विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २३

साचांना आंतरविकिदुवे

संपादन

साचांचे भाषांतर करणार्‍या सर्व सदस्यांना आग्रहाची विनंती आहे की कृपया इंग्रजी विकिपिडियातून घेतलेल्या साचांना प्राथमिकतेने आंतरविकि दुवे द्यावेत आणि मागचाही साचांचा असलेलेला आंतरविकिदुवे बॅकलॉग प्राधान्याने दूर करणे जरूरी आहे.

सध्या साचांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतरकरताना थोडी तारेवरची कसरत होते आहे कोणते साचे आणि उपसाचे आधीच भाषांतरीत झाले आहेत कोणते नाही हे नव्याने भाषांतरात लक्ष घालताना अवघड जाईल व कालापव्यय होईल असे जाणवते आहे. Mahitgar ०६:४६, २७ जुलै २००९ (UTC)

चित्र सलगपणे जोडणे

संपादन

लोणार अभयारण्य लेखातील चित्रे सलगपणे जोडता येतील का? आणखी काही करता येईल का? ते संपूर्णपणे एकच चित्र असावयास हवे, फोटो काढतांना तीन वेगळे फोटो काढण्याचे कारण संपूर्ण दृष्य नीट दिसावे हे होते. ते फोटो जर एकत्र केले तर पाहतांना त्यातील वेगळेपणा जाऊन सलगतेचा आनंद मिळेल. सदस्य:Mahitgar यांनी सुचविल्यावरून येथे प्रश्न मांडत आहे. Gypsypkd ०९:२१, ५ ऑगस्ट २००९ (UTC)

कोणत्याही फोटो-संपादन सॉफ्टवेरद्वारे चित्रे जोडता येतात. काही फुकट असलेल्या सॉफ्टवेरची यादी येथे आहे - गूगल शोध
अभय नातू २१:२६, ५ ऑगस्ट २००९ (UTC)

तुम्हाला जर् वेगवेगळे फोतो जोडुन् एजक् सबंध् नविन् चित्र बनवता येइल् यासाठि त्या भागाच्हे चित्र घेताना ट्राय् पॉड् वर् कैमेरा ठेवुन त्या भागाच्ही नीट् चित्र काढा .आणि www.autostitch.net या संकेत् स्थळा वरुन् एक् टुल् डाउन्लोड् करा त्यात् सर्व् चित्रे टाका आणि क्षणार्धात् तुम्हाला संपुर्ण चित्र मिळेअल हे सोपे आहे आणिन् त्याच्ही संपुर्ण् माहिती संकेत् स्थळा वरही दिली आहे.वास्तविक् या प्रकाराला पनोरमा (panorama) असे संबोधतात् तुम्हि जास्त् माहिती साठी गुगल वरहि panorama नावाने सेर्च करा . ओंकार् वाळिंबे http;//netncrime.blogspot.com

पान स्थानांतरण टॅब दिसत नाही

संपादन

मी नवीन सदस्य नाव मराठीत तयार केले. मला आता पानांचे स्थानांतरण टॅब दिसत नाही. हा प्रॉब्लेम मलाच येतो आहे का इतरांनाही आणि काही उपाय? माहीतगार ०९:५१, ७ ऑगस्ट २००९ (UTC)

नवीन सदस्यांना लगेचच पान स्थानांतरणाचे privilege[मराठी शब्द सुचवा] मिळत नाही. ४ दिवसानंतर नवीन सदस्यखाते Auto-confirmed होते. त्यानंतरच तो सदस्य स्थानांतरणे, अर्ध-सुरक्षित पानांमध्ये बदल करू शकतो. अधिक माहिती इथे आहे. आपण नवीन खाते तयार केल्यामुळे असे होत आहे.
क्षितिज पाडळकर १४:४५, ७ ऑगस्ट २००९ (UTC)

हे नेमके कसे काय आहे ?

संपादन

मी en:Wikipedia:WikiProject Maharashtra येथील प्रकल्प मार्गक्रमण साचा अभ्यासताना article statistics'' This list is generated automatically every night around 3 AM UTC. आणि प्रकल्प संबधीत version नामक काही प्रकार आढळला ह्याचा नेमका काय उपयोग आणि हि लेखाची सांख्यिकी आपोआप कशी अपडेट होते ?

