विकिपीडिया:उदयोन्मुख लेख

मुखपृष्ठावर 'उदयोन्मुख लेख' नावाचे एक सदर आहे. साधारणतः २५० शब्दसंख्या असलेले मध्यम / लघु-मध्यम आकारमानाचे, परंतु दर्जेदार लेख प्रकाशात यावेत व त्यांकडे लक्ष वेधल्यामुळे मुखपृष्ठावर येणार्‍या वाचकांकडून व सक्रिय विकिकर सदस्यांकडून त्यांमध्ये आणखी भर पडावी असे या सदराचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमातून मराठी विकिपीडियावर आशयघन लेखांची संख्या व दर्जा वाढता राहण्यास हातभार लागेल (समांतर उद्दिष्टासाठी योजलेला विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० हा प्रकल्प व उदयोन्मुख लेख हे सदर, हे दोन्ही उपक्रम परस्परपूरक ठरतील). मुखपृष्ठ सदराच्या नामनिर्देशन-कौल प्रक्रियेनुसार उदयोन्मुख लेखांसाठीही नामनिर्देशने सुचवण्यात येतील व कौल घेऊन सुचवलेल्या लेखांपैकी एक लेख दर आठवड्यास मुखपृष्ठावर झळकेल.

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन येथे उमेदवार लेखांसाठी नामनिर्देशने करावीत. 'उदयोन्मुख लेख' म्हणून नामनिर्देशन सुचवलेला उमेदवार लेख विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष येथे नोंदवलेल्या निकषांच्या कसोटीवर उतरणे अपेक्षित आहे. सक्रिय विकिकर सदस्यांनी या उपक्रमास उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी मराठी विकिपीडियातर्फे सस्नेह विनंती!

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष

हेही पाहा

संपादन