स्वागत आशिष अशोक घिर्णीकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन आशिष अशोक घिर्णीकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५८३ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

नमस्कार

संपादन

आपल्या मराठी विकिपीडियावरील आरंभिक संपादना बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.मी आपली विपश्यना लेखातील संपादने आणि संकल्पांनी केलेले बदल आणि आपली नंतर त्यांच्या पानावरील प्रतिसाद वाचला.बहुधा आपल्याला कलप्ना असेलच, विकिपीडिया संस्कृतीत लेख सुधारणा करताना दोन गट आढळतील एक गट सुधारणा करण्याच्या आधी नवीन सदस्यांना आधी सुचना देतो आणि मग सुधरणा करतो , मी स्वतः अशाच गटातला असलो तरी मला दुसर्‍या विचारप्रवाह ठेवणारा गट जो असा मुद्दा मांडतो कि विकिपीडियावर अगदी क्षणागणिक अगणित वाचक येतात , येणार्‍या वाचकांना तो शक्यतो सुस्थीतत दिसावा यात अजिबात खडपडू नये म्हणून शक्यत्या दुरूस्त्या सत्वर कराव्यात या विचार प्रवाहाबद्दल मुद्दा बद्दलही आदर आहे.

हे काहीस खर आहे कि नविन संपादकांच्या संपादनाकडे सहाजिक पणे अधिक लक्ष दिल जात (आणि जुने झालेले संपादकांची संपादने नंतर नंतर बर्‍याचदा दुर्लक्षी जाऊ लागली जातात किंवा जुन्या झालेल्या सदस्यांना संकेतातील पळवाटा कळावयास लागतात :) )

बाकी शालेय मराठी भाषेत विज्ञान हा शब्द Science या एका अर्थानेच वापरला जातो आणि व्यक्तिगत पातळीवर माझे मत मराठी विकिपीडियातही याच अर्थाने वापरावा असे आहे.विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे या विषयावर अधिक चर्चा व्हावी असे मला वाटते. मी बुद्धीप्रामाण्यवादी असलोतरी संत आणि धार्मिक साहित्यावरून ओझरती नजर टाकत असतो आणि मराठी धार्मिक (संत) साहित्यात विज्ञान हा शब्द अगदीच वेगळ्या अर्थाने अथवा Science शास्त्रातील बुद्धीप्रामाण्यवाद, आणि बरच काही मोडकळीस काढून वापरला जातो असा माझा प्रामाणिक गैर समज आहे. विज्ञान हा शब्द संस्कृत साहित्यातही इतर वेगळ्या अर्थाने वापरला जाताना आढळतो. "मोक्ष मिळवण्यासाठीचा वैज्ञानिक मार्ग." हे वाक्य आपणास ठेऊन हवे असल्यास लेखाच्या चर्चा पानावर तसेच .विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता च्या चर्चा पानावर आपला मुद्दा सविस्तर पणे मांडावा.

"ब्राम्हण व श्रमण यातील श्रमण मार्गातील विद्या. अनित्यतेची बोधी प्राप्त व्हावी ह्या मानसिकतेसाठी उपक्रम. " हे वाक्य काढण्यात संकल्प कडून घाई झाली का माहित नाही पण हे वाक्य समजण्याकरिता कदाचित पुर्नलेखनाची अथवा ससंदर्भ स्पष्टीकरणाची आवश्यकता होती असे मलाही वाटले.

इंग्रजी विकिपीडियावर en:Vipassanā नावाचा लेख आहे हे दोन्ही लेख आंतरविकिदुव्याने जोडता येतील.

खंड न पडता लेखन करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:धूळपाटी चा वापर करा अथवा स्वतःच्या सदस्य पानावर जरी लेखन केलेत तरी तुम्ही ते लेखात चढवत नाही तो पर्यंत सहसा कुणी व्यत्यय अणणार नाही.

आपला सहविकि प्रवासी

माहितगार २०:२१, ४ डिसेंबर २०१० (UTC)