मला हे प्रकल्प मार्गक्रमण साचा आराखडा करिता वापरणे जमेल काय ?

माहीतगार १०:४३, ७ ऑगस्ट २००९ (UTC)

याद्यांसाठी नवीन वर्ग

संपादन

नमस्कार, इंग्रजी विकिप्रमाणे इथेपण मी खालीलप्रमाणे वर्ग करू इच्छितो.
मूळ

-याद्या
-देशांच्या याद्या
-देशानुसार याद्या
-भारत देशासंबंधित याद्या
-...
-खंडानुसार याद्या
-आफ्रिका खंडासंबंधित याद्या
-युरोप खंडासंबंधित याद्या
-विषयानुसार याद्या
-भूगोलासंबंधित याद्या
-खगोलशास्त्रासंबंधित याद्या
-...

कृपया आपले मत सांगावे, तसेच वरील नावांमध्ये काही बदल आवश्यक असतील तर तेसुद्धा सांगावेत.
क्षितिज पाडळकर ०२:४२, ८ ऑगस्ट २००९ (UTC)

नवीन सहप्रकल्पाच्या भाषांतरात मदत हवी

संपादन

विकिमीडिया फाउंडेशनने नवीन विकिमिडियाचा स्ट्रॅटेजी हा नवीन सहप्रकल्प सुरू केला आहे. नवीन सहप्रकल्प आपल्या लक्षात येऊन आपण भाषांतरांना सुरूवात करे पर्यंत पुला खालून बरेच पाणी गेलेले असते आणि आपण कायम मागे राहतो.यावेळी नवीन सहप्रकल्प सुरू होतानाच माहिती मिळत आहे.त्याच्या भाषांतरास आता पासूनच सहकार्य मिळाले तर आपण मागे रहाणार नाही.

धन्यवाद

61.17.75.180

Try Beta चे भाषांतर

संपादन

सद्ध्या उजव्या कोपर्‍यात "बीटा वापरु पहा" असे दिसत आहे, ते "बीटा वापरून पहा" किंवा "बेटा वापरून पहा" असावे.

क्षितिज पाडळकर ०२:१७, १८ ऑगस्ट २००९ (UTC)
मी आजच ते दुरुस्त केले होते. दुरुस्त केलेला मजकूर का दिसत नाही ते माहिती नाही.
अभय नातू ०३:३३, १८ ऑगस्ट २००९ (UTC)
दुरुस्त केले
सुभाष राऊत ०४:०१, १८ ऑगस्ट २००९ (UTC)

सध्या "बीटा वापरुन पहा" असे दिसते आहे. पण वापरून मधला रु -ह्स्व दिसतो आहे. तो दीर्घ रू हवा.

Priority support request

संपादन

Dear Marathi Wikipedians

We seem to get a good response to marathi wikipedia project विकिपीडिया:वनस्पती , But these newly joining people would be very new to concept of templates.

So I need your help in translation of following project templates at the earliest. :साचा:विकिपीडिया वनस्पती प्रकल्प and the list of tempaltes at Templates

Only template taxbox is translated as जीवचौकट rest of them are to be translated.

माहीतगार १२:३६, १८ ऑगस्ट २००९ (UTC)

साचा दुरूस्ती करून हवी

संपादन

साचा:प्रकल्पलेख चर्चापान साचा आराखडा प्रमाणे {{Substविप्रवने लेखचर्चा पान तात्पूरता साचा}} बनवण्याचा प्रयत्न तसेच

माझे हे प्रयत्न माझ्या प्रगतसाचे ज्ञानातील मर्यादांमुळे कुठे तरी फसत आहे त्यात दुरूस्ती साठी तातडीचे सहाय्य हवे आहे.

माहीतगार ११:५८, २० ऑगस्ट २००९ (UTC)

Welcome साचात सुधारणा

संपादन

साचा:Welcome करिता साचा:धूळपाटीसाचा येथील सुचवलेले बदल पहा खालील बदल केले आहेत.

