कॉमन्सवरील मूकनायक आणि सही छायाचित्रे

संपादन

साळवे सर आणि @संदेश हिवाळे:, आपणा दोघांचे विकिमिडीया कॉमन्सवरील commons:File:Dr.ambedkar_signature.jpg commons:File:मूकनायक.jpg या चित्रसंचिका पुर्नस्थापित करण्याचे काम झाले आहे हे कदाचित आपण पाहीले असेल पण त्यावर वापरला गेलेला परवाने (लायसन्स) आणि commons:User_talk:Jcb#India_Public_domain येथील चर्चा आवर्जून अभ्यासून ठेवावी म्हणजे डॉ. आंबेडकरांचे साहित्य विकिमिडीया कॉमन्सवर भविष्यात चढवायचे झाल्यास आपणास माहिती राहील.

विकिप्रकल्पातून योगदान करताना कॉपीराईट हा महत्वाचा विषय आहे. कॉपीराईट या विषयावर अधिक चर्चा करुच पण इतर मराठी विकिपीडियन्स प्रमाणे आपण दोघांनीही कॉपीराईटचे विषय बारकाईने अभ्यासावा अशी विनंती आहे. आपल्या सहकार्याबद्दल आभार आणि पुढील योगदानासाठी शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५४, १ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

मतदान यंत्र

संपादन

कृपया en:Voting machine हा लेख बघावा ही विनंती. आपण मतदान यंत्र या लेखात केलेल्या बदलांमुळे/संपादनामुळे माझा टंकलेला बराच मजकूर उडाला. असो . काहीच हरकत नाही.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:११, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


@V.narsikar: क्षमस्व.. मी आगामी होणार्या निवडणुकीत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्त आहे. आम्हाला मिळालेल्या राज्य निवडनुक आयोगाच्या पुस्तकातील राजपत्रातील संदर्भानुसार मी लेखन करत होतो. त्यात त्याचा व्याख्या सदरात त्याचा उल्लेख "इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र" असा आहे.प्रसाद साळवे २१:२०, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

हे आपण मुद्दाम नाही केले व ते एकसमयावच्छेदेकरुन घडले अशी माझी समजूत आहेच.
दुसरी अशी विनंती कि, आपण तयार केलेल्या लेखांना विकिडाटा दुवा द्यावा.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:२५, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

याव्यतिरिक्त, साचा:voting मध्ये असलेल्या लाल दुव्यांचे लेख बनविण्यासही माझी काहीच हरकत नाही.--वि. नरसीकर (चर्चा) २१:२८, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


मराठी भाषा गौरव दिन

संपादन

वि. नरसीकर (चर्चा) १७:४५, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

इतरांनी काढलेल्या छायाचित्राची लेखी अनुमती बाबत

संपादन

नमस्कार,

आपण मागे चर्चा पानावरील चर्चेत आपण चढवलेल्या काही छायाचित्रांबाबत लेखी अनुमती घेतल्या असल्याचे म्हटले होते.

छायाचित्र आपण स्वत: क्लिक केलेले नसेल तर छायाचित्राखाली आपण लावलेला लायसन्स त्रुटीयूक्त ठरतो.

छायाचित्र नेमके कुणि क्लिक केले आहे त्यांचा कॉपीराईट असतो. (कॅमेरा कुणाचाह् असुद्यात) तर त्यांचा कॉपीराईट असेल.

आणि छायाचित्र आपण स्वत:काढलेले नसेल लेखी अनुमती नसेल तर केवळ तोंडी अनुमती पुरेशा नाहीत हे सर्वात महत्वाचे. अशी लेखी अनुमती Commons:Commons:OTRS येथे नमुद अथवा साचा:Form I/प्रतिज्ञापत्र (मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)अनुमती येथे नमुद विहीत नमुन्यात permissions-commons@wikimedia.org आणि copyright@nic.in या इमेल पत्त्यांवर कळवणे अभिप्रेत असावे.

