लेवा बोली

Liamgel (चर्चा | योगदान)द्वारा २२:३०, १९ डिसेंबर २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

लेवा गण बोली जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर, आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.

लेवा बोली
लेवा गणबोली
प्रदेश खानदेश
वऱ्हाड
भाषाकुळ
हिंद-युरोपीय
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-१ -

लेवा बोली ही खान्देशी भाषासमूहातील एक बोली आहे, जी खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात, बऱ्हाणपूर जिल्ह्यातील काही भागात व खान्देशला लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील काही सिमांत भागात बोलली जाते.

एका बाजूला अहिराणी भाषिक प्रदेश तर दुसऱ्या बाजूला मराठीची वऱ्हाडी बोली बोलली जाणारा प्रदेश असल्या कारणाने पूर्व खान्देशातील इतर बोल्यांप्रमाणे लेवा बोलीतील सुद्धा शब्द व व्याकरणाची अहिराणी व वऱ्हाडी या दोन्ही भाषांसोबत अल्पाधिक प्रमाणात साम्यता आढळून येते. त्यामुळे ती या दोन्ही भाषांची मिश्रित बोली असल्याप्रमाणे भासते. असे असले तरीही लेवा बोलीमध्ये स्वताःचेही अनेक शब्द व व्याकरणिक गुणधर्म आहेत जे या दोनही भाषांपेक्षा भिन्न आहेत.

साहित्य

संपादन

लेवा बोली मध्ये फार कमी साहित्य उपलब्ध असून, कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कविता लेवा बोलीतील सर्वात प्रसिद्ध साहित्य आहेत.

कोश साहित्य

संपादन

नि.रा. पाटील आणि ऊर्मिला पाटील यांनी 'लेवा गण बोली कोश' तयार केला आहे. त्यात या बोलीचा पूर्ण इतिहास व्याकरणासह दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा २००६ सालचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "पडसाद : लेवा गणबोलीची म्हईस, तावडीले उठबईस". 2021-11-23 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-11-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

१. लेवा समाजाचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)[permanent dead link]