विकिपीडिया चर्चा:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी in topic विकिप्रकल्प संसाधने

@Tiven2240:, संदर्भ दुवा नीट का दिसत नाही आहे हे पहाल का? साचा दुरुस्ती हवी आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:२६, ३० जुलै २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: साचे अद्ययावत केल्यामुळे ते झाले होते आता त्याला नीट केले आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:३३, ३० जुलै २०१८ (IST)Reply

शुभेच्छा संपादन

या अभियानास हार्दिक शुभेच्छा.--वि. नरसीकर , (चर्चा) १४:४३, ३० जुलै २०१८ (IST)Reply

साईट नोटीस संपादन

@अभय नातू, Tiven2240, आणि V.narsikar:, या अभियानाकडे लक्ष वेधून जास्तीतजास्त जणांना नियोजन प्रक्रियेत आणि पुढे संपादनात सामील करून घेण्यासाठी साईट नोटीस आत्तापासून लावावी. यामध्ये खालील मजकूर दोन ओळींत असावा असे वाटते -
भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान दि.१० ते २० ऑगस्ट २०१८
नियोजन प्रक्रियेत येथे जरुर योगदान द्या आणि अभियानात सामील व्हा !

धन्यवाद. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:१३, ३० जुलै २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: कार्यक्रम चालू झाले की ते टाकता येईल. ८/९ ऑगस्टला प्रचालकांना साद घाला. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:०५, ३० जुलै २०१८ (IST)Reply
आपण हेतू समजून घ्यावा. केवळ संपादनासाठी आवाहन करावयाचे नाही तर याआधी आराखडा तयार करण्यात,नियोजनात सर्वांचे योगदान आवश्यक आहे. ते १० ऑगस्ट पूर्वी जितके चांगले होईल तितका हा वर्ग दर्जेदार होईल. म्हणून १-२ ऑगस्ट पासून ही नोटीस झळकायला हवी यासाठी पुन्हा एकदा सर्व प्रचालकांना विनंती करीत आहे. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०७:३७, ३१ जुलै २०१८ (IST)Reply
  झाले.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५४, ३१ जुलै २०१८ (IST)Reply
धन्यवाद! आपले आराखडा बनविण्यात बहुमोल योगदान अपेक्षित आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५९, ३१ जुलै २०१८ (IST)Reply

@V.narsikar, अभय नातू, आणि Tiven2240:, अभियान सुरु झाले आहे. तेलुगु आणि हिंदी विकिपीडियावर सुद्धा सुरु आहे. तेलुगु वरील साईट नोटीस आकर्षक आहे. असा तिरंगा आपल्या नोटीसमध्ये टाकावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२३, १० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

  झाले. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:३१, १० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

धन्यवाद! आता गतिमानता जाणवत आहे. संपादकांचा उत्साह वाढेल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३६, १० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

लेख यादी - बारीक अक्षरे संपादन

@Tiven2240: आपण लेख यादी दोन स्तंभात केली आहे, त्यामुळे सोयीचे झाले आहे. परंतु अक्षरे खूप आकाराने बारीक झाली आहेत. तरी दुरुस्ती करून आकार मोठा होईल असे पहावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३९, १२ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: हे एक प्रकल्प पान आहे आणि हा पान जास्त मोठा दिसला नाही पाहिजे त्यामुळे मी त्याला छोटे केले होते. मोठे पान वाचालकाना आवडत नाही. जर आपल्याला ती जास्त छोटी दिसत आहे तर आपण माझ्या पसंती > उपकरण (गॅजेट) > स्वरूप > महितीचौकोट आणि संदर्भ सूचीसारख्या तत्वांचे लहान फॉन्ट आकार अक्षम करा याला टिक करून पहा. आपल्याला ती मोठी दिसून येईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:१९, १३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

साचा:स्वातंत्र्यलढा अभियान २०१८ संपादन

@Sureshkhole, Tiven2240, आणि V.narsikar:, आपण अभियानाचे लेख प्रगती फलकावर नोंदविण्यासाठी आणि एका वर्गात जाण्यासाठी {{स्वातंत्र्यलढा अभियान २०१८}} हा साचा तयार करून लावला आहे असे मला वाटते. यामुळे सर्व चर्चापाने वर्ग:स्वातंत्र्यलढा अभियान २०१८ येथे जात आहेत. लेखांना हा वर्ग असायला हवा असे माझे मत आहे. असे होण्यासाठी आपण काय सुधारणा करावी याचा खुलासा केल्यास बरे होईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:३१, १३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: वर्ग लेखावर लावणे योग्य नाही असे माझे मत आहे कारण असे अनेक कार्यशाळा आयोजित केले जाते व प्रत्येक वेळी आपण असे लेखात वर्ग लावत जाऊ तर खूप गोंधळ निर्माण होईल. असे लेखाला एकाढ्या कार्यशाळा वर्ग लावण्याची प्रथा इतर विकिपीडियावर सुद्धा नाही. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:४०, १३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