उपरनिर्देशित प्रक्रीयापार न पाडलेली छायाचित्र संचिका काळाच्या ओघात वगळल्या जातात याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१७, ४ मार्च २०१७ (IST)Reply

@Mahitgar: सर हे खरोखर गुंतागुंतीचे व क्लिस्ट काम आहे पण मी प्रयत्नपूर्वक शिकेल. प्रसाद साळवे २१:४६, ४ मार्च २०१७ (IST)Reply

हम्म, पहिल्या वेळी तसे वाटेल, मी प्रयोगादाखल स्वत:च् काढलेल्या commons:File:ओल्या_हळदीची_भाजी.jpg छायाचित्राची अनुमती इमेलने पाठवली OTRS टिमने महिना पंधरा दिवसात इमेलची खात्रीकरुन छायाचित्रावर तशी सुचना लावली.

साचा:Form I/प्रतिज्ञापत्र (मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)अनुमती इथे एक नमुना मराठीत अनुवादीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपल्या पुढील लेखनासाथी शुभेच्छा माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३४, ४ मार्च २०१७ (IST)Reply

सर, आपणाकडे उपलब्ध असलेल्या अथवा उपलब्ध करणे शक्य असलेल्या लेखी अनुमती permissions-commons@wikimedia.org आणि copyright@nic.in या इमेल पत्त्यांवर कळवण्या बाबत चर्चा झाली होती त्याचे आदरपुर्वक स्मरण देऊ इच्छितो. सुरवात म्हणून हवे तर स्वत: काढलेल्याच छायाचित्राची एक अनुमती इमेल उपरोक्त इमेल पत्त्यावर पाठवून पहावे.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२८, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply
आपण स्मरण दिल्याबद्दल धन्यवाद सर... छायाचित्रांचा विषय माझ्या दृष्टीने क्लिष्ट आहे. बहुधा मला एखाद्या विकी शिबीराचा आधार घ्यावा लागेल. प्रसाद साळवे १२:३७, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply
हम्म् :) कार्यशाळेसाठी सुबोध कुलकर्णी आणि सुशान्त देवळेकरांना विनंती करता येईल नाही असे नाही. पण प्रत्यक्षात एवढे अवघड असणार नाही.
आपण Commons:Commons:OTRS हे पान कॉमन्सवरच Commons:Commons:OTRS/mr या शीर्षकाखाली मराठीत अनुवादीत करण्याचा प्रयत्न करावा असे वाटते. अनुवादाचे कामही होईल आणि क्लिष्टतेची भावना कमी होण्यास मदत होईल असे वाटते. आपण इतर मराठी विकिपीडिया सदस्यांनाही अनुवादात सहभागी होण्याचे आवाहन करु शकता.
@सुबोध कुलकर्णी: @सुशान्त देवळेकर: उपरोक्त कार्यशाळा विनंती बद्दल विचार करावा हि विनंती
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५८, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

गावांबद्दलची माहिती काढणे

संपादन

नमस्कार,

आपण गावांच्या लेखांतील माहिती काढत असलेले पाहिले. Repeatitive किंवा माहितीत भर न घालणारा मजकूर काढल्याबद्दल धन्यवाद. हे काढताना आपण मजकूर नजरेखालून घालीत असला हे खात्री आहेच.

दोन सजेशन्स -

१. ज्या माहितीत थोडी जरी विविधता असेल अशी माहिती ठेवावी.

२. अनेक सदस्य अशी माहिती भरत आहेत. हे करण्यामागे त्यांचे प्रयत्न मराठी विकिपीडियावर अधिकाधिक माहिती यावी हाच असणार. त्यांच्याशी संवाद साधून नेमकी माहिती कशी भरावी याचे मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का? मला वाटते @सुबोध कुलकर्णी: यांच्याशी पहिला संवाद साधल्यास हे करणे सुरळित होईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०७:४६, २१ मार्च २०१७ (IST)Reply


धन्यवाद @अभय नातू: सर, नक्कीच...मी माहिती काळजीपूर्वक वाचून, गावात ज्या गोष्टी आहेत, त्या काढत नाही तर ज्या गोष्टी नाहीत त्या सह जोडून आलेली अनावश्यक वाक्यरचना काढत आहे. माहिती वाक्यरचना देखील दुरुस्त करत आहे. गावाच्या माहिती बाबत मी सुबोध सरांचे मार्गदर्शन ही घेईलच. मला वाटते चौगाव या प्रमाणे लेख असावेत म्हणून लेखात भर देखील घालणार आहे. प्रसाद साळवे ०८:१८, २१ मार्च २०१७ (IST)

