विजय रूपाणी
विजय रूपाणी (२ ऑगस्ट, १९५६ - १२ जून, २०२५ ) हे भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील वरिष्ठ राजकारणी, विधानसभा सदस्य व गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते.
विजय रूपाणी | |
![]() | |
कार्यकाळ ७ ऑगस्ट २०१६ – १२ सप्टेंबर २०२१ | |
मागील | आनंदीबेन पटेल |
---|---|
पुढील | भूपेंद्रभाई पटेल |
मतदारसंघ | राजकोट पश्चिम |
गुजरात विधानसभा सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण २५ जुलै २०१४ | |
मतदारसंघ | राजकोट पश्चिम |
राज्यसभा सदस्य
| |
कार्यकाळ २००६ – २०१२ | |
जन्म | २ ऑगस्ट, १९५६ यांगून, बर्मा |
मृत्यू | १२ जून, २०२५ (वय ६८) मेघाणीनगर, अहमदाबाद, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | जैन |
२०१४ पासून मुख्यमंत्री राहिलेल्या आनंदीबेन पटेल ह्यांना राज्यातील काही महत्त्वाच्या घटना हाताळण्यात अपयश आले व ह्या कारणावरून पटेल ह्यांनी २०१६ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांच्या जागी विजय रूपाणी ह्यांची निवड केली व ७ ऑगस्ट २०१६ रोजी रूपाणींनी पदाची शपथ घेतली. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
बर्माच्या यांगून येथे जन्मलेले रूपाणी १९६० साली कुटुंबाबरोबर गुजरातमध्ये स्थानांतरित झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता राहिलेल्या रूपाणींनी १९७१ साली जनसंघात प्रवेश केला. ते स्थापनेपासून भाजपचे सदस्य आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांना ११ महिने तुरूंगवास भोगावा लागला होता. १९७८ ते १९८१ दरम्यान रूपाणी रा.स्व. संघाचे प्रचारक होते. १९८७ साली रूपाणी राजकोट महापालिकेवर निवडून आले. सुमारे १० वर्षे राजकोट महापालिकेत राहिल्यानंतर १९९७ मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात विभागाचे सरचिटणीस बनवण्यात आले. २००६ ते २०१२ दरम्यान रूपाणी राज्यसभा सदस्य होते. २०१४ मध्ये ते सर्वप्रथम गुजरात विधानसभेवर निवडून आले.
१२ जून २०२५ रोजी, एर इंडिया फ्लाइट १७१ हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविक कडे जात असताना उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले, ज्यात रूपाणी यांचा मृत्यू झाला.[१]
संदर्भ
संपादन- ^ "Vijay Rupani, ex Gujarat CM, killed in Ahmedabad plane crash". द हिंदू. 12 June 2025. 12 June 2025 रोजी पाहिले.