साचा सदस्य बावन्नकशी २०१० संपादन

नमस्कार, {{सदस्य बावन्नकशी २०१०}} असे लिहावे म्हणजे खालीलप्रमाणे दिसेल.  ही व्यक्ती मराठी विकिपीडियातील प्रकल्प बावन्नकशी २०१० ची सदस्य आहे.


आपला

माहितगार ०७:२८, २७ जुलै २०१० (UTC)

वर्गीकरण संपादन

आपल्या मराठी विकिपीडियावरील संपादनांना शुभेच्छा. आपण विज्ञान विषयक लेखात लेखन करत आहात.पुढील वर्गवारीतील सुयोग्य उपवर्ग वापरून वर्ग:विज्ञान आपण संपादित केलेल्या लेखांचे वर्गीकरण सुद्धा आपल्या सवडीनुसार करू शकता . माहितगार ०८:२४, २७ जुलै २०१० (UTC)

सदस्यचौकट साचे संपादन

कृपया 'वर्ग:सदस्यचौकट साचे' येथे बघा. आपणास लागु असणारे साचे आपल्या सदस्यपानावर लावावे ही नम्र विनंती.त्याने मला व इतरांनापण आपली थोडीफार ओळख कळेल.आपण भौतिकशास्त्राविषयी जो लेखनाचा धडाका सुरु केला आहे त्यास मनोमन शुभेच्छा.मी येथे विकिवर वैयक्तिकरित्याही आपले स्वागत करतो.

वि. नरसीकर (चर्चा) १०:४५, २७ जुलै २०१० (UTC)

भौतिकशास्त्रावरील लेख संपादन

नमस्कार,

तुम्ही लिहित असलेली मूलभूत भौतिकसास्त्रावरची माहिती पाहून आनंद झाला. मराठी विकिपीडियावर तज्ज्ञ मंडळींचे (तसेच इतरांचेही) नेहमीच स्वागत आहे.

अभय नातू १५:१०, २७ जुलै २०१० (UTC)

रंगभार संपादन

  • दुसरे असे की, कोणा सदस्यासमवेत वा विकिपीडिया :प्रचालक यांच्या समवेत चर्चा करावयाची असल्यास,त्या सदस्याच्या चर्चा पानावर संदेश टाकला तर त्या सदस्यास 'आपणासाठी (नविन संदेश)(ताजा बदल)' अशी सुचना मिळते.तो, मग तो संदेश वाचु शकतो.
  • त्या व्यक्तिच्या चर्चा पानावर आपली सही ~~~~ (किबोर्डवर १ च्या डावीकडे असलेली बटन ४ वेळा वापरुन) अश्या प्रकारे केल्यास आपले सदस्यनाव, दिनांक व वेळ आपोआप उमटते.
  • येथील माहितगार हे प्रचालक कोणासही मदत करण्यास सदैव तत्पर राहतात. ते वा कोणीही जुने सदस्य, आपण संदेश दिल्यास, मार्गदर्शन करतील/शंकेचे समाधान करतील.

चला तर! पुन्हा शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा) १६:०६, २७ जुलै २०१० (UTC)

वर्गीकरण संपादन

मराठी विकिपीडियातील सध्याचे बहुतेक वर्गीकरण किमान स्वरूपाचे आहे.आपण म्हणता त्या प्रमाणे आपण वर्गीकरणामध्ये सुधारीत वर्गीकरण व्यवस्था सुचवू/अमलात आणू शकलात तर स्वागतच आहे.वर्गीकरणे,उपवर्गीकरणे आपण स्वतः बदलू शकता,अर्थात विकिपीडिया एक टिमवर्क असल्यामूळे इतरांनाही आपल्या कामात सहभागीकरून घेऊ शकता.
जसे लेखनावांचे एका नावावरून नवीन अधीक सुयोग्य नावावर सरळ स्थानांतरण होऊ शकते तसे वर्ग पानांचे स्थानांतरण नवीन नावावर होऊ शकत नाही.त्यामुळे नको असलेली काही वर्गीकरण पाने निर्माण झाली तरच केवळ नको असलेली पाने वगळण्याकरिता अशा पानांवर {{पानकाढा}} हा साचा लावल्यास ते पान आपोआप वगळण्याच्या यादीत येईल.
अजून एक विनंती अशीकी आपली नियोजित वर्गीकरण योजना आपल्या सवडी नुसार वर्ग:भौतिकशास्त्र पानावर लिहून ठेवल्यास, इतरही सदस्यांना वापरणे सोईचे जाईल.वर्गीकरणांचे सुसूत्रीकरण कुठे अधीक कटकटीचे वाटले तर विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण येथे तशी नोंद करून ठेवावी.
शास्त्रीयवर्गीकरण संबधाने चर्चा संपर्क करून दुसरे मत घ्यावायचे तर अभय नातू आणि नरसिकरजी हि तांत्रिक क्षेत्रातीलच मडळी आहेत सोबतच सदस्य:Sankalpdravid हे सुद्धा वर्गीकरणांवर बरेच काम करत असतात, त्यांचाही आपण परिचय करून घेऊ शकता.