नमस्कार प्रसाद, आपण गावांचे लेख सुधारण्यास सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. हे लेख गावांतील लोकांसोबत तयार केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा व वास्तव लक्षात घेवून त्यात हळूहळू भर पडणे अपेक्षित आहे. अनेक सुविधा गावांमध्ये नसतात. हे नसणेही नोंदविणे महत्वाचे आहे, हे चर्चेतून समजले. त्याचवेळी त्या सोयी कोठे आहेत? ही माहिती देणे आवश्यक आहे. वाक्यरचना किंवा बांधणी वेगळी करू शकू. चौगाव हा लेख आदर्श म्हणून समोर ठेवणे उचित नाही असे वाटते. तुम्ही मोपा, तेरेखोल, नृसिंहवाडी, परिते, रुकडी हे लेख पाहावेत. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण काही बदल (उदा.शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा इ.)उलटवावेत ही विनंती.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४२, २१ मार्च २०१७ (IST)Reply

ठिक आहे सुबोध सर... आपण दिलेल्या उदाहरणात मोपा तेरेखोल नृसिंहवाडी परिते रुकडी यांचा समन्वय व आपल्या मार्गदर्शननुसार मी लेख संपादन करण्याचा प्रयत्न करेल.. प्रसाद साळवे १०:३६, २१ मार्च २०१७ (IST)

सदस्य नाव बदल

संपादन

@Mahitgar: सर, माझे सदस्य नाव Salveramprasad असून ते माझ्या टोपण नावाच्या साधर्म्याने ' प्रसाद साळवे असे बदलता येईल काय..? जे बदलले तरी माझ्या संपादन अभिलेखात बदल होऊ नये. तरी सदस्य नाम बदलून द्यावे ही विनंती प्रसाद साळवे १५:२०, २४ मार्च २०१७ (IST)Reply

आजकाल सर्व विकिप्रकल्पात एकसारखे सदस्यनाव वापरले जाते, त्यामुळे आताशा सदस्य नावात बदल विनंत्या meta:Steward_requests/Username_changes येथे कराव्या लागतात.
शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३८, २४ मार्च २०१७ (IST)Reply
@Mahitgar: सर, खूप खूप धन्यवाद सर.. सदस्य नाव बदलून मिळाले
) प्रसाद साळवे १९:०३, २४ मार्च २०१७ (IST)

गुढीपाडवा

संपादन

प्रसाद, नमस्कार! आपण आपल्या सदस्यपानावर टाकलेला गुढीपाडव्याचा साचा काढला असे मला दिसले. अर्थातच, ही आपली वैयक्तिक बाब आहे पण, मला वाटले ते येथे नमूद करणे आवश्यक वाटते. म्हणून हा लेखनप्रपंच. येथे दुसऱ्यांच्या मतांचा व भावनेचा योग्य तो आदर करण्याची प्रथा आहे.एककल्ली मतांने बऱ्याच वेळा कटूता वाढते.सर्वांशी सामंजस्याने वागणेच अभिप्रेत आहे. तो साचा राहू दिला असता तर योग्य झाले असते असे माझे मत आहे. त्या शुभेच्छा होत्या. कोणत्याही कारणाने का असेना ! असो. आशा आहे कि आपण हे लिखाण समर्पक अर्थाने घ्याल व त्याचा इतर कोणताही गैर-अर्थ काढणार नाही. धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) ११:२३, २९ मार्च २०१७ (IST)Reply