{{रिकामे पान}} बघावा.यात चर्चा पानावर लावलेल्या साच्यातील वर्ग मूळ लेखात दिसतो. तसेच , 'वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियानातील संपादित लेख' असा वर्ग

साचा:स्वातंत्र्यलढा अभियान २०१८ यात टाकावा, व साचा रिकामी पाने सारखा करावा म्हणजे हा लपविलेला वर्ग मूळ लेखपानावर दिसेल.सध्या मी हे करू शकत नाही. म्हणून टायवेन यांना विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:३१, १३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

  • असे साचे चर्चापानावर लावणे जाणे काही नविन बाब नाही, त्याबाबतचे धोरण (ज्यांचा अशा साच्यांना विरोध आहे त्यांनी)आपल्याला वेगळे करायचे असल्यास तसा धोरणाचा प्रस्ताव टाकून तो समुदायाकडून पारीत करुन घ्यावा.
  • सध्या अशा कोणत्याही धोरणांच्या अभावी आणि असे साचे लावणे हे प्रस्थापित रितीत बसत असल्याने, रास्त आहे असे माझे म्हणणे आहे.
  • शिवाय धोरणांच्या मतामध्ये माझे मत असे साचे मुद्दाम लावले जावेत असे माझे मत राहिल, जेणेकरुन एखादी संस्था, गट, व्यक्ती अभियान म्हणून एडिटोथॉन म्हणून काही लेख सुधारत असेल तर त्यांची नोंद चर्चापानांवर होणे त्या संस्था, गट, व्यक्तीच्या कार्याची ती नोंद होते. आणि दीर्घकालिन दृष्टीने कोणत्याही एककाला त्याच्या कार्याची ओळख ठेवणे आवश्यक आहेच की.
  • ह्या ठिकाणी मी हे नोंदवू इच्छीतो कि, प्रचालकांनी आपण विकिचे मालक आहोत हा बाणा सोडून समुदायाच्या हिताचे काय आहे ह्या बाण्यावर येणे आवश्यक आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने समुदायासाठी काम करणे शक्य होते. शिवाय प्रचालक पदही समुदायाला हित मिळवून देणे ह्याचसाठी त्यांना दिले गेले आहे हे ही त्यांनी लक्षात ठेवावे. बाकी सूज्ञांस काय सांगावे?
  • नरसीकर दादांनी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद, आपल्याशीच संवाद होऊ शकतो आणि आपल्याला समुदायाचे हित कळते ह्याचा आणखीन एक पुरावा आपण दिला आहे. सुरेश खोले संवाद हवा? १९:३६, १३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@अभय नातू: आपण याना हे समजावण्याचा प्रयत्न करा. आशा आहे की आपण यात मदत कराल. सुरेश कधी काय म्हणतात ते त्यानास कधी कळत नाही आपण कृपया मदत करा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:५३, १३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar: मी साचा पाहिले त्यात वर्ग आहेतच नाही. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:१३, १३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply
@Sureshkhole:,
वर्ग लेखावर लावणे योग्य नाही असे माझे मत आहे कारण असे अनेक कार्यशाळा आयोजित केले जाते व प्रत्येक वेळी आपण असे लेखात वर्ग लावत जाऊ तर खूप गोंधळ निर्माण होईल. असे लेखाला एकाढ्या कार्यशाळा वर्ग लावण्याची प्रथा इतर विकिपीडियावर सुद्धा नाही.
याच्यावर तुम्ही लिहिलेत -
प्रचालकांनी आपण विकिचे मालक आहोत हा बाणा सोडून समुदायाच्या हिताचे काय आहे ह्या बाण्यावर येणे आवश्यक आहे
१. येथे मत आहे, कारण असे, इ. वाक्प्रयोग पाहता तुमचे विधान कसे लागू होते हे कळले नाही.
२. खरे-खोटे काहीही असले तरी सगळ्या प्रचालकांना एकाच फटकाऱ्यात रंगवणे बरोबर नाही. येथे लिहिलेले सगळ्या जगाला वाचण्यासाठी खुले आहे. संदर्भ (काँटेक्स्ट) नसल्यास मोठे गैरसमज आणि गोंधळ होणे साहजिक आहे.
अभय नातू (चर्चा) ००:१३, १४ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar:, अखेर साच्याविषयी काय निर्णय झाला? कोणता साचा लावावा हे सांगावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:०९, १४ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