माहितगार ०६:०८, २८ जुलै २०१० (UTC)

मराठी पारिभाषिक शब्दांचा वापर संपादन

खालील गोष्टी आवश्यक नाहीत आपल्या सुविधेकरिता काही माहिती आहे.
सोबतच आपण मराठी पारिभाषिक शब्दांचा मुबलक वापर करत आहात त्याचे स्वागतच आहे.आपण सहसा एखाद्या विशीष्ट शब्दकोशास प्रमाण मानून लेखन करत असल्यास तसे वर्ग:भौतिकशास्त्र येथे नमुदकरून ठेवल्यास इअतर वाचकांना शब्दांचे सदंर्भ शोधणे सोपे पडेल.
  • एखादा शब्द मराठीत यापूर्वी प्रयूक्त झालेला नसल्यास आणि आपण तसे उपायोजन प्रथमच करत असल्यास, आपल्याला एकतर लेखात प्रथम नवीन मराठी पारिभाषिक शब्द कंसात इंग्रजी संज्ञा असे करता येईल.किंवा पर्यायाने विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/साचे येथे दिल्या प्रमाणे {{विशीष्ट अर्थ पहा}} [विशिष्ट अर्थ पहा]
असा साचा नवीन शब्दाच्या नंतर लावून लेखाच्या तळाशी {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} साचा लावल्यास लेखाच्या तळाशी पारिभाषिक शब्दांची यादी देण्याचा पर्याय आहे.
शुभेच्छा
माहितगार ०६:०८, २८ जुलै २०१० (UTC)

माझ्या आवडीचे फायरफॉक्स ऍडऑन संपादन

मी स्वतःसुद्धा फायरफॉक्स वापरतो विकएडीट 1.4.0 हे ऍडऑन मला विकिपीडियावर काम करताना बरेच ऊपयूक्त ठरले आहे. माहितगार ०६:०८, २८ जुलै २०१० (UTC)

धुळपाटी संपादन

सदस्य:अनिकेत जोगळेकर/धुळपाटी हे पान कृपया बघा. यावर आपण साचा व ईतर लेखनाचे प्रयोग करुन पाहु शकता.आपले सदस्यपानाव रील मजकुर काढुन टाकावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:३१, २९ जुलै २०१० (UTC)

साचा:Infobox Particle संपादन

नमस्कार!

साचा:Infobox Particle हा साचा 'साचा:माहितीचौकट मूलकण' या नावाने हलवावा. जमल्यास तो साचा इंग्लिश भाषेतून मराठीत भाषांतरित करून ठेवावा.

बाकी, विज्ञानविषयक लेखांच्या वर्गीकरणाबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे, त्यावर मी तूर्तास टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मात्र शुद्धलेखन व व्याकरण या दृष्टीने केलेल्या काही दुरुस्त्या (ध्वनीशास्त्र या चुकीच्या लेखनाऐवजी 'ध्वनिशास्त्र' असे लेखन; 'यांत्रिकी' या शब्दाऐवजी 'यामिकी' वगैरे) लक्षात घेऊन त्याबरहुकूम संपादने चालू ठेवावीत, अशी विनंती.

अजून एक गोष्ट करता आली तर बघा: mechanics' या शाखेला उद्देशून सध्या 'यामिक' हा शब्द वापरला आहे. त्याची खरी अर्थच्छटा 'mechanic/mechanical' अशी विशेषण स्वरूपातील आहे. mechanics या नामासाठी 'यामिकी' हे नाव अधिक योग्य ठरेल, असे काही संदर्भ पाहता वाटते. तुम्ही खातरजमअ करून लेखांमध्ये, वर्गांमध्ये योग्य ते बदल करू शकलात, तर उत्तम!