@V.narsikar: सर आपण घेता त्या प्रकारे मी हा विषय घेतलेला नाही. कटुता अथवा धार्मिक विद्वेषातून तर मुळीच नाही. दिवसभर ठेऊन मी दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री बारा नंतर गुढीउतरवली एवढेच.  :)  ;) तसेच त्या साच्यातील बटबटीतपणा व अशुद्धलेखन हे वारंवार चर्चा पानावर लक्ष खेचून घेणारे होते. तसे शुभ अशुभ काहीही नसते असे मला वैयक्तिक वाटते तरीही धन्यवाद. व डोन्ट टेक इट सच दयाट वे..टेकिंग इट इझी प्लीज टेक इट इझी... प्रसाद साळवे (चर्चा) १८:५८, २९ मार्च २०१७ (IST)Reply
ज्याने तो साचा लावला तो खूप नजिकचा व आपण दूरचे असा भेदभाव मी करीत नाही. आपण म्हणता तशी जर बाब असेल तर कोणाचाही 'संभाव्य' गैरसमज टाळण्याचे दृष्टीने, आपण एखादी कृती कोणत्या कारणास्तव केली हे 'बदलांचा आढावा' मध्ये नमूद केले तर असे प्रसंग येत नाही. माझा सहसा एकदम गैरसमज होत नाही. मनात विचार आला म्हणून येथे टाकले या व्यतिरिक्त दुसरा हेतू नव्हता. असो. तसे, अनाहूत सल्ला देण्याची मला वाईट खोड आहे.:-)--वि. नरसीकर (चर्चा) १९:१६, २९ मार्च २०१७ (IST)Reply

हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया

संपादन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:३७, १ मे २०१७ (IST)Reply

बोर्नस्टार

संपादन
  संपादकीय बार्नस्टार
साळवे सर आपण ३००० संपादने पूर्ण केल्याबद्दल माझ्याकडून अभिनंदनपर हा बोर्नस्टार. मला विकिपीडियामध्ये वेळोवेळी तुमची मदत मिळाली त्याबद्दलही धन्यवाद. संपादने अशीच पुढे चालू ठेवा, यासाठी शुभेच्छा...!! --संदेश हिवाळेचर्चा १४:२८, ३ मे २०१७ (IST)Reply

--संदेश हिवाळेचर्चा १४:२८, ३ मे २०१७ (IST)Reply

धन्यवाद ....संदेश...._____/\_______

मार्च २०१७ बाबत शुभेच्छा

संपादन
 
नमस्कार प्रसाद साळवे,

विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे दहावे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा

आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.

 


आपल्या योगदानाबद्दल धान्यवाद.


आपला शुभचिंतक,

टायवीन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५२, ३ मे २०१७ (IST)Reply

निकोलाई नोस्कॉव, वेलरी लिओटिइव

संपादन

नमस्कार प्रसाद_साळवे! आपण मराठी भाषेत गायक निकोलाई नोस्कॉव (Nikolai Noskov) किंवा वेलरी लिओटिइव (Valery Leontiev) बद्दल लेख करू शकता? आपण या लेख केल्यास, नंतर मी कृतज्ञ असेल! धन्यवाद! --95.55.102.125 २१:२३, ९ मे २०१७ (IST)Reply

@95.55.102.125: मूळ नावाने log in करून परीचय द्यावा. वर पाठवलेला मेसेज अनेक ठिकाणी डकवल्याचे मी पाहिले आहे. प्रसाद साळवे ०६:३६, १० मे २०१७ (IST)Reply

हिंदी चित्रपट वर्गीकरण

संपादन

नमस्कार,

तुम्ही हिंदी चित्रपटांच्या अनेक लेखांमध्ये नवीन वर्ग घातलेले पाहिले. याबद्दल दोन सूचना कराव्याशा वाटतात -

१. जर अशा लेखांत कोणताही वर्ग नसेल तर तो नक्की घालावा.

२. हिंदी भाषेमधील चित्रपट हा वर्ग हिंदी चित्रपट नामसूची याचा उपवर्ग आहे तरी दोन्ही असू नयेत. जर दोहोंपैकी एकच ठेवायचा असेल तर कोणता ठेवावा आणि का, यावर तुमचे मत द्यावे.

३. एकगठ्ठा वर्गवारी करण्यासाठी एखादा सांगकाम्या (Bot) लावून हे काम करून घेता येईल. त्यासाठी तुमचा अमूल्य वेळ घालविण्याचे कारण नाही. तुमचा वेळ इतर अनेक (आणि अधिक उपयोगी) लेखनात वापरता येईल असे माझे मत आहे!

