व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल

व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल (स्पॅनिश: Virginia Ruano Pascual; २१ सप्टेंबर १९७३) ही एक निवृत्त स्पॅनिश टेनिसपटू आहे. इ.स. १९९२ ते २०१० दरम्यान व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या पास्कालने दुहेरी टेनिसमध्ये प्रचंड यश मिळवले. तिने एकूण १० ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये दुहेरीमधील अजिंक्यपदे जिंकली (पाओला सुआरेझ सोबत ८ तर आना इसाबेल मेदिना गारिगेससोबत २). तसेच तिने स्पेनच्या तोमास कार्बोनेलसोबत २००१ फ्रेंच ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद देखील मिळवले.

व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
देश स्पेन ध्वज स्पेन
वास्तव्य माद्रिद
जन्म २१ सप्टेंबर, १९७३ (1973-09-21) (वय: ५०)
मद्रिद
सुरुवात १९९२
निवृत्ती २०१०
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ३९५ - ३५३
अजिंक्यपदे
दुहेरी
प्रदर्शन ५९३ - २७२
अजिंक्यपदे ४३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (2004)
फ्रेंच ओपन विजयी (2001, 2002, 2004, 2005, 2008, 2009)
विंबल्डन उपविजयी (2002, 2003, 2006)
यू.एस. ओपन विजयी (2002, 2003, 2004)
शेवटचा बदल: जुलै २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
टेनिस
स्पेनस्पेन या देशासाठी खेळतांंना
रौप्य २००४ अथेन्स दुहेरी
रौप्य २००८ बीजिंग दुहेरी

बाह्य दुवे

संपादन