  1. इंग्रजीतील वेलकम मेसेज साचाच्यामाथ्यावर दाखवा लपवा साचात टाकला आहे.त्यामुळे एकुण मेसेजची लांबी कमी होते आहे. आवश्यकता असलेली व्यक्तिच केवळ इंग्रजी संदेश उघडेल
    1. अर्थात तो दिसण्यात बाकी साच्याशी मॅचिंगकरण्यात सहाय्य हवे आहे.
    2. दाखवा हा शब्द "show me" असा इंग्रजीत दिसून हवा आहे.
  2. मराठी मेसेज मध्ये देखिल अधिक माहिती आणि सहाय्य दाखवा लपवा साच्यात टाकले. मेसेजची लांबी कमी होते आणि ज्या व्यक्तिस आणि जेव्हा सहाय्य हवे तेव्हा ती उघडून पाहू शकते.
  3. साचा {{Subst:धूळपाटीसाचा}} वेलकम म्ध्ये स्थानांतरीत केल्या नंतर {{Subst:स्वागत}} लिहिल्यास संदेश देणार्‍या व्यक्तिची सही आपोआप उमटेल.

साचा:धूळपाटीसाचाला पुढे परिष्कृत करून साचा:Welcome मध्ये आणावे असे सुचीत करत आहे.

माहीतगार ०६:०१, २४ ऑगस्ट २००९ (UTC)

परभाषा

संपादन

मराठी विकिवर परक्या भाषेतील शब्द लिहितांना त्या त्या भाषेतील उच्चारांप्रमाणे लिहावे की आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती नुसार लेखन करावे हे मला कळलेले नाही. याबाबत खुलासा व्हावा असे वाटते. उदा. रशियन भाषेत "ह" चा उच्चार नाही. त्याऐवजी "ग" किंवा "ख" हे "ह" ची जागा घेतात. (हिमालय ऐवजी गिमालय). सयुझ सवेत (प्रत्यय लागून पूर्ण नाव : सयुझ (Union) सवेत्सकिक (Sovet) सत्सियालिस्तीचिस्किक (Socialist) रिस्पुब्लिक (Republic) S.S.S.R.) असे भूतपूर्व सोवियेत संघाचे नाव होते. त्याचे मराठीत सोव्हियेत संघ असे (चुकीचे) करण्यात आलेले नाव पाहिले (मी संपादन केलेल्या लेखाचे पुनर्निर्देशन झाले) म्हणून हा पश्न येथे उपस्थित केला. दुसरे उदा. गोर्बाचोव (Gorbachov) असे लिहिण्याऐवजी इंग्रजीतसुद्धा ते गोर्बाचेव्ह (Gorbachev) असे केलेले दिसते. मग कशाला प्रमाण मानायचे असा प्रश्न राहतोच. या दृष्टीने मुंबई, पुणे विद्यापीठातील त्या त्या भाषेचे जाणकार तसेच पुण्याहून प्रकाशित होणारे केल्याने भाषांतर किंवा त्यासारखी नियतकालिके नक्कीच मदत करतील असे वाटते. काही भाषांचे प्राथमिक धडे नेटवरही आहेत. असे ठरलेले धोरण मग कोणीही बदलू नये, त्याविषयी नवीन सदस्यांनाही माहीत व्हावेच. (चु. भु. दे. घे.) Gypsypkd ०५:०८, ३० ऑगस्ट २००९ (UTC)