पुर्वी प्रमाणेच साचा लावणे सुरू ठेवावे, नंतर त्याकडे बघतो.-वि. नरसीकर

१०० लेख माहितीपूर्ण व निर्दोष करणे संपादन

अभियानात सहभागी सदस्य उत्तम योगदान करीत आहेत. आपण सर्वांनी १०० लेखांची यादी केली आहे. आता या लेखांवर पुढील ५-६ दिवस काम करून हे माहितीपूर्ण व निर्दोष करावेत असे मला वाटते. अनेक लेखांना संदर्भ,चित्रे,माहितीचौकट साचे लावलेले नाहीत. यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करूया. आपले मत द्यावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:३७, १५ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

साईटनोटीस बदल सुचना संपादन

राष्ट्रीय दुखवट्यामुळे अभियानाची साईटनोटिस १ दिवसासाठी साधी केली आहे. उद्या पूर्ववत होईल.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:४४, १७ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

१८ ऑगस्ट २०१८ पासून Protected संपादन विनंत्या संपादन

Laxman sarvade (चर्चा) १६:२७, १८ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

अभियानात सहभागी सदस्यांचे अभिनंदन! संपादन

नमस्कार! भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियानात सहभागी सर्व सदस्यांचे आभार आणि अभिनंदन. या अभियानात सर्वांनी नियोजनात आणि प्रत्यक्ष लेख संपादनात मोलाची कामगिरी केली आहे. या निमित्ताने एकूण ३५ लेख नव्याने तयार झाले तर १२२ लेख संपादित केले गेले. पहा - अभियानाचा संपादन नोंद फलक. यामुळे वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा हा समृद्ध झाला. आता उपवर्ग नीट करणे, माहितीचौकट/संदर्भ इ. भर घालून हे लेख उत्तम करण्याचा प्रयत्न करु. हे अभियान तेलुगु, हिंदी, मल्याळम व ओडिया या भाषा समुदायांनी पण उत्साहाने राबविले. दरवर्षी हे होत राहावे असे वाटते. सर्वांनी अवश्य आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:११, २३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

विकिप्रकल्प संसाधने संपादन

@अभय नातू, V.narsikar, Sureshkhole, आणि Rajendra prabhune:, या अभियानाच्या निमित्ताने बरेच संदर्भ एकत्र केले गेले आहेत, जे भविष्यात सर्वांना उपयुक्त ठरतील. असे विषयवार संदर्भ वेळोवेळी सुव्यवस्थितपणे एकत्र करण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प संसाधने हा सुरु करावा असा प्रस्ताव ठेवत आहे. ही संसाधने संदर्भ याद्या, तांत्रिक प्रशिक्षण साहित्य..असे विविध प्रकारचे असेल. आपण ग्रंथालय शास्त्राशी संबंधित व्यक्ती,अभ्यासक,संशोधक आदींना आवाहन करून या याद्या अद्ययावत करूया. नवीन संपादकांना विश्वसनीय संदर्भ स्रोत मिळाल्याने लेखांचा दर्जा वाढू शकेल. अभियानाच्या पानाचे विदागारीकरण करावे. त्याआधी यावरील संदर्भयादी मी विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संदर्भ संसाधने या पानावर हलविण्याचा विचार करत आहे. प्रत्येकाच्या आवडीनुसार विविध विषयांची भर यात पडत राहील. उदा.ऑक्टोबरमध्ये 'महिला आरोग्य' या विषयावर अखिल भारतीय अभियान प्रस्तावित आहे. त्या निमित्ताने या विषयावर साधने एकत्र होतील. आपल्या प्रतिसादांची,कल्पना व सूचनांची मदत या संकल्पनेसाठी होईल अशा अपेक्षेसह,
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:१८, २४ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@अभय नातू, V.narsikar, आणि Sureshkhole:, वरील संकल्पनेवर आपले काय मत, सूचना आहेत? अशी संसाधने एकत्र होत गेली तर आपल्याला विकिपीडिया ग्रंथालय प्रकल्प मराठीत सुरु करता येईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:१५, २० सप्टेंबर २०१८ (IST)Reply

Return to the project page "भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८".