विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२० ऑगस्ट २०१२

योजेफ ग्यॉबेल्स
योजेफ ग्यॉबेल्स

डॉ. पाउल योजेफ ग्यॉबेल्स (जर्मन: Joseph Goebbels; २९ ऑक्टोबर, इ.स. १८९७:म्योन्शनग्लाडबाख, प्रशिया - १ मे, इ.स. १९४५:बर्लिन, जर्मनी) हा एक जर्मन राजकारणी होता. इ.स. १९३३ ते १९४५ दरम्यान तो नाझी जर्मनीमधील एक महत्त्वाचा मंत्री होता. ॲडॉल्फ हिटलरच्या सर्वात विश्वासू व आंतरिक गोटामधील एक असलेल्या ग्योबेल्सने नाझी पक्षाची धोरणे व विचार सामान्य जर्मन नागरिकांपर्यंत पोचवण्याची भूमिका पार पाडली. त्याच्या कट्टर ज्यूविरोध व प्रभावी भाषणशैलीसाठी तो ओळखला जात असे.

इ.स. १९२१ साली हायडेलबर्ग विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवल्यानंतर ग्योबेल्सने अनेक व्यवसाय आजमावले व इ.स. १९२८ सालापर्यंत तो राजकारणात शिरून बर्लिनमधील एक प्रभावशाली पुढारी बनला. इ.स. १९३३ साली नाझी पक्ष सत्तेवर आल्यानंतर ग्योबेल्सने जर्मनीमधील प्रसारमाध्यमांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले व हिटलरच्या राजकीय व सामाजिक धोरणांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.

(पुढे वाचा...)