नमस्कार,
गेले अनेक दिवस विकिपीडियाव्यतिरिक्त विषयांत व्यस्त असल्याने उत्तर देता आले नाही...
तुम्ही चोखाळलेल्या प्रश्नावरुन पूर्वी अनेकदा रसभरीत व प्रसंगी विस्फोटक चर्चा झालेल्या आहेत. त्यात बेळगांव/बेळगावी, अमदावाद/अहमदाबाद पासून पॅरिस/पारि पर्यंत सगळ्यांचा उद्धार(!) झालेला आहे :-)
त्यातून काही ढोबळ नियमावली तयार झाली ती अशी. (हे मी माझ्या स्मृतीपरत्वे लिहीत आहे, चू.भू.द्या.घ्या.)
१. शक्यतो स्थानिक भाषेतील नावाने लेख तयार करावा. इतर प्रचलित नावांनी तेथे पुनर्निर्देशन करावे - उदा. वलसाड हा लेख आणि बलसाड हे पुनर्निर्देशन आहे.
१.१ अतिप्रचलित नावांसाठी यात अपवाद करावा - पॅरिस लेख, पारी (स्थानिक फ्रेंच उच्चार) पुनर्निर्देशन.
२. स्थानिक उच्चार जशासतसे उतरवावे. त्यात मराठी शुद्धलेखन नियम लावण्याचा हट्ट धरू नये - उदा. गिनी-बिसाउ बरोबर गिनी-बिसाऊ बरोबर नाही (पण तेथून पुनर्निर्देशन असावे).
२.१ संदिग्धता असल्यास आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीप्रमाणे नाव द्यावे.
२.२ तरीही संदिग्धता असेल तेथे स्थानिक उच्चारांचे मराठी शुद्धलेखन नियमांनुसार शुद्धलेखन करावे. गझनी ठीक, गझनि नाही.
३. जरी एखादे नाव पूर्वापार अशुद्ध लिहिण्यात येत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करावे - उदा. ताश्केंत बरोबर, ताश्कंद कडून पुनर्निर्देशन. १.१ आणि ३ यांत विसंवाद आहे, पण सदस्यांनी तोलून-मापून (subjectively) उचित नाव ठरवावे.
४. नावाचे मराठीकरण केले असले तर मराठी शुद्धलेखनच लिहावे - कूक आयलँड्स > कूक द्वीपसमूह, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
५. एखाद्या नावाबद्दल प्रश्न पडल्यास चावडीवर विचारावे.
६. इतर नियम आठवतील तसे लिहीन. जुन्या चावडी-पानांवर शोध घेतला असता ते सापडतीलही.
आता तुमच्या प्रश्नांबद्दल - हिमालय हे हिमालय असेच लिहावे. रशियनमध्ये गिमालय म्हणत असले तरी हिमालय रशियात नाही...आता युरल पर्वतांना त्यांनी गुरल पर्वत म्हणले तर आपणही गुरल पर्वतच म्हणले पाहिजे (पांचट विनोद चालवून घ्यावा.)
सोवियेत/सोव्हियेत संघ हे मराठीकरण झालेले नाव आहे. अतिप्रचलित असल्यामुळे ते ठेवावे असे वाटते. त्याच्या रशियन पूर्ण नावाने तसेच छोट्या नावाने पुनर्निर्देशने द्यावी.
गोर्बाचोव/गोर्बाचेव्ह - अनेकदा इंग्लिशमध्ये नाव लिहिताना चुकलेले असते, ही चूक मराठीत चालू ठेवू नये - इंग्लिशमध्ये गोर्बाचेव/गोर्बाचेव्ह असा उच्चार (इंग्लिश विकिपीडियावरसुद्धा) असला तरीही गोर्बाचोव्ह/गोर्बाचोफ यांच्या भाषेतील उच्चार बरोबर मानावा. अर्थात, हे माझे मत आहे. अशा ठिकाणी उपयुक्त असे संदर्भ द्यावे.
तुम्ही दिलेले माहितीस्रोत नक्कीच उपयोगी ठरतील. तेथील संदर्भ मिळाल्यास उत्तमच.
अभय नातू २०:०३, २ सप्टेंबर २००९ (UTC)

चित्रसंचिका वर्गीकरण

संपादन

नमस्कार,

माहीतगार, नरसीकर (भटक्या?) व माझ्यात याविषयी झालेला संवाद. आपले मत येथे कळवावे.

अभय नातू १९:१३, २ सप्टेंबर २००९ (UTC)

माहीतगार

संपादन

नमस्कार,

इतर आवश्यक वाटलेली सहाय्य पाने बनवण्यात व्यस्त होतो त्यामुळे तुमच्या शंकेचे तत्काळ उत्तर देऊ शकलो नाही, क्षमस्व.

मराठी विकिपीडियात पुरेशा संपादनबळा अभावी चित्र संचिकांची बोटांवर मोजण्या पलिकडे वर्गीकरणे झालेली नाहीत. जी काही (बोटावर मोजण्या एवढी) झाली आहेत ती वर्ग:संचिका येथे आढळतात.हि वर्गीकरणे कशी करावीत या बद्दल सदस्य:अभय नातू यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळू शकल्यास पहावे.