मराट्ःई विकिपीडियावर तुमच्याकडून अधिकाधिक दर्जेदार संपादने दिसावीत, या इच्छेसह,
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:२१, २९ जुलै २०१० (UTC)

माहितीचौकट संपादन

साचा:Infobox Particle या साच्यास साचा:माहितीचौकट कण/साचा:माहितीचौकट परमाणू हे नाव योग्य राहील काय? कृपया कळवावे.अन्यथा आपल्यास योग्य वाटते ते नाव सुचवावे.

वि. नरसीकर (चर्चा) ११:३४, २९ जुलै २०१० (UTC)

पॅरिटी=साम्य/समानता? वि. नरसीकर (चर्चा) ११:५०, २९ जुलै २०१० (UTC)

चित्र संपादन

image=प्रतिमा हे आपले बरोबर आहे पण येथे चित्र हा शब्द प्रचलित आहे. वि. नरसीकर (चर्चा) १२:०२, २९ जुलै २०१० (UTC)

मी वारंवार संदेश देउन आपली एकाग्रता भंग तर करीत नाहीना?आपल्या कामात त्याने व्यत्यय येत असेल. वि. नरसीकर (चर्चा) १२:०५, २९ जुलै २०१० (UTC)

शब्दकोश संपादन

विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी येथे बघा.बरेच काम याने सुकर होते असा माझा व अनेकांचा अनुभव आहे.वि. नरसीकर (चर्चा) १५:३१, २९ जुलै २०१० (UTC)

पारिभाषिक संज्ञा संपादन

आपण म्हणता तसा वर्ग आढळला नाही.आपण बघितले ते कदाचित साचा:विशिष्ट अर्थ पहा हा साचा असेल.या संदर्भात इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा हा लेखही वाचावा.आपला लेख कशा प्रकारे लिहावा याची त्यावरुन कल्पना येईल. आपल्या प्रस्तावित लेखाचे नाव भौतिकशास्त्रातील इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा असे असावे हे वाटते. तथापि, आपण या विषयात माहितगार यांचेशी अधिक चर्चा केल्यास ते उत्तम होईल असे माझे मत आहे.ते अशा प्रकारच्या लेखात निष्णात आहेत व त्यांचे विचार याबाबत अधिक स्पष्ट आहेत. यावर त्यांचे बरेच चिंतनही झाले आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १३:५०, ३० जुलै २०१० (UTC)

विज्ञानातील लेखांच्या लिखाण/ भाषांतरासाठी काही उपयुक्त शब्द संपादन

भौतिकशास्त्रातील लेखांच्या लिखाण/ भाषांतरासाठी काही सतत येणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द असलेली एक यादीच जतन करावी असे वाटते. कुठे करु?

’वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा’ हे कोठेतरी पाहिले पण ही नुसतीच झलक आहे. हे कसे? अनिकेत जोगळेकर ११:४४, ३० जुलै २०१० (UTC)