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:२५, १५ मे २०१७ (IST)Reply

मराठी नामसूची मध्ये अशा प्रकारचे वर्ग व चित्रपट यादी आढळते त्यावरून हे केले आहे. तसेच हिंदी चित्रपट नामसूची ही हिंदी चित्रपट, हिंदी भाषेतील चित्रपट व हिंदी चित्रपट नामसूची या तीन वर्गात विभागलेली आढळते. प्रसाद साळवे २२:२४, १५ मे २०१७ (IST)Reply

मला वाटते या वर्गीकरणाच्य संकेतांकडे पुन्हा एकदा नजर टाकून आणि असे संकेत नसल्यास ते ठरवून वर्गीकरण केलेले बरे.

अभय नातू (चर्चा) २२:२८, १५ मे २०१७ (IST)Reply

ओक प्रसाद साळवे २२:३३, १५ मे २०१७ (IST

मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप

संपादन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५५, ५ जून २०१७ (IST)Reply

नामदेव ढसाळ

संपादन

नमस्कार,

आपण नामदेव ढसाळ या लेखावर काम करीत असल्याचे पाहिले. त्यात मी काही बदल केले आहेत. यात लेखातील शैली बदलण्याचा उद्देश आहे. लेखांतील सत्ये (facts) बदलली नाहीत हे एकदा पडताळून पहावे ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:४६, ६ जून २०१७ (IST)Reply

ओके...सहमत शैली सुधारून लवकच भर घालतो. धन्यवाद सर प्रसाद साळवे २३:०६, ६ जून २०१७ (IST)

वामन तबाजी कर्डक

संपादन

या व तत्सम लेखात आपण जो साचा माहितीचौकट व्यक्ती टाकत आहात त्यात जन्म व मृत्यू एक तर दोन्ही साचे वापरुन टाकावे अथवा दोहोतही वापरू नये कारण फक्त म्रुत्यू दिनांकात साचा वापरल्यास व जन्म दिनांकात फक्त सालाचे दुवे टाकल्यास त्याने म्रुत्यूचा वर्ग (इ.स. ....मधील मृत्यू) हा जन्म वर्गाच्या आधी दिसतो ते योग्य वाटत नाही. मी आतापर्यंत असे ३-४ तरी बदल केलेत. कृपया पुढे याबद्दल लक्षात ठेवावे ही विनंती.उदाहरणास्तव धर्मानंद दामोदर कोसंबी हा लेख बघावा.--वि. नरसीकर (चर्चा) १९:५९, १४ जून २०१७ (IST)Reply

@V.narsikar: सर..हे असे होते हे मला माहित नव्हते.. या पुढे दोन्ही साचे लावण्याची काळजी घेईल. धन्यवाद प्रसाद साळवे २३:४५, १४ जून २०१७ (IST)Reply

माहिती चौकट संरक्षित क्षेत्र नेपाळ‎ साचा

संपादन

नमस्कार,

माहिती चौकट संरक्षित क्षेत्र नेपाळ‎ हा साचा तयार केल्याबद्दल धन्यवाद. माहितीचौकट साचे हे एखाद्या लेखात त्या विषयवस्तुबद्दलची डिटेल्ड माहिती घालण्यासाठी वापरले जातात. यादीवजा साच्यांच्या नावात माहितीचौकट असू नये.

तरी या साच्याचे नाव बदलून नेपाळमधील संरक्षित क्षेत्रे करावे असे मला वाटते.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १९:४१, १९ जुलै २०१७ (IST)Reply

विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे

संपादन

प्रिय सदस्य, असफ बार्तोव्ह (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी हे पान पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:०५, ८ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

अंक परिवर्तन

संपादन

सर, हिंदी विकिपीडिया वरील अंक परिवर्तकसाधन gadget मराठीत स्क्रिप्टच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

या स्क्रिप्टचा वापर करण्यासाठी: खालील स्क्रिप्ट कॉपी करा, नंतर [येथे क्लिक करा], ओळी पेस्ट करा आणि सेव्ह पृष्ठ दाबा.

