानुरूप चपखल वर्गीकरण घालणे अपेक्षित आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य वगैरे लेखांमध्ये अगोदरपासूनच चपखल वर्ग असताना 'वर्ग:इतिहास' या वर्गासारखे ढोबळ वर्गीकरण उपयुक्त ठरत नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:२५, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
सांगकाम्या
संपादनतांत्रिक चावडीवर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही अजून येथे असलेले पाहिले म्हणून लक्ष वेधून घ्यावे म्हणले.
१७:०५, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
अजिंठा-वेरूळची लेणी
संपादनअगदी बरोबर ओळखलेत. दहा दिवसांनी तुमचा सांगकाम्या सदस्य autoconfirm होईल त्यानंतर अर्धसुरक्षित पानांवरसुद्धा त्याला बदल करता येतील. सुरक्षित पानांवर कोणत्याच सांगकाम्याला बदल करता येत नाहीत.
अभय नातू १९:२८, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
AWB शिकवणीची विनंती
संपादन- नमस्कार आपण AWB वापरताहात हे पाहिले. आपण पुण्यात असता किंवा कसे ? पुण्यात विकिपीडियावर बॉट/AWB कसे वापरावे याची शिकवणी अरेंज करू शकल्यास पहावे आपला विद्यार्थी होऊन हे कौशल्य शिकणे आवडेल.माहितगार १४:१०, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
- I had a word with Sankalp some days back on the similar topic. He has suggested to have VDO chat (may be on skype) to teach us on this. Can we arrange a session on the same with 4-5 interested members in this? मंदार कुलकर्णी
- AWB चे स्वयंअध्ययन करून, 'केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे ' हि उक्ती प्रत्यक्षात आणून आपण निश्चितच स्तुत्य काम केले आहे. सध्या व्यस्त आहे पण वेळ मिळेल तसा सांगकाम्या कौशल्य आत्मसात करण्याची इच्छा आहे हे खरे.
माहितगार १४:२५, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
माहितीचौकट भारतीय जिल्हा...
संपादनमाहितीचौकट भारतीय जिल्हा साचात संकेतस्थळ मधे संकेतस्थळ शब्द जोडला जातो त्यामुळे दुवा पान व्यवस्थित जोडले जात नाही. उदा. शिवनी जिल्हा मध्ये असा दर्शनीय येते. http://seoni.nic.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3
सचिन १६:४८, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
- बदल छानच आहे. आपण मांडलेली सुचना मान्य आहे. आपण असे केल्यास वाचलेला वेळ दुसर्या कामाला देता येईल व आपण राहत असलेले खेडे कोणते आहे? सचिन १७:१२, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
- बरोबर. माझ्याही लक्षात ते आले आहे. मात्र त्यासाठी काहीसे जटिल if-elsif-else अटींचे लॉजिक कोडावे लागेल. त्यामुळे थोडा धीर धरून काम तडीस न्यावे लागेल. थोडे आठवड्यांती करून बघेन म्हणतो. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
अभिजित साठे यांचे प्रचालकत्वासाठी नामांकन
संपादननरसीकर व तुमच्या सूचनेनुसार प्रचालकपदासाठी अभिजित साठे यांचे विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे नामांकन जाहीर केले आहे. कृपया तेथे आपला कौल कळवावा. धन्यवाद. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:२२, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
आभार
संपादनमाझे प्रस्तावास अनुमोदन दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:०६, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
HotCat
संपादननमस्कार आपण नोंदवलेला बग पाहीला, बग नोंदवण्याबद्दल पुढाकार घेतल्या बद्दल अभिनंदन. इंग्रजी व इतरही विकिपीडियातील इतरही चांगल्या सुविधा मराठी विकिपीडियावर आणण्यास पुढाकार घेतल्यास स्वागतच आहे.इंग्रजी शिवाय इतर भाषातील विकिपीडिया जसे जर्मन फ्रेंच इत्यादी सुद्धा वेग वेगळ्या सुविधा राबवून घेत असतात त्यांचे अध्ययब गुगलच्या ट्रांसलेशन सुविधेच्या आधारे करता येऊ शकते. नविन फळीतील/पिढीतील लोक पुढाकार घेत आहेत हे अधिकाधीक व्हावे म्हणजे मराठी विकिपीडियाची प्रगती अधिक वेगाने होईल माहितगार १५:१३, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
- ओह ओके मी बग पुन्हा वाचला तर ती गोष्ट मराठी विकिपीडिया प्रचालकांनी राबवावयास हवी.मी विकिपीडिया तांत्रीक चावडीवर तुमच्या वतीने विनंती लावत आहे. बाब तांत्रिक असल्या कारणाने तांत्रिक पार्श्वभूमिच्या प्रचालकांनी ते करण्याकरता वाट पाहूयात माहितगार १५:२३, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
- संतोष, थोडा अवधी घेऊन त्यावर अभ्यास करून मत कळवतो. या आठवड्याच्या मध्यावर मी पुण्यात पोचत आहे. त्याआधी येथील कामे निपटायची असल्याने, या कामासाठी नीटसा वेळ काढणे अशक्य वाटते. परंतु नंतरच्या काळात याविषयी अधिक माहिती घेऊन तुम्हांला तसे कळवतो.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५५, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
location map हा साचा तालुक्याला सुयोग्य वाटत नाही.....