नरसिकरजींना विचारलेल्या आपल्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर आधी देतो माझी उत्तरे पुढेचालून सहाय्य पानात टाकत असतो त्यामुळे काहीशी प्रदिर्घ असतात,शिवाय माझे लेखना र्‍हस्व दिर्घादी लेखन अत्यंत आदर्श असल्याचे आपण आत्तपर्यंत अन्भवले असेलच त्यामुळे मी काही महत्वाचे लेख सोडल्यास हात न लावता सहाय्य पानांवर लक्ष केंद्रीत करतो.प्रदिर्घतेचा दोष आणि लेखन दोष क्षमाकरून दुर्लक्षीता आलेतर पहावे हि नम्र विनंती माहितगार १३:५२, ३० जुलै २०१० (UTC)
  • प्रत्येक वर्गाचे एक स्वतंत्र पान असते.(वर्गीकरण पाने हि वर्गीकरण करतातच सोबत संबधीत वर्गीकरण पानावर त्या वर्गीकरणा संबधात आपल्याला सुयोग्य लेखन करता येते. उदाहरणार्थ वर्ग:भौतिकशास्त्र हे पान उघडून तुम्हाला त्या वर्गीकरणातील मुख्य लेख कोणता ते नमुद करता येईल, त्य वर्गीकरणातील लेखना बद्दल इतर तत्सम माहिती लिहिता येईल.)
वर्ग:भौतिकशास्त्र हा दुवा आपल्याला निळ्या रंगात दिसतो आहे कारण या वर्गीकरण पानावर संपादन करून काहिना काही मजकुर जतन केलेला आहे. तिथेतर वर्गीकरणातील पानांशिवाय इअतर तर काही दिसत नाही मग हा कोणता मजकुर असेल ? तर तो वर्ग: विज्ञान हा होय आपण वर्ग:भौतिकशास्त्र हे पान संपादनाकरिता उघडले असता हे आढळून येईल
वर्गीकरणाने २५-३० पेक्षा अधीक पानांचे वर्गीकरण झालेले दिसत आहे तरीपण ह्या पानाचा दुवा लाल दिसत आहे.सोबतच तुम्हाला ही फक्त झलक आहे; बदल जतन केलेले नाहीत! अशी सुचना दिसत आहे. याचे कारण वर्ग:भौतिकशास्त्र वर्ग पानाचे वर्गीकरण वर्ग: विज्ञान ने करण्याचे निमित्ताने काही मजकुर जतन झाला आहे तसा कोणताही मजकुर पानावर जतन झाला नाही शिवाय या वर्ग पानाचे त्या पेक्षा उच्चतम श्रेनीतील वर्गीकरण बाकी आहे (वस्तुतः हि स्थिती आदर्श नव्हे पण मी आपल्याला हे उदाहरण लक्षात यावे म्हणून सुधारणा केलेली नाही.) पानावर सध्या काही नाही आणि खाली संपाद्नाकरिताची संपादन खिडकी उघडी दिसते आहे त्यामुळे त्या पानावर ही फक्त झलक आहे; बदल जतन केलेले नाहीत! असा संदेश दिसत आहे.
वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा या पानावर सध्या काही नाही ही फक्त झलक आहे; बदल जतन केलेले नाहीत! असा संदेश दिसत आहे. याचा वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा ने वर्गीकृत होणार्‍या वर्गीकरण क्षमतेवर काही परिणाम होतो काय ? काहिही परिनाम होत नाही वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा ने वर्गीकरणाचे काम सुयोग्य पद्धतीने होते आहे.
केवळ एवढेच कि मी वर्ग: विज्ञान येथे गेलो असता वर्ग:भौतिकशास्त्र आणि विज्ञान वर्गातील भैतिकशास्त्रादी उपवर्ग आणि इतर लेख पाने दृष्टोत्पातीस पडून लेखांपर्यंत पोहोचण्याचा अजूक एक चांगला मार्ग निर्माण होतो. तसे सध्या वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा चे बाबत होत नाही आहे.
वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा चेसुद्धा उच्चतम श्रेणीत वर्गीकरण करता येईल काय , अर्थातच करता येईल सर्व वर्ग श्रेनी उच्चतम वर्ग श्रेणी कडे जात सर्वातवर वर्ग:मूळ येथे पोहोचणे अपेक्षीत असते. विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा , विकिपीडिया:विकिसंज्ञा , वर्ग:मराठी शब्द सुचवा, वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा इत्यादी पानांकरिता अधिक व्यवस्थीत सुयोग्य वर्गीकरण व्यवस्थेची गरज आहे, आणि तुमच्या शंके मुळे ती अधिक अधोरेखीत झाली आहे आपला इतर लेखनाकडचअ फोकस पहाता, आपण सध्या या बाबी कडे दुर्लक्ष करू शकता अथवा रस घेऊन अखादी वर्गीकरण पद्धती सुचवू शकता/करू शकता. वर्ग:शब्द आणि वर्ग भाषांतर हि वर्गीकरणे त्या दृष्टीने कदाचित वापरता येतील माहितगार १३:५२, ३० जुलै २०१० (UTC)


  • आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर :

भौतिकशास्त्रातील लेखांच्या लिखाण/ भाषांतरासाठी काही सतत येणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द असलेली एक यादीच जतन करावी असे वाटते. कुठे करु?