  • {{subst:Iusc|User:Tiven2240/number.js}}

आशा आहे की आपण याचे वापर करतील --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४४, १८ मार्च २०१८ (IST)Reply

@Tiven2240:, जमले....मन:पूर्वक धन्यवाद.. मला AutoEd बद्दल ही शिकवा. चालू करणे ते वापर.. प्रसाद साळवे (चर्चा) ११:१७, १८ मार्च २०१८ (IST)Reply

Common.js मध्ये mw.loader.load('//meta.wikimedia.org/w/index.php?title=User:संतोष दहिवळ/थेट विकिडाटा.js&action=raw&ctype=text/javascript'); importScript( 'User:Tiven2240/number.js' ); // Backlink: [[User:Tiven2240/number.js]] importScript('Wikipedia:AutoEd/complete.js');

फक्त इतके टका. तिन्ही गॅजेट चालू होतील --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:२४, १८ मार्च २०१८ (IST)Reply

@Tiven2240:,वरील कॉपी पेस्ट केले. कदाचित बरोबर कि चूक माहित नाही. पण AutoEd रन कसे करावे..? किंवा active झाले हे कसे ओळखावे? पहा सदस्य:प्रसाद साळवे/common.js प्रसाद साळवे (चर्चा) ११:३५, १८ मार्च २०१८ (IST)Reply

प्रसाद फक्त मी दिलेले स्क्रिप्ट टाकावे. आपण दुसरे आपल्या मनाने टाकू नये. यानी स्क्रिप्ट बरोबर चालत नाही. मी वर दिलेले कॉड फक्त टाका --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:१३, १८ मार्च २०१८ (IST)Reply

@Tiven2240: कॉड फक्त पेस्ट केले. परंतु ते AUTOED वापरण्याचा पाथ सांगा. प्रसाद साळवे (चर्चा) १५:४७, १८ मार्च २०१८ (IST)Reply

Autoed चालवण्यास आपण टूलबार मध्ये जाऊन ते चालू शकतात. टूलबार मध्ये वाचा, स्रोत संपादन करा, move व इतर option मध्ये autoed असे येते. त्याला दाबा यांनी आपोआप संपादन होते. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३२, १८ मार्च २०१८ (IST)Reply

स्त्रोत संपादन पर्यंत दिसत आहे परंतु इतर option मध्ये autoed दिसत नाही. शक्य झाल्यास विकी मराठी whatsapp group वर screenshot पाठवा. प्रसाद साळवे (चर्चा) १६:४३, १८ मार्च २०१८ (IST)Reply

सद्या मराठी विकिपीडिया व्हाट्सअप्प ग्रुप बंद केले आहे. आपण प्रस्तुत दुव्यात जाऊन पाहू शकतो. https://twitter.com/tiven2240/status/975338572201865216

पाहिल्यावर सूचित करा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२२, १८ मार्च २०१८ (IST)Reply

@Tiven2240: बघितले... आपण दिलेल्या कोड मुले अंक परिवर्तन active झाले परंतु autoed झाले नाही. कारण तो option येत नाही. शक्य झाल्यास तुम्ही चेक करून पेस्ट करून द्या please. प्रसाद साळवे (चर्चा) १७:२८, १८ मार्च २०१८ (IST)Reply

प्रसाद आपण माझ्या common.js पहा. यात जसे एक लाईन सोडली आहे तशी सोडा. मी तुमच्या js मध्ये बदल करू शकत नाही. तुम्ही माझे पहा व उचित बदल करा. सदस्य:Tiven2240/common.js --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:३३, १८ मार्च २०१८ (IST)Reply

@Tiven2240: झाले... धन्यवाद.... प्रसाद साळवे (चर्चा) १७:४०, १८ मार्च २०१८ (IST)Reply

३ स्क्रिप्ट आहेत तिनित line सोडा यांनी भविष्यात उपयोगी पडेल. पुढील लेखनात शुभेच्छा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:४३, १८ मार्च २०१८ (IST)Reply

Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey

संपादन
WMF Surveys, २३:४९, २९ मार्च २०१८ (IST)Reply

Reminder: Share your feedback in this Wikimedia survey

संपादन
WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)Reply
Return to the user page of "प्रसाद साळवे/जुनी चर्चा ३".