संपादनLocation map |महाराष्ट्र हा साचा तुम्ही श्रीगोंदा तालुका व इतर अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांना लावलेला दिसतो आहे. तो साचा स्थळ किंवा गाव दर्शवत आहे. त्या तालुक्यांची किंवा जिल्ह्यांना नकाशाचित्र आहेत, ते व्यवस्थित दिसते असे मला वाटते. सचिन ०२:२५, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)
संत महिपती
संपादनसंतोष जी
आपण संत महिपती या लेखाचे नवीन पान निर्माण केल्या बद्दल हार्दिक धन्यवाद. मी मराठी विकिपीडियावर नवीन आहे. मला हिंदीचा अनुभव आहे. काही चुकत असेल जरुर कळवा. परवा पुण्याला आपली भेट झाली नाही. तुम्ही अहमदनगर जिल्ह्यतील आहात का .. असो धन्यवाद
येथील योगदानासाठी
संपादनLocation map
संपादनसंतोष,
आपण नकाशा साच्यांमध्ये रस घेतला आहे हे पाहून खूप आनंद झाला. नकाशा साचे वापरल्याने भौगोलिक लेखांचा दर्जा उंचावतो असे मला वाटते. Keep it up! एक छोटीशी सुचना. नकाशा साचा तयार केल्यावर योग्य वर्गीकरण व आंतरविकि दुवा जोडावा. ह्यामुळे हे साचे सापडण्यास मदत होईल. - Abhijitsathe ०३:४१, २९ नोव्हेंबर २०११ (UTC)
Hotcat
संपादनCould you please guide me in using HotCat on Marathi Wiki? - प्रबोध (चर्चा) १४:१५, २ डिसेंबर २०११ (UTC)
धन्यावाद!!
संपादनआपण दिलेल्या सुचनांनुसार मी हॉट कॅट वापरू शकतो आहे. परंतु मला एक शंका होती, आपण इंग्रजी विपी नुसार importScript('MediaWiki:Gadget-HotCat.js'); आपल्या vector.js मध्ये टाकून हे कळयंत्र वापरू शकतो का? याने आपल्याला नेहेमी updated version वापरायला मिळेल. - प्रबोध (चर्चा) १७:४१, ४ डिसेंबर २०११ (UTC)
चावडी पुनर्स्थापित
संपादनसंतोष,
सदस्यांशी संपर्क आणि संवाद अखंड राहावा म्हणून चर्चे अंती चावडी त्वरित पुनर्स्थापित करावी असे ठरल्याने मी चावडी सुरु केली आहे. आपण चावडीचे काम धूळपाटीवर पूर्ण करू आणि मग त्यास चावडीवर लागू करू. आपण एक धूळपाटी चावडी बनवावी आणि काम सुरु ठेवावे. राहुल देशमुख २१:५४, ३ डिसेंबर २०११ (UTC)
- संतोष,
सांगकाम्यानि बर्याच शुद्ध लेखन आणि टायपो चुका दुरुस्त केल्या पण त्यामुळे दुवे चुकण्याची शक्यता आहे तेव्हा पुन्हा दुवे करण अथवा पुनर्निर्देशने करावी लागतात का ते पहावे. राहुल देशमुख १५:११, ४ डिसेंबर २०११ (UTC)
- धन्यवाद संतोष,
मी पाहून घेतो आणि लागणाऱ्या जुजबी दुरस्त्या पण करून घेईन. तुम्हाला काही लिखाण करायचे असल्यास येथे आपण माहिती भरू शकाल का ? इतरही मदत लागल्यास सागतोच. राहुल देशमुख २०:००, ५ डिसेंबर २०११ (UTC)
ट्विंकल टॅब
संपादनसंतोष,
मी याबद्दल काही वाचलेले नाही किंवा हा प्रयोगही करून पाहिलेला नाही. पुढील एक-दोन दिवसांत याबद्दल संशोधन करुन समस्या सुटते का हे पाहतो.
अभय नातू १५:५२, ४ डिसेंबर २०११ (UTC)
सांगकाम्या
संपादनघोटाळा माझ्याही लक्ष्यात आला आहे, त्यात दुरुस्ती करतो!! - प्रबोध (चर्चा) १८:२३, ४ डिसेंबर २०११ (UTC)
- संतोष,
- सांगकाम्या चालवताना सदस्य चर्चा पानात बदल करू नयेत. तेथील चर्चा शुद्धलेखनाबाबतीत असू शकते व असे बदल केल्याने त्या चर्चेला अर्थ राहत नाही. उदा. --
- सदस्य १ - मूळा नदी हेच शुद्धलेखन बरोबर आहे.
- सदस्य २ - साफ चूक. मुळा नदी हेच बरोबर
- सदस्य १ - ठीक, यापुढे मुळा नदी असेच लिहीन.
- सांगकाम्याच्या बदलानंतर --
- सदस्य १ - मुळा नदी हेच शुद्धलेखन बरोबर आहे.
- सदस्य २ - साफ चूक. मुळा नदी हेच बरोबर
- सदस्य १ - ठीक, यापुढे मुळा नदी असेच लिहीन.
- !!!
- शिवाय, चर्चा पाने ही सदस्यांची व्यक्तिगत पाने असून त्यावरील शुद्धलेखनाबद्दल ते स्वतः जबाबदार आहेत. त्यात विकिपीडियावरील इतर सदस्यांनी (सांगकाम्यांसह) बदल करणे अपेक्षित नाही.
- अभय नातू १८:३०, ४ डिसेंबर २०११ (UTC)
खर्या / खऱ्या
संपादनऱ्या या शब्दास एकाच नियम लावून चालणार नाही. जसे: आर्या, फेऱ्या ई. मला व्याकरणातील जास्त ज्ञान नाही परंतु, आपल्या सांगकाम्याने केलेले काही बदल चुकीचे वाटले. आपण संकल्प किव्वा जे यांना या बाबत consult करू शकता.