वस्तुतः विक्शनरी हा विशेष बहुभाषी सहप्रकल्पच याकरिता अधिकृत प्राधान्याची जागा आहे. पण या सहप्रकल्पाची कल्पना नसणे तसेच संदर्भ शोधण्याकरिता विकिपीडियाच्या बाहेर जायला लागणे या दोन मर्यादांमुळे विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा पानावर बर्‍याच संज्ञांची नोंद होत आली आहे.विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञाची मर्यादा जागेची आहे. त्याकरिता आपली सतत येणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द असलेली यादीच संक्शीप्त असेल तर वर्ग:भौतिकशास्त्र या वर्ग पानावरच लावा, प्रदिर्घ असेल तर वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द हे उपपान बनवून त्यावर लिहा.
लेखवार तुम्हाला प्रत्येक लेखात आलेले शब्द नोंदवायचे असतील/विशीष्ट अर्थछटेकडे निर्देश करावयाचे असेल तर {{विशिष्ट अर्थ पहा}} हा साचा वापरता येईल समजा मी कमी प्रचलीत संज्ञा स्मृतीशेष वापरणार आहे तर वाक्यातील स्मृतीशेष शब्दांनंतर {{विशिष्ट अर्थ पहा}} साचा लावेन म्हणजे हे वाक्य "तर वाक्यातील स्मृतीशेष{{विशिष्ट अर्थ पहा}} शब्दांनंतर" असे लिहिन ते "तर वाक्यातील स्मृतीशेष[विशिष्ट अर्थ पहा] शब्दांनंतर" असे दिसेल.
साचा {{विअप}} वापरा तरी चालेल "तर वाक्यातील स्मृतीशेष[विशिष्ट अर्थ पहा]शब्दांनंतर" असे दाखवेल.
पण मग हा विशीष्ट अर्थ तुम्ही नमुद कुठे करणार तर लेखात तळाशी == लेखात प्रयूक्त संज्ञा == असा विभाग यावयास हवा म्हणजे [विशिष्ट अर्थ पहा] येथील निळ्या दुव्यावर टिचकी मारली तर मी (वाचक) आपोआप == लेखात प्रयूक्त संज्ञा == विभागात पोहोचेल. ह्या विभागात इंग्रजी-मराठी सारणी(टेबल) असेल तर संपादकास आणि वाचकास सोपे पडेल, हे तुमचे विभाग बनवण्याचे आणि सारणी लिहिण्याचे काम {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} हा आराखडा साचा एकदम सोपे करतो. हवे तर एकदा आपल्या दूळपाटीवर स्तःच प्रयोग करून पहावा.
{{विशिष्ट अर्थ पहा}} आणि {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} हे साचे लेखात वापरले गेल्यास अशा लेखांचे वर्गीकरण आपोआप वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा येथे होते. आणि म्हनूनच तुम्हाला तुमचे हे चर्चा पानाच्या तळाशी वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा आल्याचे आणि वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा येथे तुमचे चर्चा पान आल्याचे यतुम्ही पाहिले असेलच.
अर्थातच {{विशिष्ट अर्थ पहा}} आणि {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} वापरलेल्या पानां॰ई अधिक उदाहरणे वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा ने वर्गीकृत इतर पानात पहाता येतीलच.
तुम्हाला वरील उत्तर पुरेसे वाटले का अधीक काही शंका आहेत ते जरूर कळ्वावे कारण आपल्या शंकांचा आणि शंकानिरसनअचा उअपयोग पुढे येणार्‍या नविन सदस्यांनाही होणार आहे, आपल्याला वरील उत्तर योग्य वाटल्यास हे उत्तर वर्ग:विशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा पानावरही साठवण्याचा विचार करता येईल
माहितगार १४:२३, ३० जुलै २०१० (UTC)
{{विशिष्ट अर्थ पहा}} मध्ये छोटी त्रूटी होती ती दूर झाल्याचे दिसते तेव्हा वापरण्यास हरकत नसावी माहितगार १५:३२, ३० जुलै २०१० (UTC)

लेखात प्रयुक्त संज्ञा संपादन

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा संपादन

प्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा
स्मृतीशेष Cookies

इंग्रजी मराठी संज्ञा संपादन

इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

वर्ग:भौतिकशास्त्र/प्रतिशब्द संपादन

वर्ग आणि लेखांची शीर्षके संपादन

नमस्कार,

तुम्ही तयार केलेल्या काही वर्ग व लेखांच्या शीर्षकांबद्दल मी त्या त्या पानांच्या चर्चेत माझे मत नोंदवले आहे. हे तुम्ही केलेल्या कामावर टीका/आकस नसून शुद्धलेखन व वर्गीकरणाच्या नियमांचे माझे interpretation आहे. गैरसमज नसावा.

अभय नातू १५:४४, ३० जुलै २०१० (UTC)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.