विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/पेट्रोलर सदस्य अधिकार

पेट्रोलर सदस्य गट

नवीन पानाचे निरीक्षण करणे व स्वतःचे संपादन आपोआप निरीक्षित होण्यास हे नवीन अधिकार.

पेट्रोलर / निरीक्षक

संपादन

हे अधिकार नवीन पानाचे असलेले बॅकलॉग कमी करण्यासाठी मदत करेल. या अधिकारात special:new pages मध्ये असलेले पिवळे पान जे निरीक्षित नाही त्याला निरीक्षित करेल.

लेख निरीक्षण केव्हा करायचे?

संपादन
  • लेखात कॉपीराईट (प्रताधिकार) उल्लंघन नसले पाहिजे.
  • लेखात आवश्यक सर्व वर्ग जोडले पाहिजे.
  • लेख उल्लेखनीय असला पाहिजे.
  • लेख विकिडाटा कलमला जोडला असला पाहिजे.

लेख निरीक्षण केव्हा करू नये?

संपादन
  • ज्या पृष्ठांना आपण निश्चितपणे ओळखत नाही आणि तसे पान ठेवण्यास कोणीही इतरांना समर्थन देत नाही.

निरीक्षक कोण व कसे बनता येईल?

संपादन
  • मुख्य नामविश्वात किमान ५०० संपादने (स्वयंचलित किंवा अर्धस्वयंचलित सांगकामे/बॉट किंवा तत्सम उपकरणे न वापरता केलेली) असणे गरजेचे.
  • संपादक मागील १ महिन्यापेक्षा जास्त स्वयं-निरीक्षित असला पाहिजे.

स्वयं-निरीक्षित/ ऑटो पेट्रोल

संपादन

हा एक असा अधिकार आहे ज्यात विकिमधील इतरांचे क्रियांवर निरीक्षण करण्याची क्षमता नसते. त्याऐवजी, त्यांच्या स्वतःच्याच क्रियांवर निरीक्षित म्हणून खूण लागते.

अधिकार कसे मिळतील

संपादन
  • हे अधिकार प्रचालक विकिपीडिया:अधिकारविनंती वर केलेल्या विनंतीनुसार देतात.
  • संपादकांना पूर्वी एक महिना ऑटो पेट्रोल अधिकार दिले पाहिजे नंतर अनुभवी सदस्यांना विनंती/ प्रोग्रेस वर पेट्रोलर अधिकार दिले पाहिजे.

अधिकार केव्हा काढला जाईल

संपादन

प्रचालक हे एकाद्या सदस्याचे अधिकार काढतील जेव्हा:

  • अधिकाराचा गैर-वापर होईल.
  • सदस्य तडीपार झाला तर
  • अनेक वेळा निरीक्षण न करता पेट्रोल केल्यावर.

चर्चा

संपादन

@संतोष दहिवळ, Sandesh9822, , प्रसाद साळवे, आणि आर्या जोशी: @Goresm, सुबोध कुलकर्णी, अभय नातू, आणि Vikrantkorde: @Rockpeterson, Stt65, Vikramg7969, आणि सुशान्त देवळेकर: @ज्ञानदा गद्रे-फडके, Alexhuff13, नरेश सावे, आणि Manoj.nimbalkaradtbaramati: कृपया आपण सर्वांनी आपला कौल द्यावा. --Tiven2240 (चर्चा) १८:४१, १८ डिसेंबर २०२० (IST)[reply]

@अभय नातू:कृपया आपले मत/अंतिम निर्णय नोंदवा --Tiven2240 (चर्चा) १०:२६, २८ डिसेंबर २०२० (IST)[reply]

खाली सदस्य आर्या जोशी यांनी नोंदविलेल्या प्रश्नांवर तुमचे मत काय आहे? -- अभय नातू (चर्चा) १०:२८, २८ डिसेंबर २०२० (IST)[reply]

@अभय नातू:NPP साठी ५००० संपादने असणे आवश्यक वाटत नाही. या अधिकारात लेख डिलीट किव्हा संग्रक्षित करण्यास अधिकार नाही ज्यामुळे इथे अधिक भांडणी होतात. NPP झाल्यावर फक्त ते लेख पूर्णपणे प्रकाशित होतात. मराठी विकिपीडियावर सक्रिय प्रचालकांची कमी असल्यामुळे काही महत्त्वाचे लेख पूर्णपणे प्रकाशित होत नाही. एकदा प्रकाशित झाल्यावर गूगल सारखे सर्च इंजिन त्यावर क्रौल करतात ज्याने लेख सर्वाना शोध घेतल्यावर दिसते. स्वयं-निरीक्षित साठी ५०० व निरीक्षक साठी १००० संपादने योग्य वाटते का? --Tiven2240 (चर्चा) १०:४३, २८ डिसेंबर २०२० (IST)[reply]

  पाठिंबा- मला अजून विकिपीडिया तितकंसं अंगवळणी पडलं नाही. अजूनही मी थोडं हातचं राखून काम करत असतो. त्यामुळे ही सुविधा मी तोलून मापून वापरेल. - Goresm
  पाठिंबा- विकिपीडियाचे व्यवस्थापन अजून ठीक होण्यास हा अधिकार मराठी विकिसमुदायास चांगला ठरेल. - Sandesh9822
  विरोध- मला यासाठी आवश्यक म्हणून नोंदविलेले ५०० संपादनांची संख्या ही खूपच कमी वाटते आहे.पुरेसा नियमित अनुभव असण्यासाठी चांगल्या गुणवत्तेची किमान ५००० संपादने आवश्यक वाटत आहेत. तसेच या सर्वाचे नियंत्रण कोण करणार आणि काही वाद झाल्यास त्यात सक्रिय सहभाग घेऊन संपादकांना मदत कोण करणार या विषयाचे पुरेसे स्पष्टीकरण अद्याप आवश्यक आहे असे वाटते. - आर्या जोशी
  पाठिंबा- होय हा पेट्रोलिंग अधिकार मराठी विकिपीडियावरील नवीन लेख सुधारण्यात आणि स्वीकारण्यात मदत करेल. मराठी विकिपीडियावर कमी सक्रिय सदस्य असल्याने, हे अधिकार वापरल्याने लेखाचा अनुशेषही साफ करण्यास मदत होईल. - Rockpeterson