तुमच्या प्रमाणेच हे काम बाकी असल्याची जाणीव सध्या विकि रजेवर असलेले सदस्य:Sankalpdravid यांना झाली होती असे दिसते. त्या मुळे वर्ग:संचिका येथे संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प सुरू करण्याचा मानस स्पष्ट होतो. त्यामुळे किमान आज मी या बद्दल एक प्रकल्प पान सुरू केले.

या बद्दल आपण नव्याने वर्गिकरण निती सुचवू शकता किंवा इंग्रजी विकिपीडिया आणि कॉमन्सवर सध्या वर्गिकरणे चित्र वर्गीकरणे कशी पार पाडली जातात तेसुद्धा अभ्यासू शकतात.

माहीतगार ०७:३९, २ सप्टेंबर २००९ (UTC)

नरसीकरांनी मागितलेली मदत

संपादन

माहीतगार यांचेशी झालेली चर्चा वर दिली आहे. या प्रकरणी त्यांनी 'आपलेकडून मार्गदर्शन घ्यावे' असे सुचविले आहे.मार्गदर्शनाच्या अपेक्षेत आहो.

माझे उत्तर

संपादन
नमस्कार,
विकिपीडियावर संचिका व चित्रांचे वर्गीकरण करताना खालील नियम पाळावे.
०. फक्त मराठी विकिपीडियावर चढवलेल्या चित्रांचेच वर्गीकरण करावे. कॉमन्सवरील चित्रांचे वर्गीकरण करू नये.
१. शक्यतो सगळ्या संचिका व चित्रांचे वर्गीकरण करावे. एक चित्र अनेक वर्गांत बसत असेल तर सगळ्या वर्गांत त्याचे वर्गीकरण करावे.
२. चित्रांसाठी वर्ग तयार करताना वर्गनावास चित्रे हा प्रत्यय लावावा, उदा. पोस्टर चित्रे, क्रिकेट चित्रे, इ.
३. चित्रांना विषयानुरुप वर्गांत घालावे. उदा. भारतीय रेल्वे चित्रे. असे वर्ग नसतील तर तयार करावे. अनेक चित्रे असतील किंवा असू शकतील असेच वर्ग तयार करावे. दोन-चार चित्रे असतील असे वर्ग तयार करू नयेत. - भारतीय रेल्वे चित्रे ठीक, पण भारतीय रेल्वेची पिंपरीजवळील चित्रे उचित नाही. अर्थात, पिंपरीजवळील रेल्वेची अनेक चित्रे चढवल्यास हा ही वर्ग तयार करावा. या नियमामागे वर्गसंख्या कमी करण्याचा हेतू नसून वर्गवृक्ष सुटसुटीत ठेवणे हाच आहे.
४. प्रत्येक नवीन वर्गाला अंततः विकिपीडिया चित्रे हा मूळ वर्ग असावा - उदा. भारतीय रेल्वे चित्रे > भारत चित्रे > विकिपीडिया चित्रे. किंवा भारतीय रेल्वे चित्रे > रेल्वे चित्रे > विकिपीडिया चित्रे. एखाद्या चित्रवर्गापासून विकिपीडिया चित्रे वर्गापर्यंत अनेक मार्ग असू शकतात.
५. चित्र नसलेल्या संचिकांचे (.wmv, .ogg, .mp3) विकिपीडिया चित्रे च्या वर्गवृक्षात वर्गीकरण करू नये. अशा संचिकांना वरीलप्रमाणेच नियम लागू होतात पण त्यांचे मूळवर्ग विकिपीडिया ध्वनिसंचिका, विकिपीडिया चलचित्रसंचिका, इ. असतील.
वरील नियम सदस्यांच्या सूचनांनुसार बदलतील. बदलल्यास चावडीवर सूचना देण्यात यावी.
अधिक माहिती हवी असल्यास किंवा वरीलपैखी एखादा नियम स्पष्ट नसल्यास माझ्या चर्चापानावर संदेश ठेवालच.
अभय नातू १९:१३, २ सप्टेंबर २००९ (UTC)
Thanks Abhay for your valuable support.माहीतगार ०४:३४, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
वरील चर्चा आणि सदस्य:V.narsikar यांचे संबधीत योगदान या वरून खालील दुरूस्त्या सुचवत आहे
१. शक्यतो सगळ्या संचिका व चित्रांचे वर्गीकरण करावे. एक चित्र अनेक वर्गांत बसत असेल तर सगळ्या वर्गांत त्याचे वर्गीकरण करावे.
हे मान्य पण अधिक सोदाहरण स्पष्ट व्हावयास हवे. वीड्याचे पान चित्रास वर्ग:औषधी वनस्पती पानांची चित्रे ,वर्ग: वनस्पतींची मानवी खाद्य पानांची चित्रे असे दोन्हीही वर्ग लावावेत पण वर्ग:वनस्पती पानांची चित्रे हा वर्ग:औषधी वनस्पती पानांची चित्रे, वर्ग: वनस्पतींची मानवी खाद्य पानांची चित्रे या उप वर्गांचा वर्ग असावा वीड्याचे पान चित्रास वर्ग:वनस्पतींची पाने वर्ग वेगळा लावण्याची आवश्यकता रहाणार नाही. त्या प्रमाणेच वर्ग:वनस्पती पानांची चित्रे, वर्ग:वनस्पती फुलांची चित्रे इत्यादी मुख्य वर्ग:वनस्पती चित्रे वर्गात घ्यावे तसेच वर्ग:वनस्पती चित्रे चा मुख्य वर्ग वर्ग:विकिपीडिया चित्रे असावा. मला वाटते. याचा वर्गवृक्ष साचा कुणी बनवून दाखवल्यास समजणे सोपे जाईल.
अर्थात मी या चर्चेत पूरेसे कॉन्संट्रेट करू शकत नाही आहे(माझे लक्ष इतर कुठे लागले आहे, क्षमस्व) . त्यामुळे आपण सर्वांनी आपापसतील चर्चेने सुयोग्य निर्णय घ्यावेत.आत्ता एवढेच पुन्हा संध्याकाळी बघेन धन्यवाद माहीतगार ०८:००, ३ सप्टेंबर २००९ (UTC)

असे का?

संपादन
मी एका चित्राबद्दलची माहिती हेमसागर या लेखात [[File:Crassulaceae.jpg|thumb|right|जेड? वनस्पती / मैत्रीचे झाड, ''क्रस्सुला ओव्हाटा'' ]] अशी टाकली आणि ती हेमसागर या लेखात व्यवस्थित दिसते आहे. पण साचा:हेमसागर/चित्र येथे हेच चित्र [[File:Crassulaceae.jpg|120px|center|जेड? वनस्पती/मैत्रीचे झाड, ''क्रस्सुला ओव्हाटा'']] असे जतन केले; चित्र दिसत आहे 120px आणि center पॅरामीटर्स बरोबर दिसत आहेत. पण चित्र माहिती चित्रा खाली दिसत नाही आहे. असे का? म्हनजे मी नेमका कुठे चुकत आहे आणि हे कसे बरोबर करावे म्हनजे मला चित्रा खाली अपेक्षीत माहिती प्रत्येकवेळी दिसेल.

असा प्रश्न चित्रा सोबत माहिती देताना मला बर्‍याचदा भेडसावतो पण शंका विचारण्याचे राहून जाते कुणी सांगू शकेल ?

माहीतगार ०७:०१, ४ सप्टेंबर २००९ (UTC)

कामये ज्ञानार्थीनाम् केवलम् ज्ञानवर्धनम् (विकिपीडियाद्वारे)ज्ञानार्थींचे ज्ञानवर्धन व्हावे अशी (मी) इच्छा (मनात) ठेवतो.

V.narsikar ०६:०९, १० सप्टेंबर २००९ (UTC)

गुणक साचे

संपादन

मराठी विकिपीडियावरील गुणक साचे दुरुस्त करायला हवे आहेत. उदा: 03°23′S 29°22′E / 3.383°S 29.367°E / -3.383; 29.367 असे लिहिले असता जो दुवा तयार होतो तो योग्य ठिकाण दाखवत नाही. कोणी मदत करील काय?
अभिजीत साठे १३:५४, ११ सप्टेंबर २००९ (UTC)


Coordinates: Unknown argument format
{{#coordinates:}}: अवैध अक्षांश असे try करा. मला वाटते की मराठी विकिपेडिया साठी E,W,N,S हे दिशेचे co-ord. लागु नाहीत.यासाठी दुसरी template हवी.


V.narsikar १३:५३, १२ सप्टेंबर २००९ (UTC)

43°29′N 79°23′W / 43.483°N 79.383°W / 43.483; -79.383

वरच्या प्रतिक्रियेतील Template:Coord येथे click करा. योग्य डाटा न भरल्यामुळे असे होते.यासाठी मि चुक भरले तर एरर आला. तेथे तुमचे समाधान होइल अशी माहिती आहे. यात {coord|43|29|N|79|23|W}}या प्रकारचा साचा वापरायला हवा.

is it bujumbura you are searching?further add data in two digits i.e. 03 in palce of 3. 3 counts 30. V.narsikar १४:०८, १२ सप्टेंबर २००९ (UTC)

दिनेश् सखारम् जाधव्

साचा:मुलेप्रतिसाद is used on these pages in marathi wikipedia.Need help in checking if it is a bug I was trying to localise साचा:मुलेप्रतिसाद with newly effective localised parser fuction specialy to try जर instead of present if .I could not make जर function smoothly can some one help ?


'''हा/हे {{#if:{{NAMESPACE}}|{{NAMESPACE}} पान|पान किंवा लेख}} [[Wikt:मुखपृष्ठ|विक्शनरी मुखपृष्ठावरून]]

हे खालील प्रमाणे बरोबर दिसते

हा/हे विकिपीडिया पान विक्शनरी मुखपृष्ठावरून

तसे
हा/हे "{{#जर:{{NAMESPACE}}|{{NAMESPACE}} पान|पान किंवा लेख}}" [[Wikt:मुखपृष्ठ|विक्शनरी मुखपृष्ठावरून]]
खाली जर काम करत नाही
हा/हे "विकिपीडिया पान" विक्शनरी मुखपृष्ठावरून
if ने खालचे साचात असे दिसते

<div class="boilerplate metadata" style="background-color: #CCFFCC; border: 1px solid #5A8261; margin: 0.5em; padding: 0.5em;"> {| style="padding: 0 0 0 0; background: transparent;" | width=60px | [[Image:Crystal_Clear_app_clock.png|left|50px]] {{!}}'''हा हे {{#जर:{{नामविश्व}}|{{नामविश्व}} पान|पान किंवा लेख}} [[Wikt:मुखपृष्ठ|विक्शनरी मुखपृष्ठावरून]] |} </div>

वरील प्रमाणे जर वापरल्यास जर काम करत आहे पण नको ते हा/हे शब्द खात आहे आणि महिरपी कंसातील व्हॅरीएबल काम करत नाहीत पुढे पहा


आपल्याला असे खालीलप्रमाणे मराठी वापरता यावयास हवे .

'''हा/हे {{#जर:{{नामविश्व}}|{{नामविश्व}} पान|पान किंवा लेख}} [[Wikt:मुखपृष्ठ|विक्शनरी मुखपृष्ठावरून]]

हा/हे विकिपीडिया पान विक्शनरी मुखपृष्ठावरून


'''हा/हे {{#if:{{नामविश्व}}|{{नामविश्व}} पान|पान किंवा लेख}} [[Wikt:मुखपृष्ठ|विक्शनरी मुखपृष्ठावरून]]

हा/हे विकिपीडिया पान विक्शनरी मुखपृष्ठावरून

मला नक्की प्रश्न कळला नाही. वरील दोन उदाहरणे (आपल्याला असे...नंतरची) मला व्यवस्थित दिसत आहेत. हिरवी चौकट दिसत नाही, पण मजकूर ठीक दिसतो आहे.
अभय नातू २२:४९, ८ ऑक्टोबर २००९ (UTC)
अभय धन्यवाद, आता 'जर' हे फंक्शन मराठीतन कामकरू लागले आहे असे दिसते.त्यामुळेच तुम्हाला माझा प्रॉब्लेम लक्षातसुद्धा आला नाही.
मला आलेल्या तांत्रीक अडचणी बहूतेकवेळा तंत्रज्ञांच्या दृष्टीक्षेपानेही व्यवस्थित चालायला लागतात.तंत्रज्ञांना पळायला लावतो आणि ते यंत्र-तंत्र आपोआप कधी काही न झाल्या सारख चालायला लागतं!
पुन्हा एकदा धन्यवाद अभय .

Mahitgar ०६